Monthly Archives: नोव्हेंबर 2013

सर्प आणि उंदीर यांचे द्वंद

सर्प आणि उंदीर यांचे द्वंद

हैदराबाद येथे एक सर्पालय बघण्यास गेलो होतो. अनेक जातींचे सर्प कांच- घरात  ठेवलेले होते. त्यांना खेकडे, बेडूक, उंदीर, वा छोटे जिवंत  प्राणी  खाण्यासाठी सापाच्या  दालनात सोडले जात होते. फक्त भुकेला सर्प हा आपल्या भक्षावर तुटून  पडतो. नसता  तो भक्ष जीवना मारत नसतो. एक सर्प  दालनात  एका उंदराला सोडले होते.  सर्प बराच मोठा होता. सापाचे हालके  हालकेपुढे  जाणे, उंदराच्या दिशेने झेप घेणे, उंदराला दंश  करणे, त्याला जायबंद करणे, त्याच्यावर वेटोळे घालून त्याला खीळ खिळा करणे, व मग गिळणे ह्या  क्रिया तो करतो. असाच प्रयत्न हा सर्प करीत होता. त्याच वेळी उंदीर जीव वाचवण्यासाठी चपळाईने पळणे, सापाची पकड चुकवणे, त्याचा नजरेच्या टापूतून हालने, ह्या प्रयत्नात होता.

एक जीवन मरण्याचा  संघर्ष चालू असलेला दिसत होता. निसर्गाने प्रत्येक प्राण्याला स्वत: चे रक्षण  करण्याची कला दिलेली असते. तो एक दिलासा असतो. जो जगण्यासाठी धडपडेल तोच जगेल. Survival  of  the  fittest  म्हणतात  ते हेच. निसर्ग तुमच्या प्रयत्नांना सतत सकारात्मक साथ देतो. कित्येकदा वाघ सिंह  यांच्या तावडीत सापडलेल्या हरिणांनी आपली सुटका  करून घातलेली  आम्ही Discovery  वा Animal  Plannet ह्या दूरदर्शन चांनेलवर बघितले. पाण्यामध्ये प्रचंड मगरीने पकडलेला झेब्रा देखील आपल्या तडफदार  धडपडीने ती मगरमिठी सोडू शकला हे पण बघितले. चंचलता, चपळाई, शिकारी प्राण्याचा लक्षवेध  चुकवण्याची कला, प्रासंगिक आक्रमकता,  धैर्य, चातुर्य हे सारे सुप्त रूपाने  प्रत्येक प्राण्यात असतात. हे गुणधर्म  संकट काळी  जागृत  होतात.  नेहमीच्या अंग शक्ती पेक्षा कितीतरी पटीने त्याची शक्ती  उत्येजीत  होती. शरीराच्या प्रत्येक नस नसामधून  त्याचा ओघ निर्माण होतो. हा परिणाम इच्छित ( Volentary action ) नसून आंतरिक चेतना अर्थात Instinct Relex  Action असते. अपोआप उद्दुक्त होते. ही सारी निसर्गाची बचावात्मक योजना होय. कोंडून ठेवलेली भित्री  वा पळपुटी  मांजर तिच्यावर  जीवघेणा हल्ला होत आहे हे समजताच  तिच्यामध्ये  विलक्षण   शक्तीचा ओघ निर्माण होतो. ती झेप घेऊन त्या व्यक्तीचा गळा पकडून  त्याचाच जीव घेण्यास  सक्षम होते.   ही स्व रक्षणाची किमया.

शिकारी साप आणि शिकार उंदीर ह्यांचे द्वंद्द चालले. चुरस अत्यंत  रोमांचकारी  व उत्च्सुक्ता  वाढवणारी होती. एक बलाढ्य मारक  आणि समोर अशक्त  अश्या  दोन प्राण्याची  लढत.  उंदरासाठी जीवन मरणाचा संघर्ष.  तो सापाच्या प्रत्येक  सूक्ष्म हालचालीचा वेध घेत होता.  सापाने दंश  करण्यासाठी  मारलेला  टोला  चपळाईने चुकवत होता त्याच वेळी सापाचे  तोंड आपटून दुखवले  जाई  कांही  वेळाने ते रक्त बमबाळ झाले. एक विस्मयकारक  प्रकार  घडला. उंदरावर  सापांनी आपला जबडा उघडा करून एक दंश टोला मारण्याचा प्रयत्न केला.  त्याच क्षणी उंदराने उलटवार केला. सापाचा  उघडलेला  खालचा जबडा झटकन आपल्या  दातांनी गच्च  पकडला.  उंदराला छोटे छोटे दात असतात. त्याचा उपयोग पकडी मध्ये झाला.

उलट सापाला तसे चावण्याचे  दात नसतात. तो फक्त भाक्षाला गिळतो. येथे खालचाच जबडा  उंदराच्या  पकडीमध्ये   गेल्यामुळे  साप एकदम निष्क्रिय   झाला.सापाची  ह्या अनपेक्षित  पकडीतून  सुटका  करून घेण्याची  धडपड चालली , पण जमले नाही. उंदराने  त्याची पकड ढिली केली नाही . बराच वेळाने तो साप हतबल होऊन  मान  टाकू लागला. त्याचा हालचाली थंडावल्या  उंदराने शत्रूची  पकड दिली करीत  लगेच  चेहऱ्याचा दुसरा भाग पकडला. जागा बदलणे, पुन्हा दात रोवणे, कुड्तरणे  हे चालू  ठेवले. सापाचे तोंड छीलुन काढले. घायाळ केले.  शेवटी   सपालाच मृतुच्या स्वाधीन  व्हावे लागले.

आम्ही जी घटना बघितली ती केवळ अतिशय आश्चर्यकारक घडलेली अशी. निसर्गाचा तो एक चमत्कार. कुणास विश्वास वाटणार नाही अशी. मलासुद्धा   आपण हे सत्य बघतो आहोत कां ? का हा दृष्टीचा भ्रम आहे हे एका क्षणी वाटले पण आम्ही vidio चित्रण ही केले होते.  अशा घटना  निसर्गाच्या  चक्रात अनेक वेळा घडत असतात. आम्हास ती बघण्यास  मिळणे हे आमचे  नशीब नव्हे काय?

 

 डॉ. भगवान नागापूरकर

9004079850

bknagapurkar@gmail.com

भूतदया जागविली

 

भूतदया जागविली

चिंव चिंव करीत चिमणा चिमणी       खोलीमध्ये माझ्या आली

अवती भवती नजर टाकून        माळ्यावरती ती बसली

वाचन करण्यात रंगून गेलो   लक्ष्य नव्हते तिकडे

आश्चर्य वाटले बघून मजला    काड्या गवताचे तुकडे

घरटे बांधण्या रंगून गेली      आणती कडी कचरा

मनांत बांधे एकच खुणगांठ    तयार करणे निवारा

भंग पावता शांत वातावरण      वैताग आला मला

कचरा आणि घरटे काढून      खिडकीतुनी  फेकला

काम संपवूनी सांज समयी    घरी परत मी आलो

त्याच चिमण्या तसेच घरटे     पाहून चकित झालो

पहाट होता चिमण्या उडाल्या    काढून टाकले घरटे

असेंच चालले कित्येक दिवस     परी जिद न सोडी ते

चार दिवसाची सुटी घालउन      गांवाहून परतलो

घरटे बघता संताप येऊन        मुठी  वळवूनी  धावलो

घरट्या मधूनी चिमणी उडाली      बसली पंख्यावरती

चिव चिव करुनी विनवू लागली      दया दाखवा ती

परी मी तर होतो रागामध्ये       चढलो माळ्यावरी

मन चरकले बघून अंडी       छोट्या घरट्यामध्ये

असहाय्य दृष्टीने चिमणी पाही मज  करुणायुक्त नयनी

यश मीळाले तिनेच शेवटी        भूत दया जागवूनी

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

शिकारी आणि शिकार यांच्या भूमिका

जीवनाच्या रगाड्यातून-

शिकारी आणि शिकार यांच्या भूमिका

गिरनार हा सौराष्ट्र मधला जंगल पर्वतमय भाग. येथील अभयारण्यात  सहल  म्हणून  अनेक  यात्री बरोबर जाण्याचा योग आला होता.  सर्व परिसर शासनाचा संरक्षित ( Protected  area )  टापू म्हणून समजला गेला. प्रचंड जंगले आणि त्यात  सर्व प्रकारची  जंगली  जनावरे   यांचे स्वैर वास्तव्य  असलेला भाग. जंगलामधून जाण्यासाठी  कच्चा रस्ता केलेला होता. दुतर्फा घनदाट झाडी, सूर्य- प्रकश वा  उन्हे यांना रोकणारी दिसून आली. वळणा वळणाचे  रस्ते. रस्त्यावर ठीकठीकानी सूचना फलक दिसून येत  होते. फलकावर निरनिराळ्या प्राण्याची चित्रे व वैज्ञानिक माहिती संक्षेपात होती. त्याच  प्रमाणे त्या  प्राण्यांचे योग्य  संरक्षण व संवर्धन करण्याविषयी आदेशवजा सूचना दिलेल्या होत्या. जंगली जनावरे  आणि  वृक्षलता  ही निसर्गाची देन  असून आपला मित्र परिवार आहे. ही भावना जागृत  ठेवली  जायची. कांही  ठिकाणी पाण्याचा  साठा असलेली तळी वा कृत्रिम हौदपण दिसून आले.

आमची यात्रा-बस हालके हालके सर्व परिसराची पाहणी करीत जात होती.  रस्त्यात अनेक प्राणी आम्हास दिसून आले. हात्ती, गेंडे, पान घोडे, वानरे, झेब्रे, हरीन, काळवीट, कोल्हे, ससे आणि वाघ सिंह, अस्वले, इत्यादी. कांही प्राणी एकटे भटकताना  दिसले तर कांही  कळपामध्ये एकत्रित असल्याचे दिसून आले. हे सारे नैसर्गिक रम्य मनोहर व रोमांचकारी   देखावे बघताना खूप आनंद वाटत होता.

एका ठिकाणी आम्ही जे दृश बघितले. त्यांनी सर्वजण अचंबित झालो. विचार करण्यास  लावणारी ती घटना होती. निसर्गाचा व त्याचा  योजनेचा एक  चमत्कार वाटला. एका मोठ्या  दगडाच्या शिळे जवळ एक मोठा बिबळ्या वाघ बसलेला दिसला. शांत असून  फार हालचाली नव्हत्या. जवळच लहान  पाणवठा व खूप गवत वाढलेले होते. आमची उत्सुकता  आणि आश्यर्य  शिगेला पोहोंचले होते. कारण त्या वाघाच्या  अगदीच  जवळ अंतरावर कांही  हरीण शांत मनाने तेथेच गवत चरत होती.

आमच्या सहल आयोजकांनी आमची बस जवळच उभी करून तो अप्रतिम नैसर्गिक देखावा बघण्यास वा त्याची छबी काढण्याच्या सूचना दिली होती. बराच वेळ पर्यंत ते दृश्य आम्ही बघत होतो. वाघाचे शांत बसणे, व त्याच्याच समोर हरीणांचे गवत चरणे, विश्वास बसणार नाही, अशी ही  घटना होती. जवळ जवळ अर्धा तास पर्यंत आम्ही ते बघत होतो.  नंतर मात्र सर्व हरीण चरत चरत दूर निघून गेली. वाघ मात्र तेथेच  बसला होता.  काळजी पूर्वक आमच्या संयोजकाने दूर अंतरावरून त्या वाघाच्या दिशेने कांही दगड भिरकावले. त्याला एक दोन लागताच त्याच्या हालचाली दिसल्या. तो तिथून  उठून जाण्याचा  प्रयत्न करू लागला. तो वाघ घायाळ झालेला होता. त्याचा मागच्या एका  पायाला  दुखापत झालेली होती. तो आपली जागा  बदलण्याचा  प्रयत्न करू लागला. तो फरफटत  दुसरीकडे जाऊ लागला. त्याची असहायता , दुखापत, आणि स्वरक्षणाचा प्रयत्न हे बघताना देखील एक वेगळीच  रोमांचकारी भावना येत होती.

एक भयावह क्रूर जंगली प्राणी परंतु आम्हा सर्वामध्ये भूतदया  निर्माण करून गेला. निसर्गाच्या अप्रतिम कल्पकतेचे ह्या प्रसंगी दर्शन झाले. शिकारी आणि शिकार ( भक्ष ) ह्यामध्ये  एक विलक्षण रोमांचकारी नाते असते. प्रत्येक सजीव प्राणी ह्या दोन्ही ही  भूमिकेमधून सतत  जात असतो. जो शिकार करतो तो भक्ष ही बनतो. व जो भक्ष बनतो तो देखील जगण्यासाठी शिकारी बनत असतो. त्याचमुळे शिकारी व शिकार ह्यांचे गुणधर्म  त्या एकाच प्राण्यात आढळून येतात. चपलता,  चंचलता, आक्रमकता, बचावात्मकता, वेध, लक्ष, अचूकता, प्रयत्न, धडपड, आणि हे सारे  करताना स्वता:चे रक्षण  ह्या सर्व गुणांचे  मिश्रण प्रत्येक प्राण्यात निसर्गाने जन्मता: दिलेले असते.   आपले भक्ष करणारा, आपल्या दृष्टी  टापूत  बसलेला आहे. मात्र तो विकलांग झालेला, हतबल  झालेला ह्याची जाणीव  हरिणाला होणे हे फार महत्वाचे वरदान आहे. त्याचमुळे ते त्याक्षणी  बेफिकीर  वृत्तीचे होऊ शकले.  आणि इकडे वाघ, त्याला विवंचना होती ती त्याचा दुखापतीची. स्वतःच्या देहाची वा शरीराची.

शेवटी कोणीही आणि कितीही शक्तिवान  असला तरी त्याला निश्चित  जाणीव  असते स्वतःच्या सामर्थ्याची.

डॉ. भगवान  नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapuekar@gmail.com

नदीवरील बांध

जीवनाच्या रगाड्यातून-

नदीवरील बांध

विषण्यतेने  बघत होतो       भिंतीवरच्या खुणा

काळ जाऊन वर्षे लोटली     आठवणी देती पुन्हा

बसत होतो नदीकांठी        बालपणीच्या वेळी

पात्र भरुनी वहात होती     गोदावरी त्या काळी

सदैव पूर येउनी तिजला       गावास वेढा पडे

गांव वेशीच्या घरांना मग     पाण्याचे बसती तडे

चित्र बदलले आज सारे       पात्र लहान होई

बांध घातला धरणावरी      पाणी अल्पसे येई

खिन्नपणे खूप भटकलो        भोवतालच्या भागी

चकित झाले मन बघूनी         हिरवळ जागोजागी

इच्छित दिशेने पाणी वाही     बांध घातल्यामुळे

सारे जीवन प्रफुल्ल करीं        आनंदमय सगळे

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

 

हा तर खरा बौद्धिक व्यायाम

जीवनाच्या रगाड्यातून-

हा तर खरा बौद्धिक व्यायाम

नियमितपणे सकाळी फिरावयास जाणे हे ठरून गेलेले होते. निवृतीच्या काळात अत्यंत सोपा व चांगला शरीराच्या सर्व अवयवांना पोषक असा हा  व्यायाम आहे. कित्येक वर्षे त्याचे नियमित पालन केले जात आहे.

एक दिवस सकाळी  फिरण्यास बाहेर पडलो असता,  रस्त्यामध्ये एक ९ ते १० वर्षाचा शाळकरी मुलगा रस्त्याच्या कडेला थांबून आपली नादुरुस्त सायकल ठीक करण्याचा प्रयत्न करीत होता. सायकलच्या पायड्ल जवळची साखळी ( चेन ) ही  बेरीन्गच्या चाकावरुन निसटली होती. मुलगा परेशान झालेला  होता . त्याची सर्व बोटे व हात वंगनाणी बरबटलेली होती.  शाळेची वेळ होत असल्यमुळे त्याच्या चेहऱ्यावर तगमग स्पष्ट दिसत होती. लोक जात येत होते. बहुतेकजन आपल्या समयबद्धतेमुळे धावपळीत होते. मी अचानक त्याचा जवळ गेलो. त्याचा सायकलीची निसटलेली चेन थोडासा प्रयत्न करून  पूर्ववत  केली. त्याला  हातरुमाल दिला. त्यांनी हात साफ केले. त्याची सायकल  त्याचा  हाती दिली. मुलाच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्टपणे  दिसत होता.  माझे आभार  मानून तो शाळा गाठण्यासाठी वेगाने निघून गेला.

तस म्हणाल  तर  मी फारस कांही केल नव्हत.  म्हंटल तर क्षुल्लक. परन्तु  कसलेसे समाधान,  शांतता, मनला आनंदीत करीत असल्याची  जाणीव येत होती. रोजच्या  फिरण्याच्या  व्ययामामुळे  मनाला उल्हसित  वाटण्याचे जेवढ़े कार्य झाले नव्हते, तेवढे  त्या छोट्याशा प्रसंगाने  झाले. व मानसिक समाधान लाभले.
शारीरिक व्यायाम ही जरी गरज असली
, तरी मानसिक समाधान ज्या योगे प्राप्त होते, तो हाच खारा बौद्धिक व्यायाम नव्हे काय?

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 bknagapurkar@gmail.com

 

वळून पहा

वळून पहा

उडून गेली दूर दूर तू

झेप घेउनी आकाशी

बघू लागलो चकीत होऊनी

पंखामधली भरारी कशी

नाजूक नाजूक पंखाना

आधार होता मायेचा

चिमुकल्या त्या हालचालींना

पायबंध तो भीतीचा

क्षणात आले बळ कोठून

विसरुनी गेलीस घरटे आपुले

बंधन तोडीत प्रेमाचे

आकाशासी कवटाळले

कधीतरी उडणे, आज उडाली

बघण्या साऱ्या जगताला

किलबिल करून वळून पहा

दाणे भरविल्या चोंचीला

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com