Daily Archives: जून 15, 2011

लाडक्या नातीस

लाडक्या नातीस

 

जन्मापासूनी बघतो तूला

परि जन्मापूर्विच ओळखले

रोप लावले बागेमध्ये

फूल तयाने दिले

चमकत होती नभांत तेंव्हा

एक चांदणी म्हणूनी

दिवसाही मिळावा सहवास

हीच आशा मनी

तीच चमकती गोरी कांती

तसेच लुकलुकणे

मध्येच बघते मिश्कीलतेने

हासणे रडणे आणि फुलणे

चांदणीचा सहवास होता

केवळ रात्रीसाठी

दिवस उजाडतां निघून गेली

आठवणी ठेवून पाठी

नको जाऊस जरी ही इच्छा

परि जाशील सोडून दुजा घरी

आठवणीसाठा देत जा मजला

दिलासा तोच हे समाघान धरी

(कविता)