Monthly Archives: फेब्रुवारी 2013

‘Percussion ‘ एक वैद्यकीय तपासनी पद्धत

जीवनाच्या रगाड्यातून-

Percussion      एक वैद्यकीय तपासनी पद्धत

विचार करणे हे मेंदूचे अत्यंत महत्वाचे कार्य.  त्यातही कांही व्यक्ती सतत नाविन्याचा विचार करीत असतात. निसर्ग कोणतीही गोष्ट तुमच्या समोर सोडून देतो. फक्त विचारवंतच त्याच प्रथःकरण करुन ती कोणती गोष्ट आहे, कां आहे, व त्याचा सर्वसामान्यासाठी कांही उपयोग होऊ शकेल कां ह्याचा विचार करतात. त्यानाच आपण महान, तत्वज्ञानी वा शास्त्रज्ञ म्हणतो. तुमच्या आमच्या सारखीच ती साधी माणसे. कांही वेगळी नसतात. परंतु सदैव सतर्कता व चौकसपणा बाळगुण असतात.

झाडाखाली विश्रांति घेत असलेला न्युटन. त्याला झाडावरुन पडणारे फळ दिसले. गुरत्वाकर्षनाची माहिती जगाला कळली.  किंवा आर्किमेडीज स्नानासाठी पाण्याने भरलेल्या टबात उतरला. सारलेल्या पाण्याचे आणि घनरुपाचे अनेक जगप्रसिद्ध सिद्धांत मांडले. अशीच अनेक उदाहरणे असतात. क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीमधून महान वैज्ञानिक तत्वज्ञान बाहेर येते.

डेन्मार्कचा एक वैद्यकीय विचारवंत जिब्सन. तशी त्याला दारु पिण्याची सवय. तो दारु विकत घेण्यासाठी एक दुकानांत गेला. त्या काळी दारु टिनच्या डब्यांत भरुन ठेवीत. व ग्लासाने ती गिऱ्याईकाला दिली जायी. दुकानदाराने बोटाच्या टिचक्या सर्व डब्यावर मारुन आवाज केला. रिकाम्या डब्यावर मारलेल्या टिचकीने वेगळा आवाज येई व दारु भरलेल्या डब्यावर मारताच त्याचा वेगळा आवाज येई. केवळ लहान (बारीक ) वा मोठ्या (भदा) आवाजाच्या ( पीच ) प्रतिध्वनीवरुन तो ओळखे, की कोणता डब्बा रिकामा आहे, वा भरलेला. डॉक्टर जिब्सनने त्या दुकानदाराच्या हलचाली सुक्ष्मपणे बघितल्या.

आणि वैद्यकीय तपासणीमध्ये एका छोट्याश्या पद्धतीचा जन्म झाला. ज्याला त्यानी नांव दिले गेले  “PERCUSSION” . डॉक्टर लोक एक हात छाती, पोट, वा पाठ इत्यादीवर ठेऊन, दुसऱ्या हाताच्या बोटानी त्यावर टिचकी मारतात. सुक्ष्मपणे निरीक्षीण केले तर त्या ठोक्यामधून निरनीराळे ध्वनी लहरी निघून विवीध Pitch मध्ये आवाज ऐकू येतात. शरीरामध्ये जर कोणती अनपेक्षीत वाढ होत असेल, तर त्या मधून परावर्तीत होणारा ध्वनी सुचवितो की तेथे कांही घन रुपाची वा द्रवरुपाची वा वायुरुपाची वाढ होऊ लागली आहे. हे सारे अत्यंत प्राथमिक असते. परंतु रोग निदनाच्या प्रक्रियेमध्ये विचाराना चालना देणारे निश्चित असते. It is helpful in the diagnostic procedure of a disease.

शेकडो वर्षापुर्वीची ही त्या वैद्यकाची कल्पना, आजतागायत अनेक अद्यावत यांत्रकी तपासणीमध्येही टिकून राहीलेली दिसते.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     *** ७

शरीरातील ३६ तत्वे-

( पंच महाभूते )   १- पृथ्वी  २- आप  ३- तेज  ४- वायु  ५- आकाश

६- अहंकार  ७- बुद्धी  ८- अव्यक्त

( ज्ञानेद्रिये )  ९- कान  १०- नाक  ११-डोळे  १२- त्वचा  १३- जिव्हा

(कर्मेंद्रिये)  १४- हात  १५- पाय  १६- वाणी  १७- उपस्थ  १८- गुद   १९- मन

( ज्ञानेद्रियांचे पांच विषय)   २०- शब्द  २१- स्पर्श  २२- रुप  २३- रस  २४- गंध

(कर्मेंद्रियाचे पांच विषय) २५-चालणे २६- बोलणे २७- घेणे २८- देणे २९-मळमुत्राचा त्याग

३०- इच्छा  ३१- द्वेश  ३२- सुख  ३३- दुःख  ३४- चेतना  ३५- धृति  ३६- संघात

खानदानी

जीवनाच्या रगाड्यातून-

खानदानी

 

मी माझ्या नातवाला घेऊन मित्र गणपत पवार याचेकडे गेलो होतो. त्याचा नातू माझ्या नातवाशी समवयाचा. दोघेही एकाच कक्षेत शिकणारे. आम्ही दोघे मोठ्या झोपाळ्यावर गप्पा मारीत बसलो. समोर बागेत दोन्ही नातवंडे खेळत होती. अचानक आमचे लक्ष त्यांच्याकडे वेधले गेले. ते त्यांच्या भांडणामुळे. दोघेही हामरी तुमरीवर येऊन वाद विवाद व त्यांत मारामारी करु लागले. गणपत बेचैन झाला. तो लगेच उठून त्यांना आवरण्यासाठी जाऊ लागला. पण मी त्याला रोकले. ” आरे जाऊ दे . मुले आहेत ती. भांडू देत त्याना. थोडीशी मस्ती करतील व शांत होतील.  सार विसरतील व पुन्हा खेळतील. ” तो हसला. जवळ येऊन बसला. थोड्या वेळाने जे घडले, त्यानी आम्ही चकीत झालो. गणपतच्या  नातवाने माझ्या नातवाला दोन टोले लगावले. खाली पाडले. तसे दोघेही रडत होते.

गणपत मोठ्याने हासू लागला. थोडासा अहं भाव वा फुशारकी  त्याच्यां चेहऱ्यावर मला जाणवली. “बघ साला नातू कुणाचा आहे. शेर का बच्चा. लेचापेचा नाही ये.” तो जरा जास्तच हासला.  “आखेर खानदानी आहे तो. ”  माझ्याशी टाळी देत उत्तरला.

मी त्या प्रसंगाचा विचार करु लागलो. त्याच बरोबर त्याच्या खानदानी ह्या उपाधीवर दिलेला जोराचा, पण विचार करुं लागलो. कारण त्या समवयी नातवांत शक्ती, युक्ती पेक्षा त्याची आक्रमकता हा गुणधर्म उठून दिसला होता. ज्याने त्याला वेगळेच दालन मिळवून दिले होते.

सिडने-ब्रेनर हा आफ्रिकन विद्वान विचारक. वैद्यकीय क्षेत्रातला शास्त्रज्ञ. त्याला नुकताच 2004 सालचा सर्वश्रेष्ठ नोबेल पुरस्कार मिळाला. त्याचा विषय होता  जेनेटिक्स ( Genetics ). तसा हा अत्यंत अवघड विषय. निसर्गातील सजीवांच्या प्रकृतीसंबंधीची मुलभूत तत्वे त्यानी शोधली. प्राणी  वा व्यक्ती ह्यांची स्वभाव धारणा ह्याचाच जणू त्यानी सिद्धांत मांडला.

व्यक्तीच्या आक्रमकता वा बचावात्मक पैलूवर प्रकाश पाडला.

गम्मत म्हणजे त्याच्या ह्या वैचारीक धारणेला त्याने बाल वयांतच त्याची झलक दाखविली होती. एक विचार, एक शंका त्याच्या शाळकरी विद्यार्थी दशेतील मनांत डोकावली. आणि ते रुजले गेलेले बीज पुढे फोफावत, त्याचा प्रचंड वृक्ष झाला. ज्याला नोबेल पारितोषकचे फळ लागले.

शाळकरी वयांत असताना सिडने ब्रेनरने एक चित्र बघीतले. एक भली मोठी, सशक्त गाय दाखविली गेली, जीला मोठी अनकुचीदार अशी शींगे होती. ती वेगाने धावत होती. त्याचवेळी तीच्यावर एक रोड, हडकुळा, किरकोळ प्रकृतीचा वाघ तुटून पडला होता. वाघ छलांग मारुन तीच्या मानगुटीवर आरुढ होण्याचा प्रयत्न करीत होता. हे एक नैसर्गिक सत्यावर आधारलेले चित्रण होते. परंतु सिडने ब्रेनर साशंक होता. गाय सशक्त, मोठी, अनकुचीदार मोठी शींगे बाळगुण असलेली, परंतु भित्री आहे, असे त्याला वाटले. वाघ चपळ व आक्रमक होता. त्याने त्याच्या शिक्षकाला प्रश्न केला. “ही एवढी सशक्त मोठी गाय. कां भिते ती त्या किरकोळ वाघाला.? कां ती संघर्ष करुन त्या वाघावरच तुटून पडत नाही.? कदाचित् वाघ हरेलही ”

2           शिक्षक म्हणाले  “तुझा विचार तर्कला धरुन आहे. परंतु येथे शक्ती, युक्ती पेक्षा प्रकृती श्रेष्ठ ठरते. हा निसर्ग होय ”

आणि त्या क्षणापासून सिडने ब्रेनर “प्रकृती च्या अर्थात निसर्गाच्या मुळ धाग्याच्या रचनेकडे”  वळला.

महाभारतामधील एक प्रसंग. कर्ण ब्राह्मणाचे रुप घेऊन, गुरु परशुराम यांच्याकडे शिक्षण घेत होता. एके दिवशी कर्णाच्या मांडीचा आसरा घेत गुरु विश्रांती घेत होते. एका भुंग्याने कर्णाची मांडी चाऊन त्याला रक्तबंबाळ केले. कर्ण तटस्थ बसला. हालचाल केली नाही. कारण त्यामुळे परशुरामाची झोप मोड झाली असती.

नंतर परशुरामाला उठताच हे कळले. त्यांचा तर्क बरोबर निघाला. कर्ण ब्राह्मण नाही. तो क्षत्रीय आहे. कारण त्याची सहनशिलता ही क्षत्रीयाची होती.

प्रकृती अर्थात स्वभाव ठेवन ही भिन्न भिन्न असते. सारे तेच. रक्त, मास, हाडे, कातडे. परंतु प्रत्येकामधल्या नैसर्गिक चेतना निराळ्या. त्यालाच सामान्यासाठी “जेनेटिक्स.” ( Genetics ) म्हणता येईल. रक्तामधला एक अत्यंत मुलभूत प्रकार “जीन्स ” असतो.  शरीर मन बुद्धी ह्या धारणेच्या सर्व हालचालीवर ताबा मिळविणारा.

माणसाची शक्ती, युक्ती बुद्धीमत्ता ज्ञान समज इत्यादीच्या संकल्पना वेगळ्या असतात. ज्यांत सभोवताल अर्थात वातावरण,  परिस्थीती व्यक्तीचे स्वभाव निर्माण करतात. ह्यात आठवणींचे चक्र दडलेले असते व त्या प्रमाणे परिणाम. हा सारे सत्य व द्रष्य व्यक्त भाग. परंतु खोलांत शिरले तर मुळ ताबा असतो त्याच्या जीन्सचा. ज्याला मुळ स्वभाव म्हणतात. सारे वरकरणी आत्मसांत केलेले स्वभाव त्या क्षणी बाजूस सारले जाऊन, मुळ स्वभाव त्याची जागा घेतो. ह्याला चांगले, वाईट, योग्य अयोग ह्याची जाण नसते. आणि तेच तर नैसर्गिक होय. येथेच संकल्पना येते ती वंश परंपरेची. जीन्सचा प्रवाह एकच नसतो. त्यांत सतत मिश्रण होत राहते. स्त्री वा पुरुष बीजांचे. म्हणूनच त्यात प्रसंगीक भिन्नता होत राहते. मात्र प्रवाह पुढेच जात असतो.

हे तुझ्या आई वडीलांचे , आजोबा-आजीचे , गुणधर्म तुझ्या आले आहेत असे म्हणतो. ते ह्याच मुळे. आपले सर्व साधारण वंशाचे ज्ञान आजा- आजी, पंणजोबा-पंणजी, खापर पंणजोबा-खापर पंणजी ( अर्थात दोन्ही बाजूंचे पित्र-मात्र धरुन ) येथ पर्यंतच मर्यादीत असते. कदाचित् कांही जुने रेकॉर्ड ह्या बाबतीत थोडासा प्रकाशही टाकू शकतील. मात्र सत्य कायम राहते. ते म्हणजे  ” वंश परंमपरागत गुणधर्म “. अर्थात आज कालच्या पुरोगामी शब्दांत ” खानदानी गुणधर्म “. ज्याला म्हणतात मुळ स्वभाव. चांगला वा विक्षीप्त, आक्रमक वा बचावात्मक, वा इतर कोणता. हे शब्द फक्त बदललेल्या परिसिथितीला अनुसरुनच व्यक्त होत असतात.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

   

विवीध-अंगी     *** ६निवृत्तीचा कांठ   विसावा घेण्यासाठी नसतोअनुभवाची शिदोरी घेऊन    नवा मार्ग शोधण्यासाठी असतो.

 

 

 

बालकांची दोन पत्रे. २) बालकाचे चुलत भावास पत्र-

बालकांची दोन पत्रे.               २)    बालकाचे चुलत भावास पत्र-

                                       आकाश वय ३ महिने (वास्यव्य अमेरिकेत )

पत्र चुलत भावाला 

प्रति आदित्य वय ७ महिने (वास्तव्य भारतात) 

प्रिय आदित्य

– Hi, कसा आहेस तू?  मी ना? एकदम चांगला आहे. आताशी कुठे, म्हणजे पाच दिवसांनी व्यवस्थीत सेटल होण्याच्या मार्गात आहे आणि माझी आईना, ती मात्र अजूनही निर्माण झालेल्या शारिरीक Disturbances शी झगडा देत आपला मार्ग Normal करण्याच्या प्रयत्न्यांत. तीला पण लवकरच आराम लाभेल ही अपेक्षा.

तुला पत्र लिहीताना, तुला मी काय म्हणून संबोधावे हा प्रश्न माझ्या समोर तीव्रतेने उभा राहिला. तुला ‘आदित्य’ म्हणू का? की आदीत्यदादा. एक तर तू माझा मोठा भाऊ आहेस व परवा काकांच्या E-mail मध्ये तुझा उल्लेख ‘आदित्य दादा’ म्हणून केलेला होता. म्हणून मी संभ्रमात पडलो. मला स्वत:ला तुला फक्त ‘प्रिय आदित्य’ म्हणायला आवडेल. प्रथम जेव्हां तुझे नाव ‘आदित्य दादा’ म्हणून माझ्या समोर आले तेव्हा मी तुझी वेगळीच कल्पना केली. वाटले एक प्याँट शर्ट घातलेला कुणीतरी असेल. कमीत कमी चड्डीतरी असेल. परंतु काय, तू पण लंगोट (तो देखील त्रिकोणी) घालूनच बहुतेक वेळ असतो असे कळले. बहुतेक वेळ ह्यासाठी कि बऱ्याच वेळा तो देखील नसतो. मग तुला दादा कसा म्हणू. दादा उपाधी फक्त मोठा म्हणून लावणे मला पसंत नाही. चार महिन्याने मग मी पण अण्णा होईन व आत्याचे बाळ तुला दादा व मला अण्णा म्हणू लागेल. आपल्या तिघांच्या केवळ एक वर्षातील अस्तित्वात मला मोठेपणाच्या उपाध्यांची अडचण नको आहे. चार महिण्याऐवजी चार वर्षाचे जर अंतर असते तर मात्र मात्र मी आनंदाने तुला ‘दादा’ म्हटले असते. मला केवळ Just a good friend म्हणून Relation हवे. आणि आत्याचे येणारे बाळ तर चार महिन्याने Modern असल्यामुळे ते माझ्या विचारांशी सहमत असेल. जसे बाबा, काका, मामा व तसेच आपले फ्रेन्डशिपचे मुख्य नाते व खरे नाते ब्रॅकेटमध्ये.

परवाची तुला गमंत सांगतो, आजोबा हे बाबांबरोबर चर्चा करीत होते. Mile Stones बघत माहीती सांगत होतो. दाढी मिशा फूटणे हे येक्झ्याट असे Mile Stones नाही. कुणास ते लवकर येतात व कुणास त्यासाठी बराच काळ वाट बघावी लागते. मग समज मलाच तुझ्या आधी दाढी मिशा आल्या तर. नव्हे हेच होण्याची शक्यता जास्त आहे. कारण माझ्या बाबांना भरपूर मिशा आहेत व तोच गुणधर्म माझ्यात लवकर येणार.

२      म्हणजे मीच कसा तुझा दादा वाटणार. त्यापेक्षा हा शब्दच नको आपण दोघे Let us be good friends  नाही का? मला वाटते काकू व काकांना हे पटेल.

अमेरिकन्स वेळेच्या बाबतीत फार निश्चित असतात. चंद्रावर जाणारे यान हजारो मैलाचा प्रवास करुन ठरल्यावेळी म्हणजे दिवस-तास मिनिटे निश्चित साधत चंद्रावर उतरले. आईला अगदी सुरवातीलाच सांगितले गेले की माझे या जगात या दिवशी आगमन होईल आणि अगदी त्याप्रमाणे झाले व माझा जन्म त्याच रोजी झाला. पण माझे आई-बाबा, भारतीय ना, सर्वच गोष्टींची त्यांना घाई व कुंडली बघणे. लग्नाच्याच वाढदिवशी किंवा अमुक दिवशी ह्या वेळी म्हणजे मी यावे आणि मी त्यांच्या मनातील तारखांना साथ द्यावी ही त्यांची तीव्र इच्छा. पण मी मात्र त्यांना  पूरता चुकवला. अरे बाबा आणि आजी दोघे जण पंचाग घेवून भविष्य शास्त्रात आपण पारंगत आहोत या आविर्भावात दिवस बघून, तो चांगला कि वाईट बघून मनसूबे आखू लागलो. बाबा आपली रजा. सुट्ट्या, मिळणारे आर्थिक हिशेब यांचीच चर्चा करु लागले. मी मात्र माझ्याच पद्धतीने आलो. दोनदा धावपळ करुन डॉक्टरांना दाखवण्यासाठी न्यावे लागले. यात शंकाच नाही की मी येताना थोडासा त्रास देतच आलो. वजनाने ७ पौंड १० औंस व लांबी २१ इंच.

तुझी मी खूपच तारीफ ऐकतो. अर्थात तुझी आई टेबल टेनिस चॅम्पियन, तीला बरीच बक्षिसे व प्रमाणपत्रे मिळाली. तू पण तुला चेंडूप्रमाणे एक शॉट बसली की बाहेर सटकलास. चांगली गोष्ट केलीस. अरे माझी आई पण कांही कमी नाही. ती देखील एक चांगली डान्सर आहे. बरीच बक्षीसे तिने दसऱ्याच्या गर्भानृत्याच्या वेळच्या समारंभात मिळवली आहेत. मी पण तीची ही कला रक्तालला गुणधर्म म्हणून साध्य केली व बाहेर येण्याआधी त्याची सतत प्रॅक्टीस करीत होतो. आई म्हणायची बाळ सारखा नाचत असतो. त्याचा पाय लागतो, हात लागतो हीच तिची सतत तक्रार असे. शेवटच्या दिवशी तर मी कहरच केला. त्याच माझ्या तंद्रीमुळे मला येण्यास खूप वेळ लागला. व मी ह्या जगात आलो. अमेरीकन पद्धती काही वेगळ्याच आहेत. म्हणून मला प्रथम दिसले ते डॉक्टर नव्हे तर माझे बाबा. त्यांनीच आपल्या हाताने मला आई पासून शारिरीकदृष्टीने वेगळे केले. म्हणजे मी ज्या ‘नाळेने’ आईबरोबर बांधलो गेलो होतो, ती नाळ डॉक्टरांच्या सल्याने व मार्गदर्शनाने कापून टाकली. शारिरीक बंधनाचा शेवट करुन, प्रेमाच्या बंधनासाठी मला तिच्या कुशीत झोपवले. आता मी जगण्यासाठी आवश्यक असलेले प्रेमभरीत स्तनपान करण्यासाठी मोकळा होतो.

घरी आलो तो कोपऱ्यात एक बॅग भरुन ठेवलेली दिसली. आजीच्या बोलण्यावरुन कळले की बाळाच्या आगमनानंतर लागणाऱ्या सर्व वस्तू त्यांत ठेवलेल्या आहेत व ती बॅग तुझ्या जन्माआधीच आजीने करुन ठेवली आहे. लंगोट्‍स, दुपटी, कानटोपी, झबली, स्वेटर, पायमोजे, हातमोजे….

३         मुलामुलींची नावे असलेले पुस्तक, बाळ-बाळंतीनीसाठी सुरुवातीपासून एक वर्षापर्यंत लागणारी सर्व माहीती असलेले पुस्तक इत्यादी. सर्व महत्त्वाचे वस्तू संग्रह त्यात होते. आजी हिच किट बॅग येथून जाताना आत्याच्या आणि तिच्या बाळासाठी नेणार आहे. आजी आता खऱ्या अर्थाने Home Delivary डॉक्टर झालेली दिसते.

अमेरिकेत ‘Use and Throw’ याला फार महत्त्व आहे. तेव्हा Reuse ला येथे Chance मुळीच नाही. आजीने आणलेली सर्व लंगोट अद्यापी बॅगेतच आहेत. येथे Modern पद्धतीचे डायपर्स असतात. बेंबीपासून मांड्यापर्यंत सर्व एकदम पॅक केल्याप्रमाणे गच्च कव्हर केले जातात. इतकी काळजी ते मोठ्या व्यक्तीसाठी येथे करीत नाहीत. आजोबा म्हणाले की आदित्य दर अर्ध्या तासाला ‘सू’ करीत असे व अडीच  तासाने शी करायचा. माझे मात्र दोन्ही कार्यक्रम एकदमच अडीच तासाने  होत असतात. ‘सू’ व ‘शी’. परंतु तुला गंमत सांगू या डायपरमध्ये पाच वेळा होणाऱ्या ‘सू’ ला शोषून ठेवण्याची क्षमता असते. तेव्हा मी सू किती वेळा केली हे फक्त मलाच कळत असे. विनाकारण त्रास नको म्हणून मी प्रत्येक वेळा कोकलण्याचे टाळत असतो.

मी दोनच दिवस हॉस्पीटलमध्ये होतो परंतु या दोन दिवसांत डझनभर तरी डॉक्टर तज्ञ मंडळी मला तपासून गेली. मला कळले की त्यांना कोणताही कॉल दिलेला नव्हता. परंतु एक पद्धती म्हणून सर्वजण आले. बाळंतपण केलेल्या मोठ्या डॉक्टरानेच मला OK चे सर्टीफिकेट दिले होते. परंतु पुन्हा बालरोगतज्ञ (Pediatrician ) आले, नंतर नवजन्म तज्ञ, ( Neonatologist, डोळे बघणारा ( Ophthalmologist ) , कान नाक घसा ( ENT Surgeon )  बघणारा, सर्वजण तपासून गेले. पुन्हा कानाचे मशीन लाऊन, मला ऐकू येते का ते बघणारा आला. (Thanks God त्यांच्या गलक्यांनी माझे कान किटले नाहीत.)  रक्त, लघवी इत्यादी तपासणारा येऊन गेला. त्यांच्या व्यतिरिक्त नर्सेसची तर संख्या मोजणे कठीणच होते. बाबा ते बसल्या बसल्या मोजत होते. एकजण आला व माझा एक पाय हलवून तपासून गेला. मी वाट बघत होतो की कदाचित दुसऱ्या पायासाठी दुसरा कुणी तज्ञ येईल. मोठ्यांच सगळंच मोठं. जिथे Chance मिळेल तिथे वेगळेपण निर्माण करण्यात येथील लोक फार हुशार असतात. आजोबांनी तेथील डॉक्टरांचे नाव घेवून खूप कौतुक केले. म्हणाले भारतात , येथील डझनभर तज्ञांनी जे केले ते एकट्यानी अतिशय चातुर्याने व व्यवस्थीत तुझ्यासाठी केलं. मला तर अद्याप कल्पना शक्ती नाहीये. परंतु अशा बाबतीत ती नसलेलीच बरी नाही का. जगामधल्या अत्यंत चांगल्या व अद्यावत अशा या हॉस्पीटलमध्ये माझा जन्म व्हावा, हे मी माझे भाग्य समजतो. मला Thanks त्या येथील इन्शूरस कंपनीस ( Health Insurance Company ) द्यावयाचे आहे की ज्याच्यामुळे हे शक्य झाले. जवळ जवळ ३५००० डॉलर्स (म्हणजे १६ लाख ८० हजार रु.) खर्च आला व त्यांनी तो केला. आजोबा म्हणतात की आपली सर्व जमीन व बांधलेले घर दोन्ही विकून सुद्धा पैसे कमी पडेल.

४      डिस्चार्जच्या दिवशी तेथील प्रत्येक नर्स येवून Best Wishes देवून जात. अमेरिकन लोकांमध्ये Formalities व प्रेमळपणा व्यक्त  Express करण्याचे जबरदस्त वेडच असलेले जाणवते. मुखवटे चढवावे तसे ते चटकन तोंडावर घेतात व Express करतात, त्यासाठी Feeling ह्रदयामधून येण्याची मुळीच गरज नाही. नाहीतर आपल्याकडे. ह्रदयातून लहरी उत्पन्न होतात, डोळ्यात चमकतात, चेहऱ्यावर पसरतात व मग Express होतात. बराच वेळ लागतो यासाठी म्हणतात. येथे Hi, हा, हा, Ok, बा, See you, Best Luck असे कंप्यूटरमध्ये Fix करावे असे शब्द त्यांच्या मुखात एकदम फिट झालेले असतात. ते क्लिक होण्यासाठी ओळख, सहवास, प्रेम, भावना यांच्या फापटपसाऱ्याची मुळीच गरज नसते. माणसाच्या चेहऱ्याऐवजी चांगला पूतळा जरी त्यांच्या जवळ नेला तरी ते Hi म्हणून हासून स्वागत करतील. Everything is mechanical.

हां ।  ह्या Mechanical वरुन आठवले. माझ्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशीच आम्हाला Discharge दिला गेला. आजीने रुम मधील सर्व सामान आवरुन घेतले. आजोबांनी काही बॅग्ज घेतल्यावर बाबांनी Formalities पूर्ण केल्या. मी आईच्या कुशीत शांत बसून टक मक टक मक करुन बघत होतो. आम्ही जाणार इतक्यात Hospital ची Security मधली बाई आली व विचारु लागली   “तुमची कार सीट कुठे आहे? तुम्ही मुलाला असे अंगावर घेवून जावू शकत नाही.”  बाबा गेले, त्यांनी गाडीतून Car seat (अर्थात लहान बालकाला नेण्यासाठीची टोपली) आणली. मला त्यात ठेवले गेले.  बेल्टने बांधले गेले.  दुकानामधून विकत घेतल्या गेलेल्या,  एखाद्या नवीन कंप्यूटरचे Parcel कसे संभाळून नेतात, तसे मला उचलून Hospital च्या बाहेर आणले गेले. त्या (Car Seat ) ला माझ्या सहीत, गाडीत Fix केले. एकदम पक्के. येथील लोकांनी माझ्या आईच्या भावनेचा चेंदामेंदा केलाच पण माझ्या नवजात बालमनाची कदर केली नाही. हेच माझ्या उमलणाऱ्या बालमनातील पहीले अंकूर बीजरोपण. Everything disciplined and mechanical . But  no touch of feelings.

निघताना जेव्हां नर्सेस येवून शेक हँड करावयाच्या किंवा प्रेमाने गळ्यांत पडावयाच्या तेव्हा Response देण्यात बाबा इतकच आजोबापण उत्सुक असल्याचे जाणवले. आजोबा तर म्हणाले कि आदित्याचा पण जन्म येथेच व्हावयास हवा होता. पण त्यांचे हे विचार अगदी शेवटी Discharge च्या वेळीच निघाले हे लक्षात घेण्यासारखे होते.

तुझ्या ‘सू’ ‘सू’ च्या खूपच गमती आजोबा आजीकडून ऐकल्या. त्या कारनाम्यामुळे येथे सर्वांची करमणूक झाली. पण माझी मात्र कुचंबना होण्याची वेळ आली होती. तू तुझ्या ‘सू’ च्या धारेचा सर्वानाच प्रसाद दिलास, सर्वात प्रथम आत्याचे कपडे खराब केलेस. बाबांचा शर्ट, आईची साडी, आजीच्या अंगावर.  इतकेच काय तर एकदा तुझे पाय तुझ्या आईने वर धरले तर ती अशी धार मारलीस की तुझ्याच चेहऱ्यावर नेम धरला गेला.

५    मी तुला पूर्वीच सांगितले ना माझी पंचायत त्या डायपर या तथा कथीत modern लंगोटने केली. अरे एकदम टायीट. त्यामुळे ‘सू’ ला धारेच्या रुपात बाहेर येण्याचा चांन्सच नाही. पण परवा खूप मजा आली. ‘सू’ साठी कळ आली म्हणून किंचाळलो. आजोबा जवळच होते. त्यांनी डायपर काढताच, मी जी धार मारली ती नेम साधून त्यांच्या शर्टाच्या खिशात. सर्वच खदखदून हसले. माझे पण समाधान झाले.  ‘हम भी कुच कम नही’ हे वाटू लागले. आजोबांची काही तर गडबड चालू होती. डायपर ते त्यांच्या शर्टाचा खिसा हे अंतर टेपने मोजीत असल्याचे दिसले. तीन महिन्यांच्या त्यांच्या येथील वास्तव्यांत कदाचित त्यांचा एखादा थीसीस ‘नव बालकांची सू क्षमता’ या विषयावर लीहून जर युनीव्हरसीटीमध्ये सबमिट करण्याची शक्यता आहे. स्टॅयाटीसटीकल बेस्ड लहान लहान विषयावर मोठे प्रबंध लीहून पी.एच.डी. करण्याचे अमेरिकन लोकांना एक वेडच असते. आजोबा कमीत कमी त्यांच्या वेडांत सहभागी होऊ इच्छीतात.

पत्र वाढत चालले आहे. अजून बऱ्याच गमती जमती व रोज काहीतरी नवीन घडते. तू पण तुझे अनूभव साठून ठेव. लवकरच दोघे भेटूत. हे एप्रिल फूल नव्हे बरका. हीच तारीख तिथे येण्याची आज तरी ठरत आहे. लवकरच भेटूत. काका, काकू, आत्या, मामा, नाना, नानी यांना नमस्कार.

सर्वांचाच-  जगातील अनुभवांचा अस्वाद घेणारा.

लंगोटीयार  आकाश

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     *** ५बोल सारे अनुभवांचे   त्या बोलीची भाषाच न्यारीसुख दुःखाच्या गुंत्यामधला   अर्थ सांगतो कुणीतरी

 

बालकांची दोन पत्रे. १) बालक पुतण्याचे पत्र-

 बालकांची दोन पत्रे.            १)    बालक पुतण्याचे पत्र-

( आठ दिवसाच्या पुतण्याने (भारतातल्या) काकूस (अमेरिकेतील) लिहीलेले पत्र )

प्रिय काकू,

Hi, आणि सा. नमस्कार. तुला वाटत असेल हा कोण? मला अद्याप नाव नसलं तरी रक्ताच, घराण्याच अस नातं मात्र निश्चितच निर्माण झालेलं आहे. त्यामुळे त्या नात्याचाच आधार घेवून मी तुला काकू म्हणालो. खर म्हणजे मला प्रथम पत्र लिहावयाच होत ते माझ्या आईला. परंतु मी या जगात आल्यापासून, नव्हे त्याच्या पूर्वीही जेव्हा मी तिच्या पोटांत होतो ना, ती क्षणभर देखील मजपासून दूर झालेली नाही. मी सतत तिच्याच सहवासामध्ये आहे. त्यामुळे तिला जे माहित आहे ते सर्व मला देखील ठाऊक आहे . व मला जे ज्ञात आहे ते तिला देखील समजल आहे. तेव्हा मजकूर काय? विचार काय? आमची देवाण-घेवाण होवूच  शकत नाही. मग मीच विचार केला की तू येथून खूप खूप दूर आहेस ना ? मग तुलाच पत्र लिहून आपलं मनोगत सांगाव.  म्हणजे तुला माझा Bio-data, नव्हे जन्म कुंडली, नव्हे जन्म प्रवास समजेल. खरं सांगू काकू मी जसा आलो तसेच तुझेही बाळ माझ्याप्रमाणे येण्याच्या मार्गावर आहेच. म्हटले माझा प्रवासी अनूभव जर तुझ्या कानावर घातला, तर माझ्या लहान भावडांचा या जगांत येण्याचा मार्ग थोडातरी सुकर, सुखकर आणि सुयोग्य होईल. कोणतीही घटना घटताना जेव्हा संपूर्ण नावीन्यपूर्ण असते ना, त्यावेळी मन नेहमी साशंक असून एका अज्ञानाच्या मार्गामुळे खूपच काळजी वाटत असते. पण मी जेव्हां त्या प्रवास मार्गाबद्दलचा तपशील तुला सांगेल ना तेव्हा तू योग्य त्या तयारींची काळजी घेशील.  व मग कोणतीही प्रसंग अघटीत होणार नाही.

काकू तुला आश्चर्य वाटेल पण मला तर तुझे आणि काकांचे नाव तर खूप पूर्वीच समजले होते. मी जेव्हां आईच्या पोटांत होतो ना, जगांत येण्याच्या आधीच तेव्हाच कळले. आई-बाबा, आजोबा-आजी जेव्हां गप्पा मारायचे, तेव्हां तुमचा विषय निघायचा. त्याचवेळी मी पण ऐकत होतो. अग, तुला माहितच असेल ना की अभिमन्यू जेव्हां त्याच्या आईच्या पोटांत होता, तेव्हांच तो जगातल्या खूप गोष्टी ऐकून शिकला होता ना. मला बोलता आले असते ना तर मी सर्व काही व्यवस्थीत सांगू शकलो असतो. माझी सर्व इंद्रिये अतिशय चांगल्या प्रकारे कार्यारत होते. मला सभोवतालच्या सर्व जगाची पूर्ण जाणीव होत होती. सर्व व्यक्तींच्या हालचाली, त्यांचे बोलणे, अस्तित्व, मला सार काही कळत होते. तुला गंमत सांगू मला नुसते बाहेरचे जग, बाहेरील व्यवहार कळत होते असे नाही, तर माझ्या आईच्या अंतर           मनाची, अंतर जगाची देखील पूर्णपणे जाणीव होत होती. माझ्या आई – बाबांनी माझ्या बद्दल केलेली व्यक्तव्ये, अंदाज, स्वप्ने इत्यादी. त्याचप्रमाणे माझ्या प्रकृतीसाठी, माझ्या उदयास येणाऱ्या मनाच्या स्वास्थ्यासाठी, ते चांगले विचार, संस्कार करीत होते.

2             ज्या उच्य प्रतीच्या आध्यात्मीक प्रेरणांच्या लहरी मला देत होत्या ना, त्या सर्व शक्तींची मला तीव्रतेने जाणीव होती. सारी शक्ती मजमध्ये संकलीत होत होती. ज्या गोष्टी त्यानांही समजत नव्हत्या, नव्हे माझ्या बाबांच्या बाबांना अर्थात आजोबांना देखील समजत नव्हत्या, अशा सर्व सूक्ष्म बाबींचे संकलन मी माझ्या मनांत (वा बुद्धीला) करुन ठेवीत होतो. माझं फक्त आताच्या घडीला एकच Bad Luck आणि ते म्हणजे मला बोलताच येत नाही. नाहीतर थेट तीन-चार महीन्यापूर्वीचा सारा वृतांत मी धडा-धडा बोलून दाखविला असता. आणि केवळ मला बोलता येत नाहीना, तर हे सारे आजूबाजूचे लोक मला ‘नासमज’, अज्ञानी याला काय कळतं, इत्यादी उपाधी देवून माझ्याकडे अतिशय दुर्लक्षून बघत असतात. व आजही तसेच समजतात. पण मी सर्वांना सांगू इच्छीचो की थोडे थांबा, मला बोलण्याची कला येऊ देत, भले ते बोबडे बोल का असेना, मग सारे काही बोलेन, तेव्हा सर्वजण तोंडात बोटे घालून म्हणतील, “आरे कुठे शिकला हे सारे. याला सारे समजते. आपणच त्याला नासमज म्हणून म्हणत होतो…..” इत्यादी. अग बाहेरच्या गप्पा ऐकताना मला पण जेव्हां आवडलं ना तेव्हा मी पण टाळी वाजवायचा, नाचाया देखील. परंतु हे कुणालाच कळत नव्हते. आई म्हणायची “बाळ काय सारख फिरतय” कमाल आहे नाही. त्यांच मला कळायच पण माझ मात्र त्यांना काही कळायचं नाही.

मला या जगात येवून केवळ चारच दिवस होत आहेत. बराच काळ मला आईच्या पोटांतच राहून बाहेर येण्याची वाट बघावी लागली. माझी शेवटी शेवटी सर्व तयारी झाली होती. पण कुणीच लक्ष देत नव्हते. माझ्या जन्माच्या आदल्याच दिवशी, आईने स्व:ता पावभाजी, आईस्क्रीमीची ट्रीट दिली होती. ती जे जे करीत होती व जे जे बोलत होती, ऐकत होती त्याचा मी स्वत: साक्षीदार आहे. पण माझ्याकडे लक्ष देण्यास कुणासच फूरसत नव्हती. त्यांना काय माहीत की या सर्व Activities वर माझीपण नजर खिळून होती. रात्रीतर मध्यरात्र उलटेपर्यंत सारे काही आनंदमय वातावरण होते. मग मीच का म्हणून मागे राहू. मलाही खूप खूप आनंद झाला होता आणि त्यांच्या आनंदात सहभागी होण्यासाठी मी पण नाचू लागलो, टाळ्या वाजवू लागलो. पण गंमत सांगू काकू तुला, सर्वांनी आनंद साजरा केला. परंतु माझ्या आनंदाला वेगळेच रुप देवून, मला चक्क आईसह हॉस्पीटलमध्ये सकाळी नेऊन सोडले. अर्थात मी माझा उत्साह आवरता घेतला व शांत झालो. मी माझ्या आईस बघण्यासाठी फार उत्सुक होतो. येताच मी आनंदाने किंचाळलो. नंतर माझा जीव शांत झाला. मला मोठी गमंत आणि आश्चर्य वाटले ती डॉक्टर काकूंचे. ती माझ्याशी, माझ्या आगमनाच्या दिवशी अतिशय रफ (वाईट) वागली.

थोडा देखील हळूवारपणा दाखविला नाही. किती नाजूक होतो मी, अगदी कळीचे फुलात रुपांतर होताना कसे मोहक व आल्हादकारक वाटते ना तसा. पण तीने मला पूरता उलटा सुलटा केला, प्रत्येक अवयव वाकडे तिकडे करुन बघीतले. तीला माझ्यांत कोणते

3       व्यंग आहे का हे बघण्याचीच उत्सुकता होती. म्हणाले कुठेही व्यंग नाही. No Congenital Anomaly, सर्व अवयव ठीक ठाक आहेत.  माझ्या पायावर त्यांनी एकदम चापटी मारली. मी एकदम तळतळून रडलो तर म्हणतात कसे “रडतो चांगला बरे” कमालच आहे की नाही. रडण हे देखील चांगल असत हे मला माझ्या जीवनाच्या पहील्याच दिवशी कळलं. तीच वागणं मला फार विचित्र वाटलं. डॉक्टर काकूंचा शोध माझ्यांत काही व्यंग आहे का, वाईट आहे का त्यांच्यासाठी होत असल्याची मला जाणीव झाली.  आणि ती माझी आजी, ती देखील तशीच. आज आल्या आल्या तीच लक्ष मी ‘सू’ केली का ?, ‘शी’  केली का ?, ‘उलटी’ झाली का ?, अधून मधून ‘रडतो’ का ?, बस अशीच चौकशी. कुणी म्हणाले मी बाबाप्रमाणे दिसतो. म्हणजे माझे नाक व चेहरापट्टी त्यांच्या सारखी आहे. कुणी म्हणाले चेहरा गोल असून रंग गोरा आहे. आईप्रमाणे आहे. माझ्या प्रत्येक अवयवांच पृथकरण होऊन कोणता भाग कुणासारखा आहे त्याची यादीच मोठी होत होती. प्रत्येकजण आपला त्यात सहभाग व्यक्त करीत होता. डॉक्टर आजीची तर एकदम कमाल. तिला तस काहीच सापडलं नाही, तरी तिचा प्रयत्न आपला नंबर वर ठेवण्याचा होता म्हणाली. बाळाचा Blood group A +ve आहे. मला हे सार ऐकून खूप मौज वाटत होती.  आणि माझे ते भाव माझ्या चेहऱ्यावर दिसत होते. माझ्या मनांतून उत्सुर्त आलेलं हास्य, प्रथम टिपले ते आत्याबाईंनी. माझ्या चेहऱ्यावर निर्माण झालेल्या प्रत्येक हालचालींची त्यांनी योग्य ती कदर केली. त्याच योग्य विश्लेषण केले. मी पण त्याच्यांवर फार खूश झालो. काहीतरी Gift घ्यावी वाटले. काकू तुला सांगू, माझ्याकडे तर त्यावेळी काहीच नव्हतं. मी चक्क तिच्या अंगावर पहीली ‘सू’ केली व Congratulation च्या स्वरात किंचाळलो.

काकू खर सांगू, हे सर्व माझ्या या जगांत येण्याच प्रवास वर्णन वाचून तुला खूप बर वाटल असंल. गमंत वाटली असेल व आनंदपण झाला आसेल. तुला अजून न बघता देखील मी तूझा प्रफूल्लीत झालेला चेहरा कसा असेल, याचे चित्र माझ्या चिमकुल्या डोळ्यापुढे आणू शकतो. पण तुला माहीत असेलच कि जेव्हां आपण सर्कस बघतोना त्या कलाकाराच्या उलट्या सूलट्या उड्या बघून खूप करमणूक होते. आनंद वाटतो. पण कुणीच विचार करीत नाही की त्यांच्या उड्या, करामत इतकी साधी गोष्ट नाही. त्याच्यामागे श्रम, तपश्चर्या आणि साहस यांचा मधूर मिलाप दडलेला असतो. दिसणारे चित्र आणि असणारे चित्र यांत खूप तफावत असते. तू म्हणशील काकू की मी कोणते तत्वज्ञान सांगू इच्छीतो. मी पडलो अज्ञानी मी काय ह्या जगांत नवीन सांगणार. पण मी आहे एक ‘साक्षी’,  एक साक्षीदार जो आईच्या पोटांत राहून अंतर जगातील व बाह्य जगातील सर्व घटणांचा अनूभवी.

त्यामुळे मी जे सांगतो ना ते एक दीर्घ काळापर्यंत अनूभवलेले आणि परिणामी अत्यंत आनंद देणारे एक सत्य आहे.

4       डॉक्टर Anti अर्थात Gynecologist यांच्याकडे माझ्या आईला बाबा किंवा आजीला घेवून जात असे. जशी मला समज येवू लागली. मी त्यांनी दिलेला उपदेश माझ्या बुद्धीत साठवून ठेवला. माझ्या आईने तिच्या बुद्धीत तो साठविला. त्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी.

१)  सदैव प्रफूल्लीत व आनंदात रहा. त्याने आईची व बाळाची प्रकृती पण चांगली राहते.

२)  सदैव चांगल्या गोष्टींचा विचार करावा, चांगले वाचावे, चांगले लिहावे. (जमल्यास) अध्यात्म्याची नितीज्ञानाची, संस्कार रुजविण्याची पुस्तके, देवादीकांच्या कथा, स्तोत्रे वाचवित. चांगले चारित्र्यवान गोष्टी एक प्रकारच्या लहरी निर्माण करतात व त्याचा बाळाच्या मानसिक विकासासाठी अप्रत्यक्ष खूप उपयोग होतो. जे तुम्ही ९ वर्षात बाहेर मिळवू शकणार नाहीत, ते केवळ ९ महीन्याच्या काळांत मिळविता येतो. हे पौराणिक विचार नव्हेत तर प्रयोगांनी सिद्ध झालेले एक शास्त्रीय सत्य आहे.

३)   रोजच्या आहारात भाज्या, फळे, दुध, ताक, डाळीचे पदार्थ आणि पिष्टमय पदार्थ योग्य त्याप्रमाणात असावे. आहार सकस व प्रमाणशीर असावा, नियमीत असावा. आपल्या जेवणांत जवळ जवळ सर्व गोष्टी असतात. परंतु जेवणाच्या बाबतीत दुर्लक्ष करु नये. तुला भूक नाही म्हणून न जेवणे वा कमी जेवणे हे मुळीच चालणार नाही. कारण तुझे जेवण फक्त तुझेच असते असे नाही, ते दुसऱ्याचे जेवण पण असते. त्याच्या शारिरीक वाढीसाठी लागणारे घटक पदार्थ केवळ तुझ्यामार्फत त्याला मिळत असतात. याचा विचार मनाच्या कोपऱ्यामध्ये पक्का कोरुन ठेवणे. तुझी कोणतीही दुर्लक्षीत केलेली कृती ही खूप खूप त्रासदायक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

माझी आई खाण्याच्या बाबतीत फारच निवडक होती. तिला भूकपण लागत नव्हती. परंतु तिला सर्वांनी व्यवस्थीत समज दिली. आणि तिने पण स्वत:चा हट्ट, सोडून केवळ माझ्यासाठी आहारांत योग्य बदल व योग्य सेवन सुरु केले. ए तू आईला सांगू नकोस, पण ती ५५ किलो वजनापासून मी जगात येण्याच्या दिवशी ७६ किलो वजनाची झाली होती. आता तिचे वजन ६९ किलो आहे.

४)    अत्यंत कंटाळवाणी गोष्ट, परंतु अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ‘व्यायाम’ याच्याचसाठी मी सुरवातीला सर्कशीचे उदाहरण दिले होते. बाकी सर्व गोष्टी करणे शक्य होते. पण व्यायाम करणे म्हणजे एक दिव्यच. त्यातही डॉक्टरांनी अतिशय मध्यम मार्ग काढला होता. घरामधील प्रत्येक गोष्ट स्वत: करण्याचे बंधनच आईवर टाकले होते. ती माझी आई कामाच्या बाबतीत फार उत्साही.  तो उत्साह Casual नसावा म्हणून त्याला Medical Advice ची

झालार लावली, म्हणजे मुळीसुद्धा कंटाळा करता कामा नये. घरातले झाडणे, स्वयंपाक, साफसफाई, कपडे धुणे इत्यादी कामे दिसायला लहान असतात.

5      तरी सतत व्यस्त ठेवून शरिराच्या प्रत्येक अवयवाला व्यायाम देतात. Movements देतात. पोटांत वाढणाऱ्या बाळाला आईच्या सततच्या योग्य त्या हालचालींमुळे स्वत:ची बैठक पण व्यवस्थीत set करता येते. तिचा हालचालीच्या वेळीच, तो आपला मार्ग अतिशय सुकर करतो. जेणेकरुन वेळ येताच बाळ चटकन व चांगल्याप्रकारे बाहेर येवू शकते. बाळाच्या या अतिशय मुख्य प्रवासासाठी, आईची योग्य साथ मिळणे हे फार जरुरी आहे. माझ्या आईने खरेच यासाठी थोड्याशा काळासाठी का होईना खूप श्रम घेतले. कष्ट सोसले. तिची पाठ दुखत असे. ती विव्हळायची, रात्री झोप लागण्यास त्रास व्हावयचा. पण तिने माझे व पर्यायाने तिचेदेखील भावी सूखकर आगमन डोळ्यासमोर ठेवले. व त्यामुळेच माझ्या प्रवासाचा शेवट अतिशय समाधानकारक व चांगला झाला.

तसे म्हटले तर घरांत नोकर, आजी बाबा होते पण तरीही केवळ शारिरीक हालचालींना प्राधान्य देण्यासाठी, ती कुणालाच काम करु देत नव्हती. स्वत:च घरातील सर्व कामे करावयाची. अग काकू मला पण तिची किव येत असे पण काय करणार

व्यायामामधला सर्वात चांगला प्रकार म्हणजे ‘फिरणे’ रोज एक तास आई केव्हा बाबा बरोबर तर केव्हा आजी बरोबर बाहेर फिरण्यास जात होती. कुणीच मिळाली नाही तर घरातल्या घरातच, या खोलीतून त्या खोलीतून चकरा घालायची पण व्यायाम पूर्ण करावयाची. कुणावर अवलंबून नाही. काकू तू पण व्यायामाबाबतीत हालचालीबाबतीत मत्र निश्चिचपणे आईप्रमाणेच Follow up कर. म्हणजे माझ लहान भावंड व्यवस्थीत येवून सर्वांना आनंदीत करेल.

५)    तू ज्यांच्या supervision  खाली तिथे Medical सल्ला घेतेस ना, त्यांच्याच सल्ल्याप्रमाणे वाग. मात्र त्यात कोणतीही हयगय नको. आजचे श्रम, कष्ट, उद्याचे आनंदी वातावरण निर्मितीचे असणार.

काकू तुला सांगू, माझी वाढ व प्रकृती (Growth Development and Health) केवळ नॉर्मलच नाही तर मी केवळ चार दिवसामध्ये बरीच प्रगती केल्याचे Remarks डॉक्टराकडून ऐकू येतात. याला कारण मी अनूभवलेल्या डॉक्टरांच्या सूचनांचे आईने केलेले तंतोतंत पालन.

बाबा आईच्या थकव्याकडे, पाठ दुखण्याकडे व प्रकृतीकडे जास्त लक्ष देवू लागले. त्यांची इच्छा असो वा नसो ते रोज आईला एक तास बाहेर फिरवून आणू लागले. आईचा थकवा कदाचित वाढत होता. परंतु त्याच प्रमाणात तजेलेपणा  देखील वाढत जात असल्याचे स्पष्ट            दिसत होते. मी पण खुशीने नाचत असे आणि माझ्या या नाचण्यानेच माझी प्रकृती देखील चांगल्याप्रकारे आकार घेत आहे याची सर्वांना जाणीव होत होती.

6          मला उत्सुकता आहे ती मला लहान भावडांशी खेळण्याची. माझी इच्छा आणि अपेक्षा तुमच्या दोघांच्या लक्षात आलीच असेल. ते भावंड कुणीही असो परंतु ते निश्चित सुदृढ असले पाहिजे. म्हणजे मग खेळण्यात खूप मज्जा येईल. आणि त्याचसाठी तू खूप काळजी घेत जा. जसे मी वर वर्णन करुन सांगीतले त्याप्रमाणे.

मला आई बाबा, आजी आजोबा ‘शांत’ आहे, रडत नाही आणि अशाचप्रकारे खूप मोठेपणाची विशेषणे माझ्या माथी मारतात. त्याचा अर्थ तू असे मुळीच समजू नकोस की मी एखादा आदर्शाचा पुतळा होणार आहे. नव्हे मी एकदम आपल्या सर्व वडीलधाऱ्याप्रमाणे त्यांच्या बालपणाच्या काळाप्रमाणे असेल. अरे श्रीकृष्ण पण मोठा झाल्यावरच मोठा झालाना. त्यापूर्वी त्यांनी त्यांच्या लहान वयांत केलेले सर्व कारनामे, प्रताप मी पण करणार आहे. सर्वांना त्रस्त करणार, रडकुंडीला आणणार, तोडमोड करणार, नुकसान करणार, मारामारी करणार, खेळणार, हसवणार देखील. माझ्या बुद्धीने सुचविले त्याप्रमाणे परिस्थितीचा विचार करुन सर्वांना खूप खूप आनंद देणार. माझ्यात हे सर्व गुण असतील. ज्याला जसे भावेल त्याप्रमाणे त्यांनी ते मान्य करावे. मग माझ कौतुक करा,  नाहीतर मला धम्मक लाडू द्या. साऱ्या साठी मी तयार असेन.

असो आता येथेच थांबतो. नवजीवनाचा एक साथीदार म्हणून व्यक्त केलेले माझे मनोगत तुम्हाला पटते. तर त्याकडे एक सत्य अनुभव म्हणून बघा. योग्यवेळी योग्य गोष्टींचा विचार , म्हणजेच Stitch is time saves  nine  ह्या संकल्पने प्रमाणे.

पुन्हा काका, काकू यांना माझे सविनय प्रेमळ नमस्कार. तुमच्या भेटींसाठी खूप खूप उत्सुक आहे. तुमच्या नवीन येवू घातलेल्या बाळासाठी आणि माझ्या लहान भावंडासाठी माझ्या सदिच्छा. अद्यापतरी माझे नामकरण झालेले नाही , होईल तेव्हा नाव व इतर उपाध्यायासहीत कळवीन. तुमचा प्रेमळ पुतण्या. – अनामिक

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी  ***४ संपून जाईल कधीतरी सारे   मर्यादा ह्या ठरल्या असतां

जागृत रहा सदैव मनी    उंच भरारी घेतां  घेतां

* पंख फुटता !

पंख फुटता !

ते जातील उडूनी पंख फुटता   पाहत राहशील, डोळे भरुनी

आजवरी जे प्रेम दिले तू   शक्ती त्याची उरी बाळगुनी

माया, वेडी कशी असे बघ   वाटते तुजला तुझीच पिले ती

हसून, खेळून बागड्तील  सदैव तुझ्या पदारा खालती

जेंव्हा पडले पाउल पहिले   आधाराविण तुझ्या अंगणी

नांदी होती दूर जाण्याची   तुजपासुनी त्याच क्षणी

परी दूर दृष्टी ही नव्हती तुजला   मायेचा तो पडदा असता

टिपून घेशी अश्रू आज ते   परिस्थितीची जाणीव होता

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी    ***३

अस समजल जात की मुल गर्भांत वाढत असताना, वा जन्म होताक्षणी त्याच्या हालचाली मधून ज्या लहरी उत्पन्न होतात, जो आवाज ध्वनीत होतो, जणू एखादा हूंकार बाहेर पडून ऐकू येतो. तो असतो ‘सोहंम’ (तो मी आहे)  – ‘कोहंम’  (मी कोण आहे) – ‘अहंम’ (मी आहे)  ह्या प्रतिध्वनीमध्ये. शास्त्रकारांनी ह्या शब्दांचे वर्णन अप्रतीम व अतीशय योग्य पद्धतीने केलेले आढळते. ते नवजांत बालक जणू जगाला ह्या त्याच्यासाठी असलेल्या नव्या वातावरणाला ओरडून सांगते की ‘ बाबानो मी तोच आहे. मी कोण आहेस, मी आहे, ‘

अर्थात जीवनांत फक्त ‘मी’ ला जाणा

गर्भातून ज्ञान विकास

गर्भातून ज्ञान विकास

मानसीने नुकतेच दोन वर्ष पूर्ण केले होते. तिच्या सर्व हालचाली मनास खूप प्रसन्नता देत होत्या. तिचे दुडु दुडु पळणे, पडणे, रडणे, हट्ट करणे, कोणत्याही वस्तूला बघणे, हाताळणे, तोडफोड करणे सारे काही तिच्या वाढीचा वेग दर्शवीत होते. मला मात्र एका गोष्टीचे सतत आश्चर्य वाटत होते. हे तिच्या बोबडे बोलण्याचे. ती पूर्ण वाक्ये उच्चारीत होती व भावना तोडक्या मोडक्या शब्दांत व्यक्त करीत होती. बरेच ज्ञान, माहितीही तिने सभोवतालचा परिसर, ह्याच्या संपर्कामधून ग्रहण केली होती. जे ती बघे, ऐके तेच ती पुनुरुच्चारीत असे. हे सारे सामान्य होत. मात्र एक गोष्ट तिव्रतेने जाणवली. ती म्हणजे तिचे टेबल टेनीस खेळावरील प्रेम, ज्ञान व आवड. ते ती सतत व्यक्त करीत असे. समजण्याच्याच काळात तिने त्या खेळाबद्दल बरीच माहिती संकलीत केल्याचे आढळून आले. तसा तीचा दर दिवशी टे.टे. चा संपर्क नव्हता तरी देखील. मात्र एक सत्य होते की तीची आई टे.टे. ची खेळाडू champion होती. तिने जिल्हा, प्रांत यातसुद्धा यश मिळवून देशस्थरावर गेली होती. टे.टे. हा विषय तिच्या रक्तात, मेंदूत पक्यापद्धतीने स्थित व स्थीर झालेला होता. मात्र आजकाल इतर कार्यबाहुल्यांमुळे तिचे टे.टे.कडे फारसे लक्ष नव्हते. तसा तो विषय बाजूस पडला होता. तरी त्याविषय बद्दल मानसीमध्ये निर्माण होणारी आवड attachment मन वेधून घेत होती.

आज अचानक एका शास्त्रिय मासिकांत वाचण्यात आले. नुकत्याच डेन्मार्क येथील वैद्यकीय शास्त्रज्ञाचा अहवाल प्रसिद्ध झाला आहे. त्यांनी सहा हजारपेक्षा जास्त गर्भवती स्त्रिया व नवजात बालके यांचा सखोल अभ्यास व सर्वेक्षण केले होते. बालकामध्ये गर्भात असताना, होणाऱ्या वाढीच्या वेळीच त्याच्या मेंदूची वाढ होत असते. मेंदूचे कार्य हे गर्भात असतानाच सुरु होते. आईकडून येणाऱ्या प्रत्येक चेतना, या त्या नव बालकाच्या मेंदूत देखील साठवणूक होत जातात. आईला बाह्यांगातून अर्थात सभोवताल परिसर येथून ज्या चेतना प्राप्त होतात, त्या जसे आई आपल्या मेंदूत साठविते, त्याचप्रमाणे त्याचवेळी आईच्या मेंदूतून परावर्तीत होत त्या चेतना नव बालकांच्या मेंदूतही साठवणूक करतात. कंप्यूटरच्या भाषेत बोलावयाचे, तर आईच्या कंप्यूटर मेंदूत डाऊनलोड झालेले सर्व विचार अर्थात चेतना बालकाच्याही मेंदूत transfer होऊन तेथेही डाऊनलोड होतात, फिक्स होतात. हे कायम स्वरुपी असतात. मुलाच्या जन्मानंतर त्याच्यात वाढत जाणाऱ्या समजानंतर, भाषेनंतर त्याला पुन्हा display करता येतात. व हे शास्त्रज्ञांनी सिद्ध केले आहे.

अनेक अनेक वर्षापूर्वी महाभारत काळातील अभिमन्यूची कथा जीला पुराण कथा म्हणून संबोधीले गेले होते. अभिमन्यू गर्भात असताना श्री कृष्णाकडून सुभेद्रेने ऐकलेले

२            चक्रव्यूह भेदण्याचे ज्ञान, हे त्यालाही प्राप्त झाले होते. त्याच्या त्या ज्ञानाचा उपयोग त्याने युद्धासमयी केला. अर्थात ते ज्ञान त्याला पूर्णत: न प्राप्त झाल्याने, त्याचा अंत झाला. कितीतरी कथा ज्या भारतीय संस्कृतीत महाभारत, रामायण इत्यादी ग्रंथात नमुद केलेल्या आहेत व ज्यांना भाकड कथा म्हणून उपहासले गेले. त्याच कथांचे सूत्र, संकल्पना आज विज्ञान सत्त्यतेच्या इमारतीमध्ये प्रदर्शित करत आहे. त्याचा सन्मान, Credit घेत आहेत. पूर्वजांनी आपल्या ज्ञानाने मिळालेल्या अनेक गोष्टी, जसे अस्त्र, शस्त्र, विमान (पुष्पक) आकाशातील भ्रमण, दिव्यदृष्टी, दिव्य श्रवण दृष्टी, अदृश्य होण्याची संकल्पना इत्यादी या एकापाठोपाठ विज्ञान शास्त्राच्या परिभाषेत सत्याकडे झुकत आहेत. आपण आपणास विसरतो व परकिय आपणास सदा श्रेष्ठ वाटत गेले. हे सारे निराशामय वाटते. साठवणूक, विकास व उपयोगींना, असे त्रिकोणातील ही तीन अंगे आहेत. चेतना जर मिळाली तरच साठवणूकीला प्रारंभ होईल. त्यामुळे चेतना ही महत्त्वाची वाटते. वैद्यकीय शास्त्र त्याचमुळे चेतनेची महती गाते. त्याचवेळा शिक्षण क्षेत्रातील मानसशास्त्र त्या चेतनेचे तत्त्वज्ञान मान्य करीत, योग्य व अयोग्य चेतनेचा उहापोह करते. बालकाचा विकास हा नेहमी योग्य अशाच चेतनेमुळे झाला पाहिजे. ज्याला सुसंस्कार म्हणता येईल. चेतनेमुळे मानसिक तणाव ग्रस्तता त्याचवेळी निर्माण होईल, जेव्हा त्या चेतना अहितकारक, असंस्कारीकता किंवा विकसीत होणाऱ्या मेंदूला तो विचार ग्रहण शक्तीच्या मर्यादेबाहेरचा असेल. समजण्याच्या युक्तीच्या बाहेरचा असेल. बालक तो विचार साठवताना एक प्रकारे तणावग्रस्त होईल. त्याला समज येईपर्यंत त्याचे ग्रहण होणार नाही. याच कारणाने हे सर्व शिक्षण क्षेत्र सूचविते की मेंदूची काही अंगे विकसीत होईपर्यंत शिक्षण ही संकल्पना नको. साधारणपणे पाच वर्षे, मुलाना शालेय शिक्षण न देता, त्याच्या आपल्या बुद्धीला परिस्थिती व वातावरणात विकसीत होवू देते. केवळ बाह्य चेतनामय संस्कार त्याच्या पंचेद्रीयावर प्रक्रीया करीत राहतात. साठवणूक होते. हेच तर ज्ञानप्राप्तीचे प्राथमिक द्वार असते. त्याचा प्रथम मुळ असतो निसर्ग. तो मातृत्वाच्या माध्यमातून हे साध्य करतो. विकसीत करतो. बालकाला अवलंबीत्वाच्या धारणेपासून स्वतंत्र जीवन जगण्यासाठी, कला शिकवत असतो. जी पुढे उत्पतीपासून स्थितीकडे व शेवटी लय या संकल्पनेत अंत पावते. मानसीची प्रथम ज्ञान प्राप्ती जरी गर्भातून सुरु झालेली दिसली, तरी तिला तो मार्ग बदलावाच लागतो व ज्ञान वृद्धी तिची तिलाच करावी लागते. तेच तिचे भावी व्यक्तीमत्व ठरेल.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी    ***२ The path of Devotion- भक्तीमार्गांत जगातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वरी अस्तीत्वाची जाणीव असणे गरजेचे ठरते. एकदा हे सारे त्या ईश्वराचेच समजले की माझे, माझ्यासाठी रहात नाही. आसक्ती जाते. कुणावर न प्रेम, न राग. सारे  ईश्वरार्पणची भावना, अद्वैत भावना, जाग्रत राहते. व तुम्ही ईश्वरी प्रेमांत राहतात.