Monthly Archives: नोव्हेंबर 2017

“ध्वनी ” एक ईश्वरी उर्जा

“ध्वनी ” एक ईश्वरी उर्जा

सुर्यास्ताची वेळ होती. समोरचे नैसर्गिक द्दष्य टिपत बाकावर नामस्मरण घेत बसलो होतो. हाती मन्यांची माळा होती. सैरावैरा धावणारे मन केंव्हा सुर्यास्ताकडे, वा माळेकडे वा सभोवतालच्या परिसराकडे जात होते. थोड्याश्या अंतरावर एक तरुण हाती गितार घेऊन एका जुण्या गाण्याची धुंद वाजवीत होता. आम्ही दोघे समान परीस्थितीचे सहप्रवासी होतो. माझे नामस्मरण व ईश्वरी आराधनेत लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न. त्याचा सुरतालांत गाणे बद्ध करण्याचा, संगीताच्या आनंदात रममान होण्याचा प्रयत्न. माझा प्रयत्न जाणिवेतून होता. त्याचा कदाचित् अजाणतेने. मार्ग मात्र जात होते ते त्या अनंतातील कोणत्यातरी दालनांत.
“ध्वनी ” एक ईश्वरी उर्जा ह्यामध्ये.
नामस्मरणाची प्रक्रीय व उद्देश कोणता. परमेश्वर संकल्पनेशी एक रुप होणे. शब्दांत दडला आहे स्वरुप आणि ध्वनी. स्वरुप असेल विचारांचे – कल्पनांचे आकार. जे खोटा आभास निर्माण करतील. उलट ध्वनीत एकरुप होण्याचा अनुभव आनंद व ईश्वरी असेल.
नामस्मरणाच महत्व चांगलच लक्षांत आले होते. प्रथम त्या परमेश्वरला जाणणे, त्याच्यामध्ये एकरुप होण्याचा प्रयत्न हेच जीवनाचे अंतीम ध्येय असावे हे समजलो. कारण तसे आपण सर्व शुन्यातून आलो व शून्यातच एकाग्र होणार. संसार, ग्रहस्थाश्रम इत्यादी सारे मार्ग फक्त देहाच्या वाढीसाठी व अंतीम ध्येयाकडे नेण्याकरीता.
नामस्मरण कुणाचे. तो परमेश्वर तर सर्व व्यापी, सर्व श्रेष्ठ, निर्गुण निराकार. हे जगाने मान्य केले. त्याचे नामकरण हे केवळ मन केंद्रीत करण्यासाठी. मात्र तो एक मार्ग समजुन. ध्येय व साधना यांची स्पष्ट जाणीव सतत असावी. नसता साधनेलाच ध्येयाचे रुप समजून अनेक फक्त मार्गातच रेंगाळतात. इष्ठ देवतेचे नाम व तेही लयबद्धते मध्ये शांत मनाने घेत त्या परमेश्वराची आराधना समाधान देते. तरी खरी शांतता अद्यापी बरीच दूर राहते.
कुठे व कसा आहे तो परमेश्वर. सत् चित् व आनंद किंवा सत्यम् शिवम् सुंदरम् ह्यातच त्या परमेश्वराचे योग्य व निश्चीत असे वर्णन ऋषीमुनीनी केलेले आहे. फक्त ” आनंद ” हाच ईश्वर असतो. मात्र त्यामध्ये विचार वा भावना ह्यांचा किंचीतसा देखील स्पर्ष नसावा. केवळ आनंद आनंद आणि आनंद. आनंद व्यक्त होत नसतो. व्यक्त आनंद खरा आनंद रहात नाही. समाधान व्यक्त होते. शांतताही व्यक्त वा शरीर मनावर प्रकट होते. जे जे व्यक्त केले जाते, कुठेतरी कृत्रिमता त्यावर अच्छादलेली असते. फक्त आनंद ह्रदयामधून शरीरभर पसरुन जातो. विचार शुन्य, भावना शुन्य तरीही एका वेगळ्याच अनुभवाची प्रचीती. क्षणिक तरीही अनंत काळ व्यतीत झाल्याप्रमाणे.
मानव हा निसर्गातील एक घटक. मात्र त्यानेच स्वतः आपण सर्व श्रेष्ठ नैसर्गिक कलाकृती असल्याचे चित्र जगासमोर रंगविलेले आहे. त्याला प्राप्त बुद्धीच्या देणगीच्या जोरावर तो हे सारे रंगवितो. ईश्वराने त्याच्या अगणित साधन सामुग्रीमधून फक्त पांचच तत्वांची जाण त्याला दिलेली आहे. आणि ती तत्वे जाणण्यासाठी, समजण्यासाठी पांचेंद्रिये देऊ केली आहेत. फक्त पांच इंद्रीयांच्या साधनांचा हा खेळ. त्याचा आधार घेत मानव प्रगतीच्या अर्थात उत्कर्शाच्या वाटा शोधीत चालला आहे.

२ एक समज मानवाला आलेली आहे. आणि ती म्हणजे ही जी पांच तत्वे त्याला प्राप्त झाली आहेत. त्याच्याच आधाराने त्याला हा निसर्ग वा ईश्वर याला जाणावयाचे आहे. साधन limited परंतु साध्य मात्र अनंत. म्हणूनच मानव सत्यापेक्षा कल्पना जगतात जास्त भराऱ्या घेतो. विशेषकरुन त्याच्या परमेश्वराबद्दलचे विचार.
ध्वनी ही एक ईश्वर निर्मीत उर्जा –शक्तीचे रुप. ध्वनी हे ईश्वरी अस्तित्वाचे रुप. अक्षर, शब्द, ओम् कार ( ॐ ), लय, लहरी, नाद, इत्यादी, वर्णनामधून व्यक्त होतो, तो ध्वनी. ह्या ध्वनीला सर्व अंगानी जाणणे हेच त्या परमेश्वराला जाणण्याचे एक साधन. ध्वनीला निरनीराळ्या रुपांत प्रकट करण्याचा मानवाने प्रयत्न केला. ध्वनीशी एकरुप होत, आनंदात विलीन होणे, हेच तर ईश्वर सान्निध्य होय.
नामस्मरण हा एक प्रकार. नामस्मरणांत आम्ही कोणत्यातरी दिव्य शक्तीची आठवण काढीत, त्याच चक्रांत फिरत राहतो. मुळ हेतू विसरतो. तो असतो त्या ध्वनीचा शोध. नामस्मरण करताना शुद्ध हरपली पाहीजे, स्वतःला विसरले पाहीजे. नामस्मरण गळून पडले पाहीजे. कोणत्यातरी अज्ञात तंद्रीत गेले पाहीजे. भान हरपले पाहीजे. ती स्थिती क्षणीकच असेल. परंतु त्या हरपलेल्या भानाचे वेळेत मोजमाप होऊ शकणार नाही. नामस्मरणाचा तो अत्युच्च क्षण असेल. ” आनंद ” ज्याच्या अवती भवती असेल शांतता.
त्याच प्रमाणे ध्वनी लहरी, धुंदी आणणाऱ्या सभोवताल-जगाला विसरावयास लावणाऱ्या- दोघांचा अर्थ एकच नव्हे काय ? अस्तित्व विसरुन एकरुप होण्याचे साध्य.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

वेळेची एक संकल्पना

वेळेची एक संकल्पना

वेळ ही एक हालचाल ( Movement ) समजली गेली आहे. वेळ कधीच स्थीर नसते. जगाच्या चक्राप्रमाणे ती फिरत असते. प्रत्येक हालचालीसाठी वेळ लागते. त्यामुळे वेळ व हालचाल अर्थात Time and Movement ह्या एकच समजल्या गेल्या. हे शारीरिक स्थरावर.
मानसिक स्थरावर ही संकल्पना वेगळी ठरते.
दोन प्रश्न आहेत. १) काय ? अर्थात काय असावे . २) कसे ? अर्थात कसे असावे.
स्वच्या ( Self ) वा मनाच्या ( Mind ) गरजा, वासना, इच्छा सतत “काय आहे”, हे जाणण्याचा प्रयत्न करुन, “कसे असावे” ह्या संकल्पनेंत जातात.
” काय आहे ” हे समजण्याने वासनेचे प्रश्न सुटत नाही. वासना ( Desire ) ही एक नैसर्गिक गुणधर्म जन्माच्या उपजत असते. “काय आहे ” ह्या विचारांत बदल होवून स्वतःसाठी, मनासाठी ” काय असावे ” हा विचार येऊ लागतो. म्हणजे ” काय असावे ” ही मनाची वा स्वतःची वासना. हा बदल, हा संघर्ष हाच स्वचा मुळ पाया आहे.
वासना ( Desire) व अहंकार (Ego ) हे मुळ निसर्गानी दिलेले स्वभाव आहेत. देहाच्या जगण्यासाठी, अत्यंत महत्वाचे गुणधर्म. ह्याच चैतन्यमय गुणधर्मामुळे कोणत्याही परिस्थितीवर मात करुन, देह अर्थात जीवन जगविले जाते. निसर्ग जे देऊ करतो, त्याला ” काय आहे ” ही समज असते. जे आहे तसे. हा त्याचा सरळ व सोपा अर्थ. हे जगण्यासाठी, जीवनासाठी पूर्ण असते. परंतु आमच्या वासनेला फाटे फुटून ” काय आहे” ऐवजी ” कसे असावे ” हा विचार पक्का होऊ लागतो. “काय आहे” मध्ये किमान गरज असते. परंतु ” कसे असावे ” ह्याला मर्यादा नसतात. निसर्ग देत असलेले “काय आहे” व देह मनाला ( Self ) वाटते ” कसे असावे ” हाच मुळ संघर्षनात्मक मुद्दा असतो. उदा. अन्न, पाणी, हवा, जमीन, इत्यादी निसर्गाने दिलेल्या आहेत. मानवाने त्या “कशा असाव्यांत” ह्या कल्पनेने अनेक बदल केलेत.
स्वचा ( Self ) दुसरा गुणधर्म म्हणजे इच्छा ( Will ). इच्छा होण्याची वा इच्छा बदलण्याची. इच्छा कांहीतरी होण्याची. इच्छा कांही तरी बदलण्याची. इच्छा होत जाणे, इच्छा बदलत जाणे. हा गुणधर्म. इच्छेला आम्ही लहानपणापासून जाणले असते. आमच्या वाढीत. मग ती आर्थिक, सामाजिक, वा धार्मिक असो. आमच्या ध्येयांत इच्छेचा सहभाग असतो. एका विचारावर दुसऱ्या विचाराने ताबा करणे, एका वैचारीक हलचालीवर दुसऱ्या वैचारीक हलचालीने ताबा मिळविणे हे इच्छा करते.
” मी माझ्या विचारावर ताबा मिळवला पाहीजे ” ह्यांत मी व विचार भिन्न आहेत. म्हणजे माझा संबंध विचाराशी असतो. तसे दोन्हीही एकरुप वाटतात. विचार म्हणजे ते ज्ञान ज्यांत आठवणी ( Memaries ) आणि ( Experiences ) अनुभव ह्यांची साठवण असते. एक विचार — हा सतत दुसऱ्या विचारावर ताबा करणे. (Control ) आकार देणे ( Shape ) अथवा अमान्य करणे (Deney ) ही क्रिया करीत असतो.

२ समजण्यासाठी थोडे भिन्न करु या. Self म्हणजे माझ्यांत मी वेगळा असून, जो सर्व गोष्टी बघतो, जाणतो, तो वेगळा Observer अर्थात बघणारा असतो. Observer जवळ म्हणजे बघणाऱ्याजवळ गेलेल्या, जमा झालेल्या आठवणी व अनुभव होय. हीच आठवणीची विचारांची साठवणूक.
मेंदू कार्य करुन प्रत्येक क्षणाची हलचाल अर्थात विचार यांची साठवणूक करतो. जसे प्रसंग, जसा अनुभव तशा विचार लहरी उत्पन्न होऊन ज्ञानेद्रियाच्या मार्फत मेंदूत जमा होतात. आणि साठवल्या जातात. वासना ( Desire ) आणि अहंकार ( Ego ) जे मुळ गुणधर्म आहेत, ते जीवला कर्म करण्यास चेतना देतात. तरी हे सर्व शरीर गुणधर्माप्रमाणे होत जाते. येथे ” मी ” म्हणजे स्वतः ह्या भागाची भूमिका नसते. ” मी ” फक्त उर्जा देण्याचे काम करतो. म्हणून ” मी ” वा स्वतः ( Self ) वेगळा आणि त्याच्या विचार लहरी, past, memories, experiences ह्या वेगळ्या. ज्याला आपण ( Observer ) बघणारा म्हटले आहे. ध्यान प्रक्रियेमध्ये हा Observer ( विचार शक्ती ) देहा मधल्या ( उर्जा शक्तिला –प्राणाला ) अर्थात Observer ला जाणण्याचा प्रयत्न करतो. मी स्तः ( Self ) आणि माझा देह ह्या भिन्न संकल्पना आहेत. मी ( I ) म्हणजे आत्मा आणि देहातील मेंदू, बुद्धी, मन हे घटक येतात. त्यामुळे देहाचे कार्य वेगळे, आत्म्याचे अर्थात मीचे भिन्न. समजण्यासाठी “तू “चे कार्य म्हणजे देह बुद्धीचे कार्य. व “मी ” चे कार्य म्हणजे आत्म्याचे कार्य. आत्मा स्वतः कार्य करीत नसतो. तो फक्त प्राणरुपी चेतना देतो. यंत्रामधल्या विजेप्रमाणे.
म्हणजे माझी बुद्धी, मन, विचार हीच बघणारी Observer बनते. मी (I ) हा मलाच
( Me ) ला वेगळा करतो. मी मलाच बघतो.
माझा देह ( ज्यांत मन, बुद्धी, विचार, इत्यादीचा सहभाग आहे. ज्याला Observer म्हणजे बघणारा म्हटले आहे. हा कुणाला बघतो. तर मला स्वतःलाच. म्हणजे माझ्या प्राण शक्तीला. ज्याला आत्मा संबोधले आहे. म्हणजे मी मलाच बघण्यासारखे, जाणण्यासारखे आहे. कुणीतरी व्यक्ती आरशामध्ये स्वतःला बघतो. येथे आरशामुळे तो आपली छबी वा प्रतिमा आपणच बघत असतो. हे बाह्य झाले. मी ” आत ” कसा आहे, कोण आहे, याचे ज्ञान होणे हे देखील त्याच प्रमाणे म्हणजे आरशांत स्वतःची प्रतिमा बघण्या सारखेच आहेत. मी आणि आरशातील प्रतिमा वेगळ्या आहेत.तरी आपण म्हणतो की मीच मला ह्या अरशांत ( प्रतिमा रुपाने ) बघतो. जर देहांत देखील तशाच दोन प्रतिमा असल्याप्रमाणे आहेत. एक मी जो सर्व बघणारा. (Observer) आणि मला त्या बघीतल्या जाणाऱ्या observed प्रतिमेलाच बघायचे आहे. अर्थात जाणावयाचे आहे. ह्या Observed ला रंग रुप आकार नाही. त्याचे फक्त अस्तित्वच असते. ह्या अस्तित्वाला मला जाणावयाचे आहे. समजायचे आहे. म्हणजे त्या consciousness ला अनुभवायचे आहे. जेंव्हा एखादी गोष्ट वा घटना मी बघतो, त्याच वेळी मला ह्याची पुर्ण कल्पना असते. की तीच घटना वा गोष्ट माझ्या व्यतरिक्त कुणीतरी दुसरा देखील बघत असतो. आपण म्हणताना म्हणतोकी तो ईश्वर तेच बघत असेल. ईश्वर अर्थात अज्ञात शक्ती. माझ्या बाबतीत, सर्वांच्या बाबतीत ती शक्ती माझ्यामध्येच वास करते. ती हे सारे जाणते वा बघते. म्हणजे जे मी बघतो, जाणतो, हे त्या माझ्याच मधल्या अव्यक्त व्यक्तीलाही समजते. आता माझा प्रयत्न असेल की मी त्या माझ्यातच असलेल्या मला जाणणऱ्या शक्तीला बघायचे, जाणायचे, अनुभवायाचे आहे. मी मलाच हा जाणण्याचा प्रकार आहे. To experience the self consciousness or objectless awareness
३ एक ” स्व ” चा म्हणजे माझा गुणधर्म म्हणजे स्वतःलाच बघणे, जाणणे, हा. तोच बघणाराची भुमिका करतो. बघणारा म्हणजे Observer. ज्यानी बघीतले आहे. बघणारा म्हणजेच ज्यानी गेलेला काळ बघीतला. त्याचे साठलेले ज्ञान, आठवणी, अनुभव ह्या साऱ्या गोष्टी. मी ( I ) हा मलाच ( Me ) बघतो, जाणतो हे होते. जसे मी तुला बघण्याचा, जाणण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे माझ्यातला बघणारा ( Observer ) मलाच बघतो, जाणतो. एक साक्षी भावाने मीच मलाच समजण्याचा जाणण्याचा, अनुभवण्याचा, बघण्याचा प्रयत्न करतो. बघणारा मीच आणि द्दष्य देखील मीच. Observer आणि Observed मीच असतो. ह्याचाच अर्थ मी कोण आहे हा जाणण्याचा प्रयत्न.
जाणीव ( Awareness ) हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. आपण जे बघतले ते जाणणे. फक्त जाणणे महत्वाचे. ज्यांत तुमचे विचार, विश्लेशन, कल्पना,इच्छा ह्यांचा कोणतांच स्पर्ष नसावा. हे कठीण आहे. अशक्य देखील. कारण तुम्ही Observer असून जाणण्याचा प्रयत्न करणारे आहांत. आणि Observer म्हणजे बघणारा, म्हणजेच अनुभव, ज्ञान, आठवणी, यांचा साठा असलेला. असे तुम्ही जाणणारे फक्त जाणणारेच रहाल कां ज्या जाणण्यामध्ये फक्त जाणणेच ( Awareness ) असेल. बघणेच असेल. परंतु जाणणारा फक्त बघूच शकत नाही. कारण जे दिसेल ते त्याला जाणण्याचा प्रयत्न हा त्याच वेळी होईल. त्याच वेळी तुम्ही Observer व्हाल.
जाणणे ही ( Awareness ) मनाची अशी अवस्था होते की ज्यांत बघणाराला Observer ला दुसरा मार्ग नसतो. कारण त्यांत तुम्ही व्यवहार बघता. क्रिया देता. जे जाणता, जे बघता त्याला तसाच स्विकार करीत नसता.
“मी याचे काय करु ” ? ” हे मी बघीतल्या शिवाय कसा जाणू ” ? म्हणजे तुमची लगेच क्रिया सुरु होते. तुम्ही नुसते जाणणे मान्य करीत नाही. हे काय आहे, कसे आहे, हे जाणत बघण्याचा प्रयत्न होतो. जसे एका सुंदर, सुवासीक, मोहक फुलाचे. तुम्ही फूल बघता. झाडावरुन तोडता. सुवास घेता. त्याच्या पाकळ्या वेगवेगळ्या करीत विश्लेशनात्मक त्या फुलाला बघण्याचा आणि जाणण्याचा प्रयत्न करीतात. म्हणजे ते फुल जसे आहे तसेच न जाणता, तुम्हाला वाटणाऱ्या प्रश्नांची त्या फुलासंबंधी उकलन करण्याचा प्रयत्न होतो.
” ते काय आहे ” ? हेच बघणाऱ्यानी बघावे. परंतु जेंव्हा तुम्ही ” जाणता ” ( Aware ) त्यावेळी तुम्हाला वाटते ” ह्याच्याशी मी काय करु ” ? म्हणजे ते काय आहे, ह्यापेक्षा ते कसे असावे, ह्यांत तुम्ही गुंततात. फुल त्यातील ” सुवास Fragrance ” हेच एक सत्य असते. तेच फक्त अनुभवायचे असते. परंतु फुल काय आहे, सुवास काय आहे, ह्याच्या पासून तुम्ही दुर जाता. सत्य जाणण वेगळ आणि तुम्हाला काय वाटत हे वेगळ.
येथेच तुम्ही ” परिस्थितीजन्य सदा संभ्रमी अवस्थेत राहता, हेच खरे ना ” ?

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

प्लेगमुळे स्थलांतर

प्लेगमुळे स्थलांतर

अनेक रोग शरीरावर आघात करतात. ते देहाला घातक वा मारक देखील असतात. मनुष्यप्राणी आपल्या बुद्धीप्रभावानें त्यांच्यावर मात करण्याचा प्रयत्न करतो. दोन आघाड्यावर हे प्रयत्न झालेले जाणवतात. निश्चीत विज्ञान ज्ञान प्राप्ती व लोक अनुभवानुसार त्याची उकल करतात. कॉलरा, प्लेग, नवज्वर,धनुर्वात, क्षय आणि अशाच रोगाविषयी असेच झाले. प्रथम ते रोग अज्ञात होते, परिणामाची भिती होती. त्याच्या पासून बचाव म्हणजे, त्या वातावरणापासून अलिप्त राहण्याचा प्रयत्न. तांत्रिक द्रिष्टीने ते फार गैर सोईचे होत असे. आता त्यावर अनेक उपाय निघालेत. लसीकरण हे महत्वाचे हत्यार सापडले. प्लेग असाच जीव घेणारा रोग. त्याने प्रचंड संखेने बळी घेतले. आता तो काबूत आलेला आहे. त्यारोगाचे भयानक तांडव, त्यानी उडवलेला हाःहाःकार प्रत्यक्ष बघण्याचा, अनुभवन्याच्या दुर्दैवी काळातून आम्ही गेलो. आता विज्ञान प्रगतीमुळे सुदैवाने तो प्रसंग दुर्मिळ झाला आहे. परंतु आज देखील त्याची आठवण अंगावर शहारे आणतात.
फार जुनी गोष्ट, सत्तर वर्षा पुर्वीची. बीड जिल्ह्यातील माजलगांव हे तालुक्याच्या ठिकाण. माझे वडील शासकीय सेवेत तेथील प्रमुख आधिकारी होते. मी बालवयांत होतो. कळले की प्लेग ह्या रोगाची साथ सुरु झाली. अनेकजण मृत्युमुखी पडत होते. त्याला कारणीभुत असलेल्या उंदरांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढली होती. अर्थात उंदीर हे लक्ष्य ( Target ) केले जाते. पिसा मुळे हे होते. पिसांचा दुसरा हल्ला माणसावर होतो. ताप, अंगदुखी, वांत्या, काखेमध्ये गोळा (सुज) येऊन रोग झपाट्याने वाढत जातो. हा रोग शरीराला थोड्याच वेळांत नष्ट करतो. त्या रोगवर त्याकाळी योग्य रामबाण उपाय नव्हते. त्या काळी रोगाचा प्रतिकार करताना त्या रोगाच्या वातावरणामधून त्वरित अलिप्त होणे हे केले जात होते. हे कांही काळासाठी असे.
गांवामध्ये त्याकाळी दवंडी पिटून जनजागृण केले गेले. त्याप्रमाणे सर्वाना स्थलांतर करण्यास मार्गदर्शन केले गेले. सर्व गांव सोडून त्या दुषीत व प्लेगयुक्त वातावरणातून दूर जावे लागले. शासकीय आदेश सर्व स्थानिक जनतेला दिले गेले. स्थलांतराची प्रक्रिया त्वरीत होऊ लागली. आम्ही गावातील सर्व जनतेचे स्थलांतर, त्यांची धावपळ, कष्ट, गैरसोयी, निराशा बघीतली. लहान असलो तरी त्यांची दुःखे जवळून अनुभवली. आठवणीने आज त्याची सत्यता व गांभिर्य मनाला पिळवटून टाकते. निसर्गाच्या चक्रांत माणसे कशी हातबल होतात, हे बालपणीचे द्दष्य आजही चटका लावते. मृत्युच्या थैमानाला रोकण्यास सारे असमर्थ वाटत होते. आम्ही पण माजलगांवाच्या बाहेर २-३ मैलाच्या अंतरावर शेतामध्ये झोपड्या उभारुन राहू लागलो. वडीलांचे तेथेच ऑफिसपण उभारले गेले. सर्वजण नजदीकच राहात होते. सर्व शाळा दोन महीने बंद होत्या. तो काळ आम्ही मुलानी निसर्गाच्या सान्निध्यात घालविला. न विसरणाऱ्या त्या आठवणी होत्या. गेल्या ७५ वर्षामध्ये त्यानंतर प्लेगसाठीचे गांव स्थलांतर झाल्याचे बघण्यात वा ऐकण्यांत आले नाही. आजच्या आधुनिक वैद्यकीय विज्ञान शास्त्राने बरीच प्रगती केली आहे. बऱ्याच जुन्या रोगांना समुळ नष्ट केले आहे. अर्थात त्याच वेळी नविन नविन रोगाबद्दल माहीती पुढे येत आहे. मात्र कोणत्याही नविन रोगाची केवळ चाहूल लागताच, जगातील सर्व विद्वान वा शास्त्रज्ञ एकत्र येतात. चर्चा करतात, अभ्यास करुन, प्रयोग करुन उपाय शोधतात. निसर्ग व मानव ह्यांचा असा संघर्ष चालूच राहणार.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

निसर्गाची अशी ही खेळी

निसर्गाची अशी ही खेळी

एक आमेरिकेच्या वैद्यकीय मासिकांत, वैद्यकीय जीवशास्त्र Biomedical Science ह्याच्यावर आधारीत एक अहवाल वजा लेख वाचण्यांत आला. लेख मनोरंजक परंतु खुप माहीतीपर होता.
पुरुष बीज आणि स्त्री बीज ह्यांच्या संयोगाने, स्त्रीच्या गर्भांत नवीन जीवाची उत्पत्ती व वाढ होऊ लागते. त्यांत दोन्ही लिंगांचे समसमान गुण एकत्रीत होतात. बस फक्त येथपर्यंतच दोन्ही बीजांचा सहभाग. नंतर मात्र गर्भ — बीजधारणा, बीजांकुर, त्यांची वाढ, नवजीवाला जन्मला घालणे, त्याला जगामध्ये स्वतंत्र अस्थित्व देऊ करणे ह्या सर्व स्त्री तत्वाशीच संबंधीत भाग असतो. पुरुषाचा सहभाग, पुरुष बीज जो गर्भधारणेतील एक भाग, येथ पर्यंतच मर्यादेंत कार्य रहाते. जरी महत्वाचे असले तरी. वैद्यकीय रीपोर्ट मधील Biological Science सांगते की कोणतेही मुल फक्त स्त्रीचेच. जीच्या गर्भामध्ये प्रथम रुजून, उगम पाऊन, मार्ग काढीत जगांत पदार्पण केलेले असते. त्या Biological Scientist नुसार नवबालकाच्या जन्मचक्रांत पुरुषांचा फक्त सात (७ %) टक्के इतका सहभाग असतो. ह्या वुलट बाकीचा त्र्याणव (९३ %) टक्के इतका सहभाग स्त्रीचा असतो.
हासू येते बघा. काय ही दादागिरी पुरुष वर्गाची ? वंश निर्मीतीमध्ये त्याचा अल्प सहभाग असतो. तरी त्याने अडदांड, रानटी, व अहंकारी वर्तनाने स्त्रीयाना सतत आणि प्रत्येक बाबतीत दुय्यम ठरविले. आपला खोटा मोठेपणा प्रस्थापित करण्याचे दुःसाहस केले आहे.
पुरुष बीज , स्त्री बीज ही दोन बीजे एक होतात. दोनचे एक हे पहीले गणित. नंतर पुन्हा एकचे दोन हे दुसरे गणित. दोनचे चार, चारचे आठ, आठचे सोळा, सोळाचे बत्तीस ह्या प्रमाणे चक्र सुरु होते. व त्यांची झेप वेगाने व पटीत होत जाते. प्रचंड वाढ व आकार घेत गर्भ वाढतो.
अचानक माझ्या डोळ्यासमोर ‘सलीम’ आला. हो ओळखलत तुम्ही. तोच ‘शहींशहा जहांगीर.’ वडील थोर शांत स्वभावाचे राजे अकबर आणि आई राजपूत घराण्यातली एक आक्रमक व्यक्तीमत्व जोधाबाई. दोघांच्या मिलनातून जन्माला आला राजकुमार शहजादा सलीम अर्थात जहांगीर. ज्याच्यामध्ये त्या Biological Scientist नुसार होते जोधाबाईचे ९३% सळसळणारे गुणधर्म. ज्याने पुढे सुंदर युवती अनारकलीच्या प्रेमापाई जन्मदात्या बापाशीपण बगावत केली होती.
७ % अकबर राजाचे व ९३ % राजपुत जोधाबाईचे गुणांक.
तरी संस्कार, धर्म, परंपरा, सामर्थ्य, शक्ती, व मुख्य म्हणजे सत्ता. ह्यांच्या प्रचंड माऱ्याने त्याला राजशाही वंशावळीतच जावे लागले. ह्याला लोक मान्यता होती.
कसा टिकेल त्या रुळलेल्या वैचारीक चक्रांत तो Medico Biological Scientist. त्याच्या अभ्यासाला, सुत्राना, पहाणीला, अहवालाला, प्रथम इतर जगांतील त्याच क्षमतेच्या शास्त्रज्ञांचा वैचारीक दुजोरा हवा. हे मात्र एक इतिहासीक वैज्ञानीक सत्य आहे. की कोणत्याही प्रचलीत गोष्टीना नव्या विचारांनी जेव्हां धक्का दिला, सामान्य जनानी त्याला विरोध केला. काळ बदलला व समज वाढली की साऱ्या परंपरा बदलू लागतात.
निसर्गाची हीच यशस्वी खेळी ठरते. अज्ञानांत हे माझे म्हणणारे, ज्ञान मिळताच हे सारे तुझेच म्हणतात. पुरुष प्रधान संकल्पनेला धक्का पोहचणारा हा एक विचार असेल कां ?.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com