Monthly Archives: डिसेंबर 2013

बघूनी सू्र्यपूजा पावन झालो

बघूनी सू्र्यपूजा पावन झालो

हासत आली सूर्य किरणे,        झरोक्यातून देव्हाऱयात

न्हाऊ घालूनी जगदंबेला,        केली किरणांची बरसात

पूजा केली किरणांनी,          जगन्माता देवीची

प्रकाश स्पर्शूनी चरणाला,     केली उधळण सुवर्णाची

तेजोमय दिसूं लागले,        मुखकमल जगदंबेचे

मधूर हास्य केले वदनीं,     पूजन स्विकारते सूर्याचे

रोज सकाळी प्रातःकाळीं,      येऊनी पूजा तो करितो

भाव भक्तिने दर्शन घेऊनी,      सृष्टीवर किरणे उधळितो

कोटी कोटी किरणांनी,       तो देवीची पूजा करितो

केवळ त्याची पूजा बघूनी      पावन मी होतो.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

आमचे खेळ

      आमचे खेळ

या मित्रांनो सारे या
सर्व मिळूनी खेळू या
खेळ आमच्या देशाचे       गरिबांसाठी सोईचे
मैदान नको मोठे ते         वस्तूही अल्प लागते
              खेळांना त्या समजून घ्या – – –     1)
या मित्रांनो सारे यासर्व मिळूनी खेळू या
हुतुतूचा खेळ बघा       दोन गट, छोटी जागा
स्पर्श रेषा ओलांडूनी      ह्तुतू म्हणती तोंडानी
एकाच दमात भिडू मारू या – – –       2)
या मित्रांनो सारे यासर्व मिळूनी खेळू या 
खो खो मध्ये चपळाई      चकमा देण्याची घाई
उलट सुलट बसे           एकाच रांगेत दिसे 
मिळता खो भिडूला पकडू या  – – –      3)
या मित्रांनो सारे यासर्व मिळूनी खेळू या 
लपंडाव हा खेळ कसा         लपलेल्यांना शोधत बसा
राज्य येते त्यावरती           शोध घेई सभोवती
तीक्ष्ण नजर ती ठेऊया – – –        4)  
या मित्रांनो सारे यासर्व मिळूनी खेळू या 
आट्या पाट्या च्या खेळात       कांही घरे आखतात 
सीमेवरती दक्ष राहती           घरात येण्या ते रोकती
चपळाईने घरात शिरू या – – –      5)
या मित्रांनो सारे यासर्व मिळूनी खेळू या
एका पायाची गम्मत          लंगडी आहे माहित?
उड्या  मारीत पळावे        भिडू सारे पकडावे
आखल्या रेषेतच खेळू या – – –       6)
या मित्रांनो सारे यासर्व मिळूनी खेळू या
एक दिलाने खेळू या        आनंद सारा लुटू या
निरोगी सदा राही तो       प्रफुल्ल मन बाळगतो
शीण अभ्यासाचा घालवू या – – –       7)
मित्रांनो सारे यासर्व मिळूनी खेळू या

डॉ. भगवान नागापूरकर

bknagapurkar@gmail.com

चंद्र- ग्रहण

 

चंद्र- ग्रहण

राहू केतुनो सोडून द्या तुम्ही,       मगरमिठीतून चंद्राला

बघा बघा ह्या प्रथ्वीवरती,        काय तो हा: हा: कार मजला

प्रेमिजानांचा प्रेमबिंदू तो,        सौंदर्याचा मुकुटमणी

झाकळला सारा नभात हा,      म्हणती त्यास गिळला कुणी

आत्मा जाता सोडून देहा,       उरे न कांही मागे

चंद्र चांदणे नभात नसता,       सौंदर्याची मिटतील अंगे

सौंदर्यातची  बघतो सारे,       जगण्यासाठी सौंदर्य हवे

विश्वचक्र हे फिरत रहाण्या       चंद्राचे आस्तित्व सतत हवे

नष्ट होतील जीवजीवाणू,      आनंद त्यांचा जाईल विरुनी

बलिदानाच्या पुण्याईने परि        सुटेल चंद्र मगरमिठीतून

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

चक्षु पटलावरील ती छबी

चक्षु पटलावरील ती छबी

पंडित जवाहरलाल नेहरू भारताचे पंत प्रधान असतानाचा एक छोटासा परंतु माझ्या जीवनातला  महान ऐतिहासिक  प्रसंग आठवतो. गुबर्ग्याला  पंडितजी  कोणत्यातरी  भव्य वास्तूच्या  संकल्पित   इमारतीच्या पायाभरणी समारंभाच्या उद्घाटनासाठी आलेले होते. आजकालचा दहशतवाद तेंव्हा मुळीच नव्हता. कुणीही पंत प्रधानाच्या जवळ जाण्यास फारशी आडकाठी नसे.  माझे वडील तेथे वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी होते.  फक्त  निमंत्रीतानाच  आत प्रवेश दिला जात होता. तीन स्त्रीयांना तीन रंगाच्या ( भगवा पांढरा नी हिरवा ) साड्या परिधान  करून  प्रवेश  द्वाराजवळ   फुले, बुके, आरतीचे ताट घेवून  पंडीतजीच्या  स्वागतासाठी उभे केले होते. त्या तिघीमध्ये  माझी आई देखील होती. मी एक शाळकरी मुलगा होतो व थोडे अंतर सोडून मागे उभा होतो.

पंडितजी आले. हसत त्यांनी सर्वाना अभिवादन केले. त्या तिघींनी  दिलेली  फुले, बुके, आणि  ओवाळणी मान्य करीत चेहऱ्यावर समाधान व्यक्त करीत ते  निघून गेले. एक क्षण , फक्त झलक,  जशी आकाशातील वीज  चमकून  सारा  आसमंत प्रकाशत व्हावा, तसाच. तो अतिशय क्षणिक व छोटा प्रसंग माझ्या डोळ्यांनी जो टिपला, तो माझ्या जीवनासाठी ऐतिहासिक म्हणून मन व हृदयावर   कोरला गेला होता.

माझ्या डोळ्यातही एक दैवी असा  कॉम्पुटर  (Computer ) आहे. असे  मला  वाटते.  तो दैवी माऊस( Mouse )  क्लीक केल्यावर, माझ्या मनावर  कोरल्या  गेलेल्या  साऱ्या आठवणीना  उजाळा मिळतो. त्या काळाची  त्यावेळची मी माझ्या डोळ्यांत  सामावलेली ती छबी, आजही चटकन  Display अर्थात  प्रक्षेपित  होते. माझ्या अंतर मनाला ते चित्रण दिसू लागते.

मी आजही त्या प्रचंड  वेगाने  जाणाऱ्या,  विज्ञान शास्त्राच्या त्या   यशाची  आतुरतेने वाट बघत आहे. जेंव्हा ते  यांत्रिक पद्धतीने माझ्या चक्षुपटलावरची  ती छबी कागदावर प्रक्षेपित करण्यात  यश मिळवितील.

ती  माझ्यासाठीची अत्यंत दुर्मिळ परंतु महत्वाची घटना असेल.  कदाचित मीच प्रथम त्या यंत्रणेचा उपभोक्ता  असेन.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

राधेचे मुरली प्रेम

राधेचे मुरली प्रेम

मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला

कुज  बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला    ।।धृ।।

त्या सुरात कोणती जादू

ती किमया कशी मी वदू

सप्त सुरांचा निनाद उठुनी

खेचून घेती चित्ताला – – –   ।।१।।

विसरली राधा सर्वाला

धेनु वत्से बावरली

बाल गोपाल आनंदली

रोम रोम ते पुलकित होऊनी

माना डोलती सुरतालाला – – –   ।।२।।

विसरली राधा सर्वाला

प्रभूचा होता ध्यास मनी

ती बघे हरिला रात्रन दिनी

जे शब्द निघाले मुरलीतूनी

हाका मारती  ते तिजला  – – –   ।।३।।

विसरली राधा सर्वाला

हरिच्या ओठ्ची भाषा

सुरात ऐकता येई नशा

तो नाद एकला कानी पडता

भाव समाधी लागली तिजला  – – –   ।।धृ।।

विसरली राधा सर्वाला

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com