Monthly Archives: एप्रिल 2014

मला देव दिसला- भाग २

मला देव दिसला-   भाग २

000 पूढे भाग २ वर

त्या परमात्म्याच्या शोधात अनेक यात्रा केल्या. अनेक तीर्थस्थानाना भेटी दिल्या. जसे श्री कैलास मानसरोवर, चारधाम, दत्तधाम, सर्व ज्योतीर्लिंग स्थाने, वैष्णवदेवी अमरनाथ, रामेश्वर आणि अशी अनेक देवालये, मंदिरे यांना भेटी दिल्या. भारतातील जवळ जवळ सर्व प्रसिध्द मंदिराना भेटी दिल्या, देवदेवतांचे भक्तीभावाने दर्शन घेतले. ही सारी महान देवस्थाने, लाखो करोडो भक्तांच्या भक्तीरसांत वाहून निघालेली होती. कित्येकांनी भक्ती व तपश्चर्या तेथे जाऊन अर्पण केलेली. ती भूमि, तो परिसर पवित्र करण्यात सहभाग घेतलेला. तेथील देवदेवतांच्या मुर्तीमध्ये दिव्यत्वाच्या शक्तीची साठवणूक केलेली, अशा मंदिर परीसरांना भेट देण्याचा प्रयत्न केला गेला. यथासांग पूजा, भजन व दर्शन घेत गेलो. त्या देवतांमध्येच श्री जगदंबेला बघण्याचा प्रयत्न केला.

हे सारखे शारीरिक होत होते. मनाला, भावनेला भक्तीला समर्पण करण्याचा प्रयत्न होत होता. हे सारे क्रियात्मक, योजनात्मक (preceednral approch)होत होते. ईश्वरप्रातीसाठी काहीतरी रचनात्मक आणि परंपरागत गोष्टी करीत असल्याची भावना होत होती. समाधान मिळत होते. आनंद प्राप्त होत होता. परंतू शांतता अर्थात ‘मनाची शांतता’ मात्र मुळीच हाती लागली नाही. दैनंदिन पूजा-अर्चा, नामस्मरण, भजन-किर्तन, पवित्र स्थळांचे , मंदिरांचे दर्शन, पवित्र नद्यांचे-जलांचे स्नान ह्या सर्व बाबी मन एकाग्र करून भक्तीने करीत गेलो, परंतू खरी ‘मानसीक शांतता’ केव्हाच मिळाल्याचा भास झाला नाही. माझे गुरू श्री शंकराचार्य जेरेस्वामी 5 यांना शरण गेलो. चर्चा झाली. सान्तवन केले गेले. मार्ग सुचविले गेले. त्यावर चिंतन करून त्या मार्गाने जाण्याचा प्रयत्न झाला.

स्वभावाची ठेवण, वागणूकीची पध्दत, मनाचे विकार हे सारे ‘खरी शांतता’ मिळण्या मधल्या बाधा होत्या. आजपर्यतेचे जे प्रयत्न झाले. हे सारे बाह्यांगी होते. त्याचा आनंद व समाधान तीतकाच सिमीत होता. आत्मीक आनंद प्राप्त करायचा. असेल तर अंतरमुख होण्याची गरज होती. चांगला, प्रेमळ व निस्वार्थी स्वभावात नेहमी राहण्याची सवय ही खरी प्राथमिक महत्वाची पायरी होती. सभोवताली असलेल्या वातावरणाशी, दैनंदीन संपर्कामध्ये येणाऱ्या व्यक्तीशी संसार होत जाणाऱ्या घटनांशी मनाचा, विचारांचा सतत संपर्क येत असतो. मन त्या संपर्काला त्याप्रमाणेच प्रतिसाद देत असते. वैचारीक स्वभावाची ठेवण, राग, लोभ मोह इत्यादी पढरिपूंचा पगडा ह्याचा परिमाम प्रत्येक घटनेशी प्रतीक्रीया होण्यात होतो. ह्या ठिकाणी योग्य वा अयोग्य ह्या परिणामापेक्षा इच्छा व आवड ह्या भावनीकबाबींचा जास्त विचार मन करते. शेवटी त्या परिस्थीतीतून उत्पन्न होते ती अशांत “मनाची अवस्था” शांत मनाने विचार केला, चिंतन केले तर तुम्ही गरजेशिवाय प्रत्येक घटनेमध्ये, प्रत्येक व्यक्तीच्या संवादामध्ये, सहववासामध्ये विनाकारणच स्वत:ला गुरफटून गेत असल्याची सत्यता पटेल. जेथे सहवास तेथे विरोधाभास होण्याची खूपच शक्यता असते. हे तत्वज्ञान जर उमगले, अंगीकारले तर बऱ्याच अंशाने मनाच्या अंशात होण्याला पायबंध पडू शकतो. अभ्यासपूर्वकच आपल्या मनाची ठेवण व विचारसरणी कशी निर्माण झालेली आहे त्याचे चिंतन व्हावे. त्याचबरोबर इतरांच्या विचार व योजनाबदल सजग असावे. जगाला बदलून टाकण्याचा त्यांच्यावर आपले विचार थोपविण्याच्या प्रयत्नापेक्षा स्वत:च्या मनाला विचारांना परिस्थीतीनुसार ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न व्हावा. आपण बदलेला तर जग बदलले ही बाब तुम्हाला दिसू लागले.

ईश्वर दर्शन जे सर्व प्रयत्नकरून भेटत नव्हते, दिसत नव्हते. त्याचे कारण आता लक्षात आले. असमाधानी, अशांत, लोभी, रागीट, अहंकारी, हेकेखोर, खोटे, दिशाहीन आणि अशाच दुर्गुनांनी घेरलेले, मन शांततेमध्ये राहण्याची सुतराम शक्यता नाही. ही दुर्गुणाची झाकणे प्रथम दूर व्हावयास हवीत. तरच मन शुद्ध व पवित्र स्थितीमध्ये राहील हे सत्य आहे. सत्यच फक्त ईश्वराशी एकरूप होवू शकते. इश्वरी सानिध्याच्या प्रयत्नामधील प्रमुख बाधा लक्षात आली. संकल्प तर दृढ होता, विश्वास अटळ होता. भावना ईश्वरी दर्शनासाठी प्रेरीत होत्या. त्यामुळे मनाच्या शुचिर्भूतेकडे, शुध्दतेकडे, पवित्रतेकडे जोमाने, तिवृतेने प्रयत्न करू लागलो. प्रश्न पडला केव्हा मिळणार दर्शन त्या ईश्वराचे? प्रयत्न करून आजपर्यत झाले नव्हते. जे कालचक्र भूतकाळांत गेले होते, ते कायमचे हातातून गेले होते. माझ्यासाठी तो ‘असत्य काळ’ होता.

भविष्यकाळ अर्थात येणारा, भावी काळ. निसर्गचक्रामधला एक माहित असलेला काळ, परंतू तो येवू घातलेला असल्यामुळे मानवासाठी, जीवांसाठी त्याचा प्रत्येक क्षण अनिश्चीत व अतार्कीक असा असतो. भविष्याच्या कोणत्याही अंगाची मुळीच कल्पना करता येत नाही. त्यामुळे खऱ्या विचाराने भविष्यकाळ हा देखील ‘असत्य काळ’ ह्याच सदरात जातो.परमेश्वर मला उद्या दिसेल हे हास्यापद ठरणारे आहे. कारण भविष्यकाळच जर असत्य समजला गेला तर तेथे सत्य असा तो ईश्वर कसा दिसणार?

सत्य फक्त वर्तमानकाळ हेच असते. भविष्यकाळ छलांग मारित येतो आणि क्षणातच भूतकाळामध्ये अदृष्य होतो. त्यामुळे वर्तमानकाळाचे स्वरूप क्षणाचेच भासते. येणे आणि जाणे ह्या सीमारेषांवर. मानवी विचारांच्या मोजमापांत (DIamention) ह्या वर्तमानकाळाचे अस्तित्व जाणणे ही अत्यंत कठीण बाब आहे. आश्चर्य म्हणजे फक्त हा क्षणीक वा समयशून्य वर्तमानकाळाच ‘एक सत्य’ समजला गेला. ह्याच काळांत जर झाले तर त्या ईश्वर शक्तीचे दर्शन होण्याची शक्यता असते.

श्री. गुरूंचे मार्गदशन होते की “फक्त वर्तमान काळातच तुमच्या प्रयत्नानुसार तुम्हास ईश्वर दर्शन होवू शकते.”

अध्यात्मज्ञान श्री गुरूमुळे मिळाले होते व वैद्यकीय ज्ञान जे मला संसारक्षेत्रात मिळाले त्या दोन्हींचा उपयोग घेण्याचे मनाने ठरविले. “क्षणयुक्त वर्तमानकाळ ईश्वर दर्शनासाठी फक्त मिळू शकेल” हे एक प्रचंड आवाहन होते. Challenge for my efforts and instinct desire. निसर्ग जसा मला वर्तमानकाळ देत आहे, जेवढा वेळ मला देत आहे तेवढाच वेळ स्वीकारण्याखेरीज मला गत्यंतर नव्हते. मी माझ्या इच्छेनुसार, गरजेनुसार तो काळ बदलू शकत नव्हतो. जो वेळ आहे जसा आहे, जेवढा वेळ मिळेल तेवढ्याच वेळात मला माझा इच्छीत संकल्प प्राप्त करायचा आहे.

ह्यावर मी चिंता करू लागलो. मेंदू हा एक अवयव (इंद्रिय) आहे. शरिरातील मन व बुध्दी ही मेंदूशी निगडीत असते “विचार करणे” हे मेंदूचे कार्य. हे कार्य ,सतत आणि क्षणाचीही विश्रांती न घेता मेंदू करीत असतो. हे एक जीवंतपणाचे लक्षण आहे. जोपर्यत मेंदू जीवंत आहे, विचारकार्य चालू राहते. जागृत, निद्रेत, गाढ निद्रेत, बेशुध्दावस्तेत अथवा कोणत्याही स्थीतीत जीवंत मेंदूचे ‘विचार कार्य’ अविरत चालत असते. विचार लहरी लहान असोत वा मोठ्या ह्या उत्पन्न होत राहतात. एक मात्र सत्य आहे की एकावेळी फक्त एकच विचार आले त्यांची गर्दी झाली हे जरी वाटत असले तरी ‘विचार उत्पन्न’ होण्याची क्रिया आणि क्षमता एकावेळी फक्त एक विचार उत्पन्न होणे हेच असते. विचार उत्पन्न होण्याचा वेग हा मात्र कमी जास्त असू शकतो. एका मागून एक विचार चटकन येत राहणे हा निसर्ग असतो. शरीरात ‘वासना’ वा इच्छा (or Desire) हा शरीरामधला एक नैसर्गीक वा इश्वरी गुणधर्म असतो, विचार निर्मीती ही त्या वासना गुणाचाच परिणाम असतो.

विचार निर्मीती आणि त्याचा वेग ह्या दोन्हीवर लक्ष केंद्रीत केले. एकानंतर दुसरा विचार, लगेच तिसरा चौथा विचार अशी एक प्रंचड रांगच सतत चालते. विचारांचे उत्पन्न होणे, भविष्यकाळातून लगेच वर्तमानाची रेखा पार करीत भूतकाळांत जाणे ह्या विश्लेशनासाठी वा समजण्यासाठी भिन्न बाबी आहेत. त्यांच्या वेगापुढे त्यांना विभागणे तसे अवघडच. योग सामर्थ्य व विचारांच्या उत्पत्तीकडे लक्ष केंद्रीत करण्याची प्रथम कला साध्य झाली पाहिजे. गेलेल्या विचाराला जावू देणे म्हणजे त्याकडे दुर्लक्ष करणे हे आधी अवगत केले पाहिजे. त्याचक्षणी येणाऱ्या अर्थात उत्पन्न होणाऱ्या विचारावर सर्व शक्तीने लक्ष केंद्रीत करीत त्याच्या उत्पन्नावर रोख लावली पाहिजे. मनावर अर्थात विचारावर लक्ष केंद्रित करण्याची एक कला असते. एक योगीक असतो. सततच्या योग धारणेने वा प्रयत्नाने ही कला साध्य होते. विचारांचा प्रवाह थोडावेळ थांबविण्याचा प्रयत्न योग्य प्रयत्नानंतर साध्य होतो. हे अनुभवाने सांगता येते. येणाऱ्या विचाराला त्याच्या प्रवाहाला क्षणीक वा काही वेळेपर्यत थांबविणे म्हणजेच त्या विशिष्ठ वेळेत तुम्ही ‘विचार शून्य’ अशा एका स्थितीमध्ये काही वेळेसाठी जातात. गेलेला विचार दुर्लक्षीत करणे व येणारा विचार थोपवून धरणे म्हणजेच तुम्ही तुमच्यासाठीचा वर्तमानकाळातला रूंद करता आहात, वाढविता आहात. वर्तमान काळाला व्यापक करता आहात. हाच तो काळ जेथे न विचार न हालचाल न अस्तित्वाची जाण न प्रकाश न अंधकार. सर्वत्र शांततेचा भास होतो.

वर दिलेले वर्णन ‘वर्तमानकाळ’ हा तुमच्यासाठी निर्माण करण्याचा एक प्रयत्न आहे अथवा वर्तमानकाळाच्या सीमारेखा (काल्पनीक) रूंदावण्याचा प्रयत्न आहे. कारण ह्याच थोड्याशा काळामध्ये तुम्हाला त्या महान ईश्वराचे दर्शन घडणारे असमार त्यासाठीची ही वातावरण निर्मीती.

योग सामर्थ्य आणि प्राणायाम या क्रियांची शक्ती प्रचंड असते. शरीराच्या बाह्य तसेच आंतर हालचालींवर ताबा निर्माण करण्याची ही एक साधना आहे. परिणामी शरीर अर्थात इंद्रिये मन आणि बुध्दी (विचार) ह्या सर्वावर एकप्रकारे नियंत्रण करण्याची क्षमता ह्या साधनानी प्राप्त होते. ही साधना अत्यंत अवघड आहे. प्रचंड प्रमाणात केलेल्या प्रयत्नाने, नियमित दैनंदिन केलेल्या सरावाने आणि जाणीवपूर्वक अशा लक्षकेंद्रीत करण्यानेच साध्य होणारी असते. ही एक प्रकारची तपश्चर्या असते. कित्येक योगी ह्रदयाच्या, फूफ्फूसांच्या, आतड्यांचा होणाऱ्या नैसर्गीक अनैच्छीक हालचालींवरसुध्दा मर्यादीत ताबा मिळवू शकतात. हे फक्त योग साधनेमुळे, ह्याच तत्वाने मेंदूच्या हालचालींवर देखील मर्यादीत नियंत्रण करता येते. त्याच्या कार्यावर ऐच्छीक ताबा मिळवता येतो. हीच गोष्ट मेंदू अर्थात बुध्दी सतत करीत असलेल्या विचारावर मर्यादीत ताबा मिळवून त्याचे विचार उत्पन्नाचे कार्य थोडावेळ बाधीत करण्यात होवू शकते.    ध्यान धारणा ही योगामधली सर्वश्रेष्ठ साधना समजली गेली. स्वत:ची ओळख जाणण्यासाठी ‘मी कोण आहे’ ‘self-realigation’ ईश्वर म्हणजे काय? जीवात्मा विषयीचे ज्ञान ह्या साऱ्या प्रश्नाची उकल केवळ ध्यानसाधनेमुळे होवू शकते.

पुढे भाग ३ वर चालू-

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com

मला देव दिसला ! भाग १ ला

जीवनाच्या रगाड्यातून-

मला देव दिसला ! भाग १ ला

बाल वयात जेव्हा पासून सभोवतालच्या जगाविषयी समज येवू लागली, त्या ईश्वराला जाणण्याची उत्सुकता मनामध्ये निर्माण झाली. सर्व अद्भूत जग निर्माण करणारा त्यावर नियंत्रण ठेवणारा, त्याला नियमानुसार चालविणारा कुणी तरी असेल हा विचार पक्का होऊ लागला. बुध्दीमध्ये स्थीर होवू लागला. जन्म, संस्कार आणि कौटूंबीक धार्मिक आचरण ह्याचा लवचिक असलेल्या बालमनावर त्वरीत पगडा बसू लागला. जे आहे, जे बघतो, जे ऐकतो, जे वाचतो आणि त्या वयात प्राप्त झालेल्या ज्ञानाने जे समजतो ते सारे मान्यता पावू लागले. कसलाही विरोध न करता गृहण करणे, आत्मसात करणे ही मनाची ठेवण व स्वभाव बनू लागला. अनेक कविता, श्लोक, सूभाषिते ज्यांचा अर्थ त्यावेळी मुळीच कळला नव्हता, तीमुखोलगत करू लागला. त्यात महान तत्वज्ञान भरलेले आहे. चांगले विचार आहेत. भावनांचे उच्च स्तर आहेत. ईश्वरी श्रध्देचे वर्णन आहे. जीवन कशासाठी व जगायचे कशाकरीता ह्याचा अर्थ भरलेला आहे. हे सारे आम्हास सांगितले गेले. ते आम्ही जसे आहे तसेच पाठांतर करून नियमीत रूपाने व्यक्त करीत होतो, म्हणत होतो. त्यावर फारसे चिंतन केले नव्हते. कित्येक संस्कृत श्लोक मुखोलगत केले व म्हटले गेले ज्याचा आजही अर्थ व्यवस्थित कळत नाही. एक मात्र झाले की सर्वांमधून त्या ईश्वराची महानता, भव्यता, दिव्यता, अथांगपणा, शक्तीसामर्थ ह्या गुणांची प्रचिती येवू लागली. फक्त ओळख पटू लागली. ह्यातच जाणीव निर्माण होवू लागली की त्या दिव्य अशा परमात्म्याला कसे भेटावे, बघावे आणि खऱ्या अर्थाने कसे जगावे.

कौटूंबीक धार्मिक संस्काराचा पगडा मनावर बसत असताना पूजाअर्चा, मंत्र विधींचा प्रभाव पडू लागला. देवघरातील मुर्ती, तसबीरी मनाला आनंद देणाऱ्या वाटू लागल्या. कर्मकांडात मन गुंतू लागले. पूजापाठ, भजन ह्याचे ज्ञान मिळवण्याचा प्रयत्न झाला. धार्मीक पुस्तक संग्रह गोळा करू लागला. पूजा विधी कशी निटनेटकी होईल. ह्याकडे लक्ष केंद्रीत करू लागला. कोणतीही वस्तू वा साधने जर पूजाविधीत कमी पडली तर खंत वाटू लागली. त्याची योजना व काळजी घेतली जायी. समोर असलेल्या मुर्ती व तसबीरीबद्दल ज्ञान मिळण्याची उत्सुकता लागली. माहीतीसाठी अनेक पौराणीक ग्रंथाचे वाचन करू लागलो. अर्थात ते अभ्यासाने म्हणण्यापेक्षा चाळने असावयाचे. प्रचंड धार्मिक पुस्तके वाचली. देवदेवतांची वर्णने, त्यांच्या विषयीच्या अनेक कथा, त्यांची उत्पती अथवा अवतार पावने, प्रासंगीक कथा, शाप-वरदानाच्या गोष्टी  वाचल्या. अनेक संस्था असलेले म्हणजे ३३ कोटी देवांची संख्या असलेले वर्णन, अनेकांची कार्ये व विश्वाची योजना इत्यादी प्रचंड प्रमाणात असलेली माहिती वाचता वाचता, संकलन करता करता, मन आनंदून जसे जात असे. त्याचवेळी मनात असंख्य प्रश्नाची गर्दी होवू लागली. कित्येक कथा प्रसंग, वर्णने आणि परिणाम मानव जीवनचक्राला समोर ठेवून केल्याचे भासले. त्यामध्ये थोडीशी भव्यता, दिव्यता प्रदर्शीत होत आहे. मानवी जीवनाचा वरचा स्थर, उच्चता फक्त प्रतीत होत होती. कित्येक प्रसंग वा वर्णने मनाच्या श्रध्येला विचलीत करीत होते. ती अंधश्रध्देच्या दालनात नेवून ठेवीत होते. मनाचा एक प्रकारे कोंडमारा होत असल्याची जाणीव होत होती.

आपलीही एक बुध्दी आहे, विचार करण्याची आपलीपण क्षमता आहे. हे वाटू लागले. एखादा विचार जो वर्षानुवर्षे चालत आलेला आहे. त्याचे मुळ अज्ञात आहे. त्यात बरेच फेर बदल झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. तो विचार आजच्या घडीला स्थिर झाल्याप्रमाणे भासतो. तो आहे तसाच मान्य करावा का? ह्यामध्ये मन हेलकावे घेवू लागले. तरी आपल्या अभ्यासाच्या मर्यादा जाणल्या. ते पौराणीक चित्र, त्या कथा तशाच मान्य कराव्यात हे मनाने ठरविले. जे पूर्ण पटले, आवडले त्याला श्रध्येने मान्यता दिली. जो भाग विपरीत वाटला, त्यावर भाष्य न करता विचारांच्या दालनातून वेगळा करून दिला.

पौराणीक कथा व कथासार वाचण्यानी मनाच्या धार्मिक वृत्तीना, ईश्वरी सानिध्याची ओढ लागली. ईश्वरी रूप मनामध्ये दृढ होवू लागले. सगुण इश्वरी साधना मनास आनंदी देईल, समाधान देण्यासाठी मदत करेल हा विचार दृढ झाला. अनेक सगुण रूपी ईश्वरांच्या प्रतिमांनी मनात एकच गर्दी केली. ऊँ नमो भगवते वासूदेवायन् महा ह्याचे भव्यतेमध्ये महाविष्णूची प्रतिमा डोळ्यापुढे आली. जय जगदंबेच्या स्वरूपात विश्वाची जगत जननी श्री. अंबामाता तीच्या सिंहरूप वाहन व आयुध्ये यांनी मन प्रसन्न होण्याचा अनुभव आला. श्री. गजानन, श्री. कृष्ण, श्री राम, श्री सुर्यनारायण अशा अनेक भव्य आणि दिव्य देवदेवतांचे प्रतिमामय वर्णनात्मक स्वरूप मनात तरंगु लागले. त्यांची अनेक कार्ये, शक्ती महत्व आणि कृपादृष्टी यांची वर्णने धार्मिक पुस्तक संग्रहामधून होवू लागली. त्याचा मनावर पगडा बसू लागला. सर्वांविषयी श्रध्दा निर्माण होवू लागली.

पुस्तकांच्या ह्या संग्रहामधून पौराणीक जगातून आधूनिक जगामध्ये येवू लागलो. आधूनिक जगाचा ईश्वरी मार्गदर्शनाच्या इच्छेने अभ्यास होवू लागला. थोर संत मंडळी, श्री. संत ज्ञानेश्वर महाराज, श्री. संत तुकाराम महाराज, श्री. संत एकनाथ महाराज श्री. संत नामदेव महाराज आणि चरित्रे व कार्य वाचले. ह्यांनी अशाच थोर संत मंडळींनी आपल्या ज्ञानांनी, भक्तीरसांनी आणि विशेष म्हणजे आपल्या उच्चतम मानवी वागणूकींनी जो समाजात आदर्श घालून दिला. भक्तीमार्गाच्या दिशांचे मार्गदर्शन केले ते मनाला खूपच आनंद व समाधान देणारे वाटले. अनेक देवदेवतांचे वर्णन व त्यांचे दिव्यत्व ह्याचे ज्ञान होवू लागले. परमेश्वराचे एक रूप, त्याचे सर्व ठीकाणचे अस्तित्व आणि तो सर्वशक्तीमान असल्याची जाणीव त्यांच्या लेखनातून, अंभगातून तीव्रतेने होवू लागली. त्याचबरोबर तुम्ही कोणत्याही एका देवाला समर्पीत व्हा, त्याच्यावरच आपली श्रध्दा, भक्ती अर्पण करा, त्याच्या एकाच सगुणरूपामध्येच त्या निर्गुण, निराकार परमात्म्याला बघा. त्या तुमच्या इष्ठ देवामध्येच तुम्ही त्याला जाणू शकाल. तुमचे प्रेम, समर्पण व भक्ती ही शेवटी जी प्रमुख देवता शक्ती असेल तीलाच मिळते. निरनिराळ्या सगुण देवतांच्या वर्णनामुळे चंचल मनाची जी संभ्रमावस्था होत असे तीला बंधन पडले. कोणता देव मोठा, कोणता महान, कोणता कृपावंत वा कोणता आपल्या भक्तीला पावेल ह्या वैचारीक वादळाची शांतता झाल्याचे वाटले. आता भक्ती व समर्पण भावना फक्त एकाच देवाच्या चरणी अर्पण करण्याचा संकल्प मनाने घेतला. माझे गुरू श्री शंकराचार्य जैरेस्वामी महाराज यांचे संकल्प मनाने घेतला. श्री शंकराचार्य जैरेस्वामी महाराज यांचे मार्गदर्शन झाले. त्यांची पाठ्यपुजाकरून आशिर्वाद घेतले. “तुझ्या कुळाची घराण्याची देवता कोणती?” अर्थात कुलस्वामी वा कुलस्वामिनी श्री. जगदंबा रेणुकादेवी आहे. त्यामुळे त्याच श्री जगदंबेचे सतत चिंतन करणे, तीची सदैव आठवण ठेवणे, तीचे नामस्मरण करणे आणि जी विविध देवता रूप आहेत त्या सर्वाना भक्तीपूर्वक फक्त त्या जगदंबेमध्येच असल्याचे समजणे, तीच्याच रूपांत, नावात सर्व देवतांचे दर्शन झाल्याचे समाधान मनात निर्माण करणे, हा उपदेश मिळाला. वैचारीक व्दिधा परिस्थीती एकदम नाहीशी झाली. माझी इश्वरी संकल्पना जी होती तीचे स्वरूप मी फक्त श्री जगदंबेच्या, फक्त एकाच देवतेमध्ये केद्रींत करू लागलो. तीचेच नामस्मरण व आठवण सतत राहील याची काळजी जाणीवपूर्वक घेवू लागलो. काही काळानंतर जगदंबेच्या नामस्मरणाची इतकी सवय होऊ लागली की इतर कोणत्याही देवतेचे नाव जवळ जवळ विसरले जावून फक्त “जय जगदंब” हेच मनात येवू लागले. कोणत्याही देवाच्या मंदीरामध्ये जर दर्शनाला जाण्याचा योग आला तर त्या देवतेच्या मुर्तीला श्रध्दापूर्वक अभिवादन करताना, त्याचे स्तुती श्लोक म्हणण्याऐवजी फक्त “जय जगदंब” म्हणत मी त्या देवतेच्या ठिकाणी श्री जगदंबाच असल्याची भावना व्यक्त करून नमस्कार करीत असे. असल्या वागण्याची प्रथम प्रथम मनात खंत व शंका येत होती. मन बहकले असावे असे वाटे. समोर श्री गजाजनाची वा श्री. शंकराची अथवा श्री विष्णूची , रामकृष्ण यांची मूर्ती बघत असताना, त्याना अभिवादन करीत असताना मी मात्र ‘जय जगदंब’ म्हणत असे. त्या त्या देवताना तीच्याच रूपात नमस्कार करीत असे. परंतू माझ्या मनाचा दृढनिश्चय आणि मी केलेला संकल्प मला सतत धीर देत होता.

थोड्याशाच काळानंतर मनाची संभ्रमी अवस्था एकदम नाहीशी झाली आणि माझ्या भक्तीची दिशा व नामस्मरण मी केवळ जय जगदंबेच्या चरणी अर्पण करण्यात यशस्वी होवू लागलो. त्या जगदंबेचे सततचे नामस्मरण व भक्तीपूर्वक आठवण हा देखील पूजा अर्चाचाच एक भाग असल्याची जाणीव होत होती. ते एक कर्मकांडच होते. जर देव दिसला, भेटला तर कदाचित श्री जगदंबेच्या स्वरूपात असेल ही मनाची पक्की खात्री झाली. परंतू ही सारी जर तर ची भाषा होती, समज होती.

पूढे चालू भाग २ वर

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com

 

गीता – जीवनाची एक उकल

गीता जीवनाची एक उकल

 

रणभूमीवर समर प्रसंगी      मृत्यु असता सामोरी

जीवनांची तत्वे सांगती      गीते द्वारे श्रीहरी         //धृ//

 

अर्जुन असूनी महारथी        द्विधा झाली मनःस्थिती

सगे सोयरे तेथे बघूनी          खालती बसला निराशूनी

कसे मारुं मी माझेच सारे        भगवंताला प्रश्न विचारी   //१//

जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

 

कुणीही नाही कुणाचे येथे       नाते गोते क्षणिक भासते

सत्ता येथे चालते प्रभुची          खेळणी सारी ठरते त्याची

तूं आहेस अर्जुना सोंगटी          प्रभू ईच्छे फिरे पटावरी  //२//

जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

 

कर तूं, नसे तुझे ते कर्म      हा आहे केवळ प्रभूधर्म

सोडून द्यावीस फलआशा      न येई केव्हां तुज निराशा

तत्वे सांगुनी आर्जुनासी          संशय त्याचा दूर करी    //३//

जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

 

विचार कर तूं आहेस कोण      जाणार कोठे, येई कोठून

चक्रे फिरती अनेक            तूं आहेस त्यातील एक

स्वतंत्र असूनी कांही अंशी      अवलंबून तूं दुजावरी    //४//

जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

 

गीता सांगे अपूर्व ज्ञान          जीवनाची करी उकलन

प्रश्न त्यांचे सारे सुटती        आत्मचिंतन जेव्हां करिती

केवळ समजतां गीतेला        खरें समाधान लाभे उरीं     //५//

जीवनाची तत्वे सांगती गीते द्वारे श्रीहरी

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

वेळ- ( TIME )

वेळ- ( TIME )

 

     वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो.

वर्तमानकाळालावेळेतमोजतायेतेकां? वर्ष, महीना, आठवडा, दिवस, तास, मिनीटे, सेकंद, वासुक्ष्मअसेमायक्रोसेकंदयांत. नाही. कोणत्याहीवेळेच्यापरिमाणांतनाही. भविष्ययेतो, वर्तमानाच्यासीमारेषाछलांगमारीतभूतकाळांतजातो.  फक्तवर्तमानकाळालासत्यसमजले, परंतुत्यालावेळनसते. त्य़ाचेम्हणजेवर्तमानाचेअस्तित्वअसते. परंतुवेळेच्याबंधनातनाही.  ज्यालाम्हणतातएकसत्य- वेळरहीतअस्तित्व.  It is called SAT, The Timeless Reality. दुसऱ्याशब्दांत ThatPresence is SAT- DARSHANA.  वेळेच्याबंधनातनसलेल्याकाळाचेअस्तित्व.

जरवर्तमानकाळसत्यअसूनदेखीलवेळरहीतहोतो, तरत्याचतत्वानेभविष्यकाळ, भूतकाळआणिवर्तमानकाळाचेअस्तित्ववेळेच्याबंधनातरहातनसते.  दुसऱ्याशब्दांतअस्तित्वालावेळेच्यामर्यादानसतात. अस्तित्व हे वेळ रहीत असते. सदैव असते. काल होते, आज आहे, आणि उद्याही असेल. सदासर्ववेळी, वेळबंधनरहीत. वर्तमानम्हणजेअस्तित्वाच्याबाबतीतवेळेचीसंकल्पनाफोलठरते. काल(Past) आज (Present) आणि  उद्या ( Future ) ह्याआस्तित्वाच्याकल्पनेनुसारवेळहीविचारसरणीचुकठरते. म्हणजेअस्तित्वाच्याविश्लेषणामध्येवेळनसते. There is no such thingas time  म्हटलेआहे.

परंतुवेळेचीसंकल्पनादेहमनाचाविचारकरताअसते. कारणभूत, भविष्य, आणिवर्तमानकाळदेहमनासाठीअसतो. म्हणजेत्यानावेळेचेबंधनअसते. आम्हीजरअसूततरचवेळेचा(Time) आणिजागेचा(Space )प्रश्नअसतो. परंतुत्याअस्तित्वालाकाळाचे, वेळेचेवाजागेचेबंधननसते. जेव्हां मीची ओळख देह मन बुद्धी अहंकार इत्यादीनी केली जाते, तेव्हां माझे वेळ (Time )जागा (Space)मध्ये अस्तित्व असते.परंतु जेव्हां जीवाला Realityconsciousness  सत्य जाणीव म्हणून बोलले जाते. तेव्हां ते वेळ (Time) व जागा (Space) ह्याच्या मर्यादेबाहेर जाते. तेTimeless and Space less     असते. अर्थातनेहमीवसर्वत्रअसते.

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

होळीत जाळा दुष्ट भाव

                                                     होळीत जाळा दुष्ट भाव

एकत्र येऊं सारेजण   विसरुन जाऊ भेदभाव

जाळून टाकू होळीमध्यें    दुष्ट असतील ते स्वभाव   //धृ//

ऐष आरामांत राहून     देह झाला मलीन

शरीर सुखासाठी करती    नाना खटपटी

आज आहे सण होळीचा   नष्ट करा ऐहिक भाव

जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव  //१//

मन असे चंचल भारी   सर्व दिशेने घेई भरारी

राग लोभ अहंकार      मनाचे तर हे विकार

टाकता मलीनता मनाची   पेटलेल्या होळीकडे, घे धांव

जाळून टाकू होळीमध्यें     दुष्ट असतील ते स्वभाव   //२//

विसरुनी चाललो मानवता     प्रत्येक बघतो स्वार्थता

विश्वासाचे आपले नाते     विसरुन गेले सारे ते

निस्वार्थी बुद्धीने आतां    जाणा इतर मनाचे ठाव

जाळून टाकू होळीमध्यें दुष्ट असतील ते स्वभाव  //३//

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com

दिव्य शक्ति

जीवनाच्या रगाड्यातून-

दिव्य शक्ति

 

व्याकूळ झाला जीव     प्रभू तुझ्या दर्शना

अर्पितो मी भाव          तुझीया चरणा  //१//

तेजांत लपले             तुझे दिव्य स्वरुप

नयना न जमले         टिपण्या ते रुप  //२//

निनादाच्या स्वरी      तुच आहेस संगीत

कर्ण अवलोकन न करी    ऐकण्या तुझे गीत  //३//

पुष्पातील सुवास      तुंच आहेस सुगंध

न येई घ्राणेद्रियास     ओळखता तो आनंद  //४//

मधुर रसाची फळे     सर्वात तु बसलास

जिव्हेला मात्र न कळे   तुझा सहवास  //५//

स्पर्शांत आहेस तूं     माझ्या अवती भवती

समज न येई परंतु     तुझी अस्तित्व शक्ति  //६//

इंद्रिये असमर्थ असूनी   न शोधती तुला

ये मानव रुप घेऊन     दर्शन देई मजला  //७//

अथवा दे मजलागी     अपूर्व दिव्य शक्ति

समरस व्हावे तुझ्यांत   हिच माझी विनंती  //८//

 

डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com