Daily Archives: जून 21, 2011

घड्याळ

घड्याळ

घड्याळ होते भिंतीवरती

टिक टिक करुन चाले

सतत दिसली चाल काट्यांची

एकाच दिशेने हाले

धावत होता एक तुरु तरु

दुजा हळूच धांवे

छोटा जाड्या मंद असून

पळणे ना ठावे

पळत असती पुढे पुढे

समज देतो काळ-वेळेचा

किती राहील शिलकीमध्ये

प्रवास आपुला जीवनाचा

जीवन चक्रापरि फिरती

घड्याळ्यामधले सारे काटे

जाणीव करुन देती सतत

आपण कोठे अन् जीवन कोठे

(कविता)