Monthly Archives: ऑक्टोबर 2015

रोपण – एक डागडूजीची प्रक्रिया

रोपण – एक डागडूजीची प्रक्रिया

बाल कवीची कविता वाचीत होतो.

हिरवे हिरवे गार गालिचे

हरित तृणाच्या मखमालीचे

त्या मखमालीवरती

फुलराणी ही खेळत होती.

सुंदर गवतांची हिरवळ असलेले गालिचे बघण्याचा व अनुभवण्याचा योग अमिरीकेतील वास्तव्यात असलेल्या मुलाकडे   प्रखरतेने येत असे. प्रशस्त घरे सभोवतालची बाग, त्यातील रंगबिरंगी फुले आणि सारा परिसर गवतानी अच्छादलेला जणू गवताचे गालिचे सर्वत्र पसरलेले बघून मन खूपच प्रसन्न होत असे. वाढणाऱ्या गवताची नियमित कटिंग केली जात असे. त्यामुळे जमिनीवर फक्त एक दीड इंच उगवलेले तृण, त्यातील सारखेपणा व मउ   परंतु नाजूक बोचरेपणा त्यावर चालताना एक वेगळ्याच स्पर्शाची जणीव होत असे. कदाचित म्हणूनच त्याला गालिच्याची उपमा दिली असावी. बागेतील पट्ट्यामध्ये  तीन चार  ठिकाणी गवताची वाढ अनियमित झालेली दिसली.  त्यामुळे तीन वा चार चौरस फुटांचे पट्टे उघडे पडून त्यावर  गावत वाढलेले नसल्याचे जाणवले. पाणी व कीटक नाशक फवाऱ्याचा  मारा नियमित मिळत असून देखील. सुटीचा दिवस मुलाने नर्सरीकडून तयार गवताच्या गालिच्याचे 3×3 असे कांही शिट्स अर्थात तुकडे आणले होते. कारखान्यात केलेले हे तुकडे होते. माती व खत  यांचे मिश्रण प्रेस करून. त्यावर गवताचे रोपण केलेले होते. त्यामुळे एखाद्या गालिच्याच्या तुकड्या प्रमाणे हे भासत होते. फक्त त्यांत गवताचा  अर्थात जीवन्तपणाचा भाग नजरेत भरत होता. मुलाने प्रथम बागेतल्या  अनियमित झालेल्या व गवताची योग्य वाढ न झालेल्या पट्याची थोडीशी खोदाई केली. सर्व स्थर सारखे केले. पाण्याची फवारणी केली. ते गवताचे आणलेले शिट्स त्या जागेवर  घट  बसवून  दिले.  थोड्याच दिवसात सारा परिसर  एकसंघ झालेला  जाणवला. एक मोठा गवताचा गालीच्या तेथे अंथरल्याचा  भास होऊ लागला.

हे सर्व बघताना वैद्यकीय जिवनातील एक अनुभव आठवला. अपघातामध्ये भाजलेल्या एका व्यक्तीला आणले होते. चेहरा छाती व पोटाच्या  भागावर जाळल्याच्या  जखमा झाल्या होत्या. कांही भागाची कातडी  पूर्ण जळून गेल्यामुळे जो ग्याप पडला होता,  त्या ठिकाणी कातडीचे रोपण ( Skin transplant )  केले गेले. जखमा चांगल्या, निर्जंतुक केल्या गेल्या. नंतर त्याच व्यक्तीच्या मांडीवरची, पायावरची, हातावरची पाठीवरची कातडी शस्त्र मशीनने छीलुन  काढली गेली. त्याचे लहान लहान तुकडे जळलेल्या व न भरलेल्या जागेवर व्यवस्थित लाऊन मलमपटी केली गेली. चांगली ड्रेसिंग केलेली चामडी रोपन पकडली जाऊन कातडीचा भाग पुर्वव्रत झाला. जेथून कातडी काढली होती त्या जागी पुन्हा कातडी येऊ लागते. कातड्याच्या रोपनामध्ये त्याच रोपनाची कातडी रोपनासाठी गरजेचे असे नाही. कुण्याही व्यक्तीची निरोगी कातडी देखील घेतली जाते. फक्त ती घेण्यास योग्य असावी. गवताच्या रोपन केलेल्या गालिच्यात व देहाच्या कातड्याच्या रोपन केलेल्या प्रक्रियेमध्ये बरेच साम्य असते. जिवंत प्राण्यातील अवयांची सतत होणारी वाढ झीज व सुधारणा हे अत्यंत  महत्वाचे गुणधर्म आहेत.   ह्याचाच आधार रोपन ह्या प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने घेतला जातो. निकामी झालेले अपघात ग्रस्त झालेले अवयव पूर्णपणे बदलण्याची प्रक्रिया ह्याचमुळे साध्य केली जाते.
नेत्रदान किडनीदान,  हार्ट ट्रान्सप्लांट कातडी दान आणि ह्याच प्रकारे जवळ जवळ सर्व अवयवांचे रोपन करणे साध्य झाले आहे. मेंदूच्या बाबतीत मात्र वैद्यकीय शास्त्र अजून परिपूर्ण झालेले नाही.
बागेतल्या कुंड्यात झाडे लावावी, नको असलेली काट छाट करावी दोन झाडांचे एकत्र रोपण करावे, हे सारे जितके सहज व शक्य झालेले आहे तसेच मानवी देहावर देखील सर्व प्रक्रिया शक्य होत आहेत. तो काळ आता नजीक येऊ लागला आहे जेव्ह्ना प्रयोग शाळेत जिवंत देहाची निर्मिती सहजतेने होईल. ह्यात शंका नसावी.

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

आठवण चाळवणारे अनामिक !

आठवण चाळवणारे अनामिक !

एक दिवशी एका अनामिक व्यक्तीला  मी बागेत बघितले. एका बाकावर डोळे  मिटून चिंतन करीत,

शांत  बसलेले होते. मी अतिशय अचंबित झालो. तीच   आकृती तीच चेहऱ्याची ठेवण, तशीच शांत मुद्रा, तशीच बसण्याची पद्धत. अगदी तसेच जसे माझे वडील होते. पंचवीस वर्षापूर्वीच ते वारले. ज्यांनी माझ्या  स्मरणात आठवणीचे कायमचे घर केलेले आहे. तीच छबी जागृत झाल्याचे  जाणवले. दूर बसून मी त्यांना बराच वेळपर्यंत न्याहाळले. कांही वेळाने ते उठले. चालू लागले. काय  आश्चर्य  त्यांच्या चालण्याची पद्धत  देखील हुबेहूब  तशीच. ज्यांनी माझ्या वडिलांना बघितले असेल असा  कुणीही माझ्याशी सहमत होईल की त्या अनामिक व्यक्तीची शरीर संपदा माझ्या वडिलांशी मिळती  जुळती होती.  मी देखील उठून त्यांचा पिच्छा  करू लागलो. मला फार  उत्सुकता लागलेली होती  की ही व्यक्ती कोठून आली. कोठे राहते? मला दुरूनच त्यांचा ठावठिकाणा कळला. माझ्या   स्मृतींना  प्रेमाचा  उजाळा देणारी, वडिलांच्या सहवासाचा आनंदमय इतिहास ज्यागृत करणारी व्यक्ती, मी  गमाऊ इच्छित नव्हतो. अचानक भेटली व गायब झाली असे होऊ नये. त्या आनंदायी   आठवणी  मला जिवंत ठेवायच्या होत्या. आठवणीसाठी माणसे  आपल्या प्रेमाच्या  माणसांच्या तसबिरी  भिंतीवर टांगतात. दृष्टी समोर नसलेल्यांना सतत जागृत  ठेवतात. क्वचित प्रसंगी हेच कार्य  कुणाचे  पुतळे करतात. केंव्हा केंव्हा  तर अशा  व्यक्तींच्या कांही वस्तू जसे काठी, चष्मा पेन कपडे इत्यादी  तुम्हास त्यांच्या  काल्पनिक सहवासाचा लाभ देतात.

त्या प्रसंगानंतर मी त्यांना बराच वेळा बघितले. फक्त येथेच थांबलो. त्यांना भेटणे, त्यांची ओळख वाढविणे, त्यांचा सहवास जवळून घेणे, हे टाळले. एक भीती वाटत  होती की त्या अनामिक व्यक्तीच्या जवळीकतेने मला त्यांच्या बाह्यांगा प्रमाणेच अंतरंग कळेल.त्यांच्या स्वभाव गुणाच्या  मी जवळ जाईन. कदाचित हे धोक्याचे ही ठरू शकेल.ईश्वराने जी प्रचंड  जग निर्मिती  केलेली आहे, त्यात विविधता  हाच त्याचा  कलागुणांचा अविष्कार  आहे. जगण्याचे आणि आपसातील  प्रेमाचे ते एक महान तत्व ठरू शकते. जर सारखेपणा  हा खूपच प्रमाणात दिसून आला तरतो मनातला  आनंद नष्ट करण्यास करण्यास कारणीभूत होईल. मला भेटलेल्या  त्या अनामिक व्यक्तीच्या बाह्य  ठेवणीमध्ये  ज्या लकबी आढळल्या, त्या मला आठवणीच्या भूत काळात नेवून आनंदित करीत होत्या, येथपर्यंत  ठीक होते.  पण जर मी त्या व्यक्तीचा स्वभाव विशेष बघितला तर माझ्या मनांत त्यांच्या विषयी कोरली गेलेली माझ्या वडिलांची छबी कदाचित एकदम बदलून जाईल. आणि हा बदल  कायम स्वरुपीही असेल.  निसर्गाने एक गम्मत म्हणून  कां होईना जी व्यक्ती माझ्या समोर उभी केली, तिला मी तेवढ्याच अंतराने आणि तेवढेच समजून आनंद घेऊ इच्छितो. फक्त एक आठवण चाळवणारे अनामिक.

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सब खाओ ! मगर मेरा भेजा मत खाओ

सब खाओ ! मगर मेरा भेजा मत खाओ

डॉक्टर आर. डी. लेले हे आंतरराष्ट्रीय   कीर्तीचे चीकीत्सक   Physician म्हणून प्रसिद्ध. ते भारताच्या राष्ट्रपतीचे विशेष आरोग्य सल्लागार म्हणूनही नांव लौकिकाला आलेले. त्यांच्या सुरवातीच्या सेवेच्या काळांत  ते औरंगाबाद शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात  प्राध्यापक होते.  ते अतिशय उत्तम शिक्षक  होते. प्रत्येक  विषयाची उकल अगदी सहजतेने व विद्यार्थ्याला  व्यवस्थित  लक्षांत यईल ह्या पद्धतीने त्यांची शिकवण्याची हातोटी होती. विषयाला  कंटाळवाणे न होऊ देता  अधून मधून  मार्मिक विनोद करणे  ही त्यांची पद्धती होती.  एके दिवशी ओ. पी. डी. (Out Patient Department )   मध्ये ते पेशंटला तपासत होते. विद्यर्थ्यांचा एक  गट त्यांचे मार्गदर्शन  ऐकत  होता.  प्रत्येक रुग्णाला तपासून त्याला वैद्यकीय सल्ला देत असताना, विद्यार्थ्यांना त्याच्या रोगा विषयी टिपणी करून समजून सांगत होते. एक मुसलमान महिला  आपल्या  मुलाला घेऊन आली होती. तपासणी  झाली,  रोग निदान झाले. तिला मार्ग दर्शन करून औषधी लिहून दिली गेली. विद्यार्थ्याकडे  वळून ते त्या रोगावर चर्चा  करु लागले. ती तिच्या मुलाला घेऊन जाऊ  लागली.

परंतु लगेच थांबून तिने विचारले ” लडकेको खानेको तेल घी दे  सकते   क्या ?”

डॉक्टर लेले   “  हां दे सकते ”. डॉक्टर लेले पुन्हा विद्यार्थ्याकडे वळून शिकऊ लागले. परंतु तीच बाई परत आली व विचारू लागली. ” डॉक्टर साहेब क्या  लडकेको  अंडा, मटण, ये दे सकते क्या?”  ते तिच्याकडे मानेने वळून म्हणाले  ” चलेगा दे सकते. “  आणि पुढे शिकवणे चालू ठेवले. आश्चर्य म्हणजे तिच्या शंका  अद्यापि संपल्या नव्हत्या. पुन्हा ती परतून आत आली. तिला बघताच डॉक्टर लेले एकदम म्हणाले

” देखो बहनजी आप हर चीज खाओ मगर मेरा भेजा मत खाओ.

एकदम सर्व  विद्यार्थ्यामध्ये  हास्याचा   स्फोट झाला.

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

काळाची काठी !

काळाची काठी !

एका सभागृहामध्ये सत्संगचा कार्यक्रम होता. मी त्याचा आस्वाद घेण्यसाठी गेलो होतो. हालके हालके श्रोते जमू लागले. प्रवेश दारावर मी आलो. अचानक माझी नजर एका छोट्या किड्यावर पडली. दाराच्या बाजूस तो पडला होता. त्याच्या हालचाली वरून त्याला दुखापत झालेली असावी असे वाटले. त्याची तगमग चालू असून तो उलटा पडलेला होता. त्याच्या अवस्थे विषयी भूतदया वाटली. क्षणात एक विचार आला की हा किडा दाराजवळ पडलेला आहे, लोकांची जा ये चालू आहे. दुर्दैवाने कुणाच्यातरी पायंदळी तो चिरडला जाईल. मी त्याला एका काडीवर उचलून बागेतल्या एका छोट्या झाडावर नेऊन ठेवले. मानसिक समाधान वाटले, की आपण त्याला त्यावेळी तरी मृत्यूपासून दूर नेले. पण केवळ कांही क्षणच गेले असतील, एक पक्षी तेथे झेपावून आला व त्याने त्या किड्याला अलगद उचलून नेले. एका जीवाचा अंत होताना दिसला. माझे मन खंतावले. माझा तर्काधीष्टीत हिशोब चूक वा बरोबर? समाधान हे देखील एक मानसिक शास्त्र असते. निर्माण झालेली परिस्थिती माणूस बदलू शकत नाही. परंतु त्याला वेगळा मार्ग देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या विचारांचे जे स्तर असतील त्याप्रमाणे तो योजना आखण्याचा विचार करतो. निसर्गाला मात्र तसेच अभिप्रेत असेल असे नाही. निसर्ग आपली चाल त्याच्याच पद्धतीने चालू ठेवतो. येथेच वैचरिक विविधता निर्माण होते. काळाच्या हाती एक दंडक (काठी) असतो असे म्हणतात . ज्याच्या एका टोकावर स्थळ व दुसऱ्या टोकावर वेळ ही कोरलेली असते. जेंव्हा एक टोक स्थळ निर्देश करते, त्याच वेळी दुसरे टोक वेळेची चाहूल टिपते. जीवनाच्या अंतिम मार्गावर स्थळ आणि वेळ यांची विधात्याने नोंद केलेली असते. म्हणूनच ते प्रत्येकाला अनिश्चित घटना परंतु निश्चत सत्याकडे नेते. काळाचा दंडक स्थळ वेळ ह्याची जेथे गांठ पडेल तेथेच आघात करतो.

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com