Monthly Archives: मे 2015

सोनेरी तसवीर !

सोनेरी तसवीर !

त्रेसष्ठ सालची गोष्ट आठवली. पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात एका कॉन्फरन्स साठी गेलो होतो. त्यावेळी विद्यालयाच्या       ग्रंथभांडारात जाण्याचा योग आला होता. अतिशय भव्य आणि प्रचंड असेते ग्रंथालय होते.  भरपूर वैद्यकीय आणि संलग्न विषयांची पुस्तके  मासिके कपाटामध्ये अतिशय व्यवस्थित ठेवलेली होती. ग्रंथालयात शिरताच भिंतीवर एक भव्य काचेची फ्रेम केलेली तसवीर दिसली. फ्रेमची चौकट सोनेरी असून, अतिशय आकर्षक होती.  मध्यभागी एका वहीचा वेडावाकडा फाडलेला कागद  चिकटवलेला  होता. त्यावर चार रेघोट्या आखून कसलासा आलेख काढलेला होता. अतिशय उत्कृष्ट सजविलेल्या कालाकृतीपूर्ण, अशा फ्रेम मधल्या त्या  लहानश्या  तुकड्याने, मनाची उत्सुकता शिगेला पोहोंचली. खालती टीप म्हणून एक संदेश होता.   वैद्यकीय शास्त्रातला एक महान संशोधक अलेक्झांदर फ्लेमिंग याने पेनिसिलीन  ह्या जीवदायी व मानववादी जीवसृष्टीला वरदान ठरेल असे औषध शोधून काढले. त्याच्या ह्या शोध कार्याची दाखल घेऊन त्याला नोबेल पारितोषिक ही दिले गेले.  त्यांनी भारताला भेट दिली, तेव्हा ते पुण्याच्या वैद्यकीय महाविद्यालयात आले होते. जमलेल्या एका विद्यार्थी समुदायात अनौपचारिक गप्पा मारीत असताना, कुणीतरी त्यांना  पेनिसिलीन  विषयी  प्रश्न विचारला. एका विद्यार्थ्याच्याच हातातली वही घेऊन, त्यांनी चटकन छोटा ग्राफ काढला. आणि प्रश्नाची उकल केली. तोच तो भाग्यवान    कागदाचा तुकडा, ज्यावर त्या महान संशोधकाचे हस्तलिखीत उतरले होते. सोनेरी तास्वीरीमधला ग्राफ, वैद्यकीय इतिहासाच्या  पाऊलखुणा दाखवीत होता.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

आनंद लुटणारे मन !

आनंद लुटणारे मन !

 सहयोग मंदिर ठाणे, येते नुकताच जुन्या गाण्यांचा, संगीताचा बहारदार  कार्यक्रम झाला होता. सभागृह तुडुंब भरले होते. मी पण तो आस्वाद घेण्यासाठी गेलो होतो. सर्व श्रोत्यांना बसण्यासाठी भारतीय बैठक होती. माझ्यासमोर एक प्रौढ स्त्री बसलेली होती. तिच्या शेजारी दोघेजण होते. ती त्यांच्याशी अधून मधून संवाद करीत होती. सर्वजण त्या अतिशय मधुर संगीताचा आनंद लुटीत होते. परंतु  माझासमोर बसलेल्या त्या बाई थोड्याश्या जास्तच उत्साही  वाटत होत्या. त्यांच्या सतत हालचाली चालू होत्या. सहकाऱ्याबरोबर त्या प्रत्येक गाण्यावर  टिप्पणी करीत होत्या.  मान डोलावाने,  टाळ्या  वाजवणे, वाहवा ! म्हणत आपला आनंद व्यक्त करणे, चालू होते. “ काय गाण्याची चाल, किती सुंदर वाद्यसंगती जमली आहे, काय चांगली तान मारली आहे ह्यातील बासरी तर किती सुमधुर वाजवली, तबल्याचा ठेका कसा धरला आहे सतारीचे बोल किती मधुर जमलेत, पेटीवादन तर अप्रतिम साधले, शंकर जयकिशन याचं संगीत खूपच मनाला मोहून टाकते, नौशादअलीचे हे गाणे काय सुरेख  जमले —– एक नाही अनेक हालचालीच्या  पैलू  मधून त्या बाई आपले संगीतातले,  गाण्यामधले आत्मिक समाधान अभिव्यक्त करीत होत्या.  न जाणो मी मात्र त्यांच्या अतिउत्साहामुळे  निराशलो होतो.  कारण त्यांच्या सततच्या हालचालीमुळे माझे लक्ष विचलीत होत होते. संगीतातील मला मिळणाऱ्या आनंदात बाधा निर्माण होत होती. तरीही माझ्या मनाला आवर घालून सारे सहन करीत होतो.

कार्यक्रम संपला. सर्व श्रोते उठून जावू लागले. मी मात्र त्या बाईंच्या उत्साहाणे बेचैन झालो होतो.   शेवटच्या क्षणी  वैचारिक बांध फुटला. मी तिला विचारले. “ तुम्हाला संगीत कार्यक्रम खूपच आवडलेला दिसतो. परंतु  राग येणार नसेल तर सांगू का? तुमच्या सततच्या टिप्पणीमुळे  व हालचालीमुळे शेजारच्याना त्रास होतो का हे ध्यानात घेत चला. “   ती मागे वळून किंचित हसली. आभारी महाशय,  मी यापुढे काळजी घेईन. मी त्याक्षणी विसरले होते की  आपणामुळे  कुणाला त्रास होत असेल. “   ती शांत होती. मी उठून जाऊ लागलो. दाराजवळ गेल्यावर मी सहज मागे बघितले. मला जे दृश्य दिसले,  त्याने मला धक्काच बसला. तिच्याजवळ बसलेले दोघेजण तिला हाथ देवून उठवीत होते. त्यांच्या  खांद्याचा  आधार घेवून ती पाऊले टाकण्याचा प्रयत्न करीत होती. तिचे दोन्ही पाय अपंग झाले असावे.  माझ्या डोळ्यात  एकदम अश्रू आले. माझ्या विचारांची मलाच लाज वाटली. तिचे शरीर अपंग होते, पण मन किती तजेले, उत्स्ताही  होते. जीवनात निर्माण झालेली जबदस्त उणीव ते भरून काढीत होते. मनाची उभारी, आनंदाची फवारणी करून, कोमेजून जाण्याऱ्या शरीर संपदेला टवटवीत ठेवण्याचा    प्रयत्न  करीत होती.  फुलवीत होती. ह्या जगात जगायचे कसे? ह्याचा एक आदर्शवत संदेश देत होती.   

 

डॉ. भगवान नागापूरकर

     

चिखलातले कमळ

जीवनाच्या रगाड्यातून-

चिखलातले कमळ

जव्हार (  ठाणे  )   ग्रामीण रुग्णालय यामध्ये प्रमुख अर्थात  Medical Superintendent   म्हणून कार्यारात होतो.  रात्री दहाचा सुमार होता. मला सूचना मिळाली   की  दोन  दिवसापूर्वी  ज्या बाईने एका निरोगी व गोंडस अशा मुलीला रुग्णालयात जन्म दिलेला होता,  ती बाई अचानक पळून गेली. धक्कादायक परंतु एक सत्य घटना होती. धावपळ झाली.  सर्वांनी शोधा शोध केली. शासकीय स्थरावर जे करावयाचे ते केले गेले.

अतिशय दु:खद व मनास निराश करणारी घटना होती.  त्या बाईने हे सारे योजूनच केले असल्यामुळे,  नाव गाव पत्ता हे सारे असत्य होते. कोणता दोष त्या नवबालीकेचा ?  जन्मताच तिला तिच्या जन्मदात्या आईने तिला टाकून दिले. जगात जगण्यासाठी लढण्याचा संदेश देवून,  ती माय मावूली निघून गेली.  तिच्या सर्वतो वाढीसाठी योग्य ते प्रयत्न केले गेले. मुल वाढू लागले.  शुश्रुषा करणाऱ्यानी तिचे नाव दुर्गा ठेवले. कुणाचे प्रारब्ध्   कुणीही हिरावून घेवू शकत नाही. त्या लहान बालिकेच्या ललाटी जे निसर्गाने  लिहिले तेच तिला मिळणार. हे सत्य आहे.

एक दिवस एक प्रौढ जोडपे रुग्णालयात आले.  त्यांना मुलबाळ नव्हते.  त्या मुलीला ते दत्तक घेवू इच्छित होते.   स्थानिक श्रीमंत शेतकरी कुटुंब घरदार व स्वत: गेली दहा वर्षे अमेरिकेत  New Jersey   येते  मोठ्या      कंपनीत अधिकारी होते.  भारतात दर दोन वर्षांनी येत  असे. चर्चा झाली.  त्यांनी कायदेशीर अर्ज केला. सर्व संबंधित  शासकीय यंत्रने मार्फत परवानग्या मिळाल्या.  मुलीला त्यांच्या स्वाधीन करण्यात आले.  तीच मुलगी  करोडो  रुपयाच्या  संपत्तीची  कायदेशीर मालक बनली.  ह्याला काय म्हणावे?  निसर्गाची एक विचित्र परंतु आकर्षक  खेळी.  हृदह्याला   भिडणारी जीवनकथा.

सहा वर्षानंतर मुलीच्या फोटोचा अल्बम बघण्यात आला.  दत्तक मातापित्यासह तिचे अमेरिकेतील प्रशस्त बंगल्यातील फोटो, एक अलिशान मोठ्या गाडीत स्कूलयुनिफार्म मधले फोटो, जगप्रसिद्ध नायगारा धबधबा बघातानाचे फोटो, जगातले सातवे आश्चर्य Grand Canyon च्या विशाल सुळ्याकडे मान उंचावून बघतानाचे फोटो,  Washington येथील President’s  White House   बघातानाचे फोटो, अनेक अनेक छबीमध्ये तिचा भाग्य आलेख फुलविणारे प्रसंग बघण्यात आले. जे तिच्या झोळीत निसर्गाने ओंतले ते  कल्पनातीत होते

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

अंगठ्याचा ठसा

अंगठ्याचा ठसा

गावाकडील एक प्रसंग. बँकेमध्ये  पेसे काढण्यासाठी गेलो होतो. खुर्चीवर बसून पैसे काढण्याचा  फॉर्म भरू लागलो. एक खेडूत बाई, नौवारी लुगडे व कपाळावर मोठे कुंकू, माझ्या जवळ येवून विनऊ लागली. “माझा फॉर्म भरून देता का?” “किती रुपये काढायचे आहेत?” मी विचारले. “पंचवीस हजार रुपये काढायचे आहेत.”  मी थोडेसे आश्चर्याने तिच्याकडे बघितले.   त्या बाईंचा पेहेराव, अशिक्षितपणाची  झलक आणि बोलण्यातील गावान्ढालपण ह्याची माझ्यामनावर त्या बाई  विषयी प्रथमदर्शनी जी प्रतिमा निर्माण  झाली होती, त्याला केवळ त्या आकड्याने धक्का बसला. मी तिचा फार्म घेत पासबुक मागितले. अपडेटेड  असलेले  पास बुक  बघून  मी पुन्हा आवक झालो. त्यात थोडे थोडके पैसे नसून पांच लाख पेक्षा जास्त रक्कम होती. क्षणभर स्वताहाच्या समजा  बद्दल आणि परिस्थितिच्या अव्लोकित सामर्थ्या बद्दल थोडिशी  खंत वाटली. जास्त चौकाशी न करता, मी तिचा पैसे  काढण्याचा फार्म भरुण  दिला. तिला स्वक्षारी करण्यास संगीतले. ती  चटकन पुढे आली. व तिने  आपल्या  दाव्या  हाताचा  अंगठा पुढे केला  “ मल लिव्हन एत नाही.  मी नेहमी डाव्या  हाताच्या  अंगठ्याचा  ठसाच्  देत असते.”  ती सहज  म्हणाली..

“अग मावशे तुझी कामालच  आहे.  तुझ्या पासबुकात भरपूर पैसे आहेत. तुला लिहिता वाचता  एत नाही. तू अंगठ्याचा ठसा देतेस. कुणीतरी फसवील याची भीती वाटत नाही का?”  मी गंमत  म्हणून विचारले. हा ती मिश्कील्तेने म्हणाली, “ अहो सहीसारखी सही करून माणस  फसवितात कि. साह्यान धोका होऊ शकतो.  परंतु अंगठ्याच्या ठशाला नाही. माणस माणसालाच फासावितील परंतु माणूस देवाला फसवू शकेल का? साऱ्या जगात माझ्या हाताच्या अंगठ्यावानी दुसरा अंगठा कोठे मिळेल? हा अंगठा देवाची ठेव आहे. त्याच्या सारखा दुसरा मिळणार नाही. लोक लबाडी करतात ती साह्याची आणि लिखापढीची. मला कोण फसणार? “

एक नैसर्गिक सत्य. महान तत्वज्ञान. तिच्या तथाकथित अशिक्षीत मुखातून   माझ्या तथाकथित सुशक्षित डोक्यावर आदळले जात असल्याच्या भास होऊ लागला.  समाज गैरसमज ह्याची दरी कोणत्या दिशेने रुंदावत जाते. ह्याचे माणसाला भान राहत नाही.  आजच्या आधुनिक युगाने   आणि संगणकासारख्या इलेक्ट्रोनिक माध्यमांनी सुध्या  ओळख  माण्यतेसाठी अंगठ्याचा  ठसा हाच एकमेव प्रभावी साधन असल्याचे मान्य केले आहे. त्याच्या समोर अंक, शब्द, खुणा, प्रतिमा, इत्यादी दुयमच ठरतात. त्या अनामिक अशिक्षित परंतु अनुभव संपन्न मावशीला अभिवादन करून मी घरी आलो.

डॉ. भगवान नागापूरकर

मो. ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

गायीचे प्रेम

रस्त्याच्या वळणावर एका झाडाखाली एक गाय शांत उभी होती.  फक्त मानेची व शेपटीची   हालचाल अधून मधून चालू होती.  कितीतरी वेळ ती तशीच उभी होती. जाणारा  येणारा तिच्या कपाळाला, शिंगाला व  अंगाला  हात लावून तिला नमस्कार करू बघत  होता. डोळे मिटून शांत विश्रांती घेत असालेल्या   त्या गायीला,  प्रत्येकाचा स्पर्श होत असल्याची जाणीव, तिच्या किंचितशा हालचालीवरून दिसून येत होती. तिला त्यांच्या स्पर्शाबद्दल  काय वाटत असावे,  हे समजण्यास मार्ग नव्हाता. परंतु प्रत्येक वाटसरूला तिला स्पर्श करून,   जणू तेहतीस  कोटी देवांचे  दर्शन घेतल्याचा आनंद झाल्याचे दिसून येत होते.

तेहतीस कोटी देवांचे दर्शन घेण्यासाठी, कुणालाच  कसलेही  श्रम व मेहनत  घ्यावी  लागत  नव्हती.  ती गाय, जिच्यात तेहतीस कोटी देवांचे अस्तित्व असल्याची भावना, जणू दर्शन देण्यासाठीच  येणाऱ्या जाणाऱ्याच्या वाटेवर उभी होती. प्रत्येकजण दर्शन घेवून   स्वतःचे  समाधान आपल्याच कृतीत शोधात होता.

एक दहा वर्षाचा मुलगा हातात पिशवी घेवून तेथे आला. त्याने पिशवीतून प्रथम एक मोठा ब्रेड काढला. गाईचे लक्ष जातच ती त्याचावर झेपावली. अतिशय अधाशीपणे तिने तो सर्व ब्रेड क्षणात  खावून टाकला. मुलगा बघतच होता. गायीला हात लावून तो निघून गेला.  गाय हलके हलके वळून दूर जाण्याऱ्या त्या अनामिक मुलाला बघत होती. तिच्या डोळ्यातून बाहेर पडनार्या  नजरेमधून तेहतीस कोटी देवांचे आशीर्वाद दिले जात असल्याचा संकेत स्पष्टपणे जाणवत होता.

डॉ.भगवान नागापूरकर

मो.  ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com