Monthly Archives: एप्रिल 2013

एक विलक्षण अहवाल

जीवनाच्या रगाड्यातून-

एक विलक्षण अहवाल

अमेरिकेतील वास्तव्यांत, एक वाचनालयांत वैद्यकीय शास्त्रातील दोन अहवाल वाचण्यांत आले. त्यांचा मतीतार्थ थोडक्यांत असा होता.

PhD. ही शैक्षणिक क्षेत्रातली सर्वोच्य पदवी. कोणत्यातरी विषयाचा अभ्यास, माहीती, संकलन करुन ते नाविन्य विद्यापिठापुढे सादर करुन मान्यता मिळवणे. व जगापुढे ठेवणे. कित्येक विषय नाविन्यपू्र्ण व चमत्कारी असतात. परंतु ज्ञानामध्ये हातभार लावणारे असतात.   वैद्यकीय क्षेत्रातल्या तीन विद्यार्थ्यानी एक विषयाचा अभ्यास व Statistics गोळा केले होते. तो अहवाल वाचण्यांत आला.

Sex अर्थात  लैंगिकता हा त्यांचा विषय.  Sex efficiency, Tolerance, Bodily stimulation, Ecstasy of Joy, Period of excitation, Post sexual exhaustion, Frequency of sexual acts, Duration of sexual act, इत्यादी अनेक प्रश्नांचा त्यांत उहापोह करण्यांत आला होता.

त्याच प्रमाणे अमेरिकेच्या एका वैद्यकीय मासिकांत अतिशय मनोरंजक परंतु माहीतीपर असा लेख वाचण्यांत आला. तेथील एका Statistic Survey Of human body in Sexual Performances ह्याला अनुसरुन तो विषय हाताळण्यांत आला होता. पौर्वात्य जगतांत सेक्स अर्थात लैंगिकता हा अत्यंत साधा व सामान्य विषय आहे. त्याला कोणत्याच अंगानी त्या विषयाच्या कार्याबद्दल तशी कुणालाही उत्सुकता वा मौज हा प्रकार नसतो. जसे कान, नाक, डोळे, इत्यादी अवयवांचे नैसर्गिक कार्ये, त्याच प्रमाणे लैंगिक इंद्रिये व त्यांचे कार्य. ह्या प्रणालीकडे लोक असे बघतात. आमच्याकडे मात्र लैंगिकता हा प्रचंड उत्सुकतेचा, सन्मानाचा, नैतिकतेचा, आणि अध्यात्मिक प्रांतातला विषय बनून राहिला आहे. जीवनात सखोल महत्व लैंगिकतेला ( Sexuality  )दिले गेले आहे. माणसाचे चारित्र्य व लैंगिकता ह्यांचे संबंध गुंफले गेले आहे. ह्यांतही स्त्री लैंगिकता व तिचे चारित्र्य ह्यांना खुपच एकत्र गुंफले आहे.

लेखाचा अहवाल सांगतो की   Sex  अर्थात् लैंगिकतेमध्ये स्त्रियांची लैंगिक क्षमता ही पुरुषांपेक्षा जास्त असते. लैंगिक उत्तेजना पुरुषामध्ये जलद होते, तशी शमूनपण त्वरीत जाते. उलट स्त्रीयांची लैंगिकता उत्तेजित होण्यास अवधि लागतो, परंतु ती बराच काळपर्यंत चेतनामय राहते.

स्त्री एका वेळी अनेक पुरुषाना देखील लैंगिक समाधान देण्यास सक्षम असते. ह्या उलट कोणताही पुरुष एका स्त्रिला देखील परिपूर्ण लैंगिक समाधान देण्यास असमर्थ राहतो. वैद्यकीय शास्त्राने लैंगिक कार्य प्रणालीची जी उकल शास्त्रीय माहीती व Statistic Information वरुन केली आहे, ती जरी ज्ञान प्रधान व मनोरंजक असली तरी कांही व्यवहार, संकल्पना, धार्मिक पकड, ह्या विषयावर प्रकाश टाकणारी आहे. विशेषकरुन स्त्रियावर होत असलेल्या लैंगिक अत्याचारामधील एक वेगळेच दालन त्याने उघडण्याचा प्रयत्न केला आहे.

पूर्व कालीन गणिका अथवा आजकालच्या वेश्या ह्या व्यवसायाला समाजाने मान्याता दिलेली  आहे. ह्याचे एक महत्वाचे कारण, लैंगिकतेच्या संखेच्या मोजमापात स्त्रीयांची क्षमता. ह्या उलट चित्र आहे ते पुरुषी लैंगिकतेचे.

२                तो लैंगिकतेमध्ये प्रचंड उत्साही वाटला तरी फार अल्प काळांत क्षमताहीन होऊन जातो. सर्व उत्साहाचा शक्तीपात होऊन जातो. बंदूकीचे महत्व त्याच्यामध्ये असलेल्या गोळीवरच ठरत असते. गोळी एकदा का सुटली वा गेली, की त्याचे हत्यार एकदम निकामी ठरते. ती व्यक्ती लगेच हातबल होताना दिसते. बंदूकीची गोळी कदाचित् त्वरीत उपलब्ध होऊ शकेलही. परंतु  खऱ्या जीवननांमध्ये पुरुषाना लागणारी लैंगिकतेसाठीची गोळी ( अर्थात विर्य रस ) निसर्गालाच निर्माण करावी लागते. आणि ही आवधी घेणारी प्रक्रिया असते. कांहीना अनेक  दिवस तर कांहीना बराच काळ. पुरुषाची प्रकृति, स्वास्थ, वय, वातावरण, परिस्थीती,  आहार इत्यादी अनेक घटक त्या प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात. म्हणून तेवढा काळ तो खऱ्या अर्थाने लैंगिक क्षमताहीन झालेला असतो. त्याची लैंगीकता ही ह्याच कारणाने फार अल्पजीवी ठरते. त्याला वेळेचे गणित अर्थात उपलब्धता आणि क्रिया ह्यांचा ताळमेळ जाणून घ्यावाच लागतो. फक्त चालबाजी, दादागीरी, शारीरिक हातपायातले बळ, शाब्दीक वायफळ बडबड आणि  घृणास्पद हालचाली ह्यातच तो आपले वर्चस्व दाखवण्याचा प्रयत्न करतो. पुरुष प्रधानकी त्यांत भर घालते. हे सारे तो वैद्यकीय अहवाल वाचल्यावरच जाणवते. व पटू लागते.

एक पुरुष, तसे म्हटले तर एका स्त्रिला देखील लैंगिक सुख समाधान देण्यात कमी पडतो. काय गम्मत आहे बघा. बहू पत्नीची प्रथा. ह्याच पुरुषानी आपल्या शारीरिक ताक्तीने, धर्मबंधनाने, वा इतर कोणत्या कारणास्तव, निर्माण केली. कोणते संपूर्ण लैंगिक सुख समाघान त्या परिस्थीतीत स्त्रियांना मिळाले असेल. बहूपत्नी ही प्रथा आजही कांही समाजात आहे.

नुकताच आपल्याकडील एक शासकिय समाज शास्त्राचा अहवाल वाचण्यांत आला. विचीत्र  व विलक्षण असा. अभ्यासक म्हणतात की आजच्या घडीला भारतात दोन कोटी तरुण पुरुष असे आहेत की जे शरीराने सशक्त , सुद्दढ, व नॉर्मल आहेत. परंतु ते नपुसक आहेत. ते लैंगिकतेमध्ये लैंगिक क्रियासाठी सक्षम  नाहीत. About two cores of young healthy men are sexually incompetent  in performing intercourse. हे प्रमाण प्रचंड आहे. कारणे देखील बरीच असू शकतील. परंतु परिस्थीती चिंताजनक, निराशमय आहे. वैवाहीक जीवनाचा आत्माच  मुळी लैंगिकता हा असतो. भले तो समयबद्ध असेल. परंतु प्रेरणा देणारा व जगण्याचे आमिश दाखवणारा निश्चीतच असतो. वाढत जाणाऱ्या व होऊ घातलेल्या विवाह बंधनातील वितूष्ट अर्थात घटस्फोट  (Divorce ) ह्याच्या कारणामधील “लैंगिक क्षमता ” हेही एक कारण असल्याचा अहवाल सांगतो. आजपर्यंत पुरुष प्रधान सकल्पनेने अशा अनेक व्यंगावर, वागणूकीवर, जबरदस्तीने पांघरुण घातले होते. स्त्रिला ते सहन करावे लागले. व्यसन, दारुबाजी, बाहेरख्यालीपणा, ह्या गोष्टी लैंगिकतेमध्ये प्रचंड बाधा आणतात.

आता विचार मालिका बदलत आहे. मात्र दोघानीही ह्या विषयी समजदारी व संयमाने मार्ग आक्रमण करावा. भावनिक विचारांचा त्यांत गुंता नसावा. लैंगिक शिक्षण अशाना मार्ग दर्शन करेल. हाच त्या अमेरीकन उच्य शिक्षीत विद्यार्थ्यानी आपल्या विषयामधून काढलेला निशकर्ष मला समजला.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२१जीवनमार्गावरील प्रत्येक चुकासाठीं किमत मोजावी लागतेतुम्ही किती दक्ष आहांत ह्यानेच ती टाळता येते

 

महाराजानी मिळवले देवत्व

 जीवनाच्या रगाड्यातून-

महाराजानी मिळवले देवत्व

 

एकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, फुले, उदबत्ती, निरंजनचा दिवा तेवत ठेवलेला होता. त्या महाराजाविषयी चौकशी करता ते शेजारच्याच गावचे एक ग्रहस्थ असल्याचे कळले. सामान्य जनाप्रमाणे त्यांचे व्यवहार चालू असतात. एका बँकेमध्ये नोकरी करुन उदार्निवाह चालवितात हे कळले. परंतु अध्यात्मिक प्रांतात, ईश्वरी ज्ञानाबद्दल जाणकार होते. वाचन, अभ्यास, व अनुभव ह्यातून त्यानी ज्ञानसंपदा केलेली होती. ईश्वरी श्रद्धा, संकल्पना, ज्ञान आणि वाणी कौश्यल्य ह्याचा  अप्रतीम संगम प्राप्त ती व्यक्ती होती. निसर्गतः ह्या व्यक्तीचा समोरच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांवर एकदम परिणाम होणारच. व्यक्तीचे ज्ञानच फक्त प्रभावित करणारे असते. त्या ज्ञानी व्यक्ती बद्दल आदर वाटू लागतो. त्याचे प्रत्येक शब्द आपणास पटू लागतात. प्रत्येकजण अशा व्यक्तीचे मोजमाप आपल्या स्वतःच्या ज्ञान साधनेतून करतो. त्याला संपर्कात ठेवतो. आदर्श मानतो. मोजमापाचे कोणतेही परिमाण नसते. फक्त वाटले, पटले, भावले, ह्या शब्दानी त्यावर मुलायमा लावला जातो. त्याचे तुम्ही वर्णन करु बघता. त्याला चांगल्या, उत्कृष्ट स्थानी मानता. देवत्वाची कल्पना ही अशाच चक्रातून सुरु होते. दुसरा ऐकून तोही प्रभावित होतो. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्या तथाकथीत थोर व्यक्तीला कृपावंत, दयावंत, सुखदाता, दुःख हर्ता इत्यादी विषेशने लाऊन, त्याच्या बद्दल वाटणारे प्रेम आदर्श व्यक्त करताना आपलाही अहं जागृत केला जातो. मला कोणीतरी देवतुल्य व्यक्ती सापडला, हा भाव निर्माण केला जातो. तसे जीवन हे सुख दुःख यांच्या परिणामांचेच चक्र असते. मात्र व्यक्ती नेमके सुखदायी घटना टिपून त्या देवत्व दिलेल्या व्यक्तीवर लादतात. त्यांच्यामुळे हे सारे मिळाले, प्राप्त होऊ शकले ही अशांची समज. बस ह्याच आहिक मिळकतीची यादी सतत सर्वासमोर ठेऊन, वाचून त्या व्यक्तीला दिले गेलेले देवत्व द्दढ करण्याचा प्रयत्न होतो. एकापासून दुसरा, नंतर तिसरा, मग चौथा —  सर्व त्या मार्गानी धावण्याचा प्रयत्न करतात. येथे प्रमुख ध्येय बनते ते सुख मिळवणे वा दुःख कमी करणे. आदर भावना, प्रेम, हे तर देवत्वासाठीचे रंग आहेत. सारा व्यवहार हा फक्त अशाच मुखवट्याने झाकलेला असतो.

प्रत्येक सजीवाला भावना दिलेल्या आहेत. हा एक सिद्धांत आहे. तो त्याचा जीवन जगण्याचा व आशेचा एक मार्ग असतो. भावनाप्रधानता हा नैसर्गिक गुणधर्म असतो. मानवाला मात्र ‘विचार- विवेक ‘ ह्या संकल्पनेचे विशेष वरदान मिळाले आहे. त्याच्याच जोरावर जीवनांत तो प्रगती करतो, जीवनाच्या गरजांचा मागोवा घेत ते सुसाह्य करतो. मात्र अनेक प्रसंगी भावना ह्या विचारावर मात करतात. त्या प्रमाणे तो वागण्याची दिशा अखतो. विचारच सांगतात की परिस्थिती काय आहे. वातावरण कोणते आहे. जगण्याचे सारासार मार्ग कोणते. पायंडा कोणता. इत्यादी. खरे जगणे व सुसाह्य जगणे, सत्याचा  मागोवा तर्क बुद्धीने घेणे, याचे मार्ग दर्शन फक्त सुविचारच करु शकतात. व्यक्तीचे मुळ गुणधर्म असतात स्वार्थ, अहंकार, वर्चस्व, राग, लोभ, मोह. आणि ह्याच्या गुंत्यातच राहण्यांत ती समाधान मानते.

निसर्ग महान असतो. जीवनासाठी उर्जा देणारा असतो. गरजांची पूर्तता करणारा असतो. खरे म्हणजे त्यालाच देवत्व ही संकल्पना लादलेली असते. प्रकाश, अग्नी, हवा, पाणी, प्रथ्वी इत्यादी मध्येच ईश्वराच स्वरुप असते. प्रथमदर्शनी अभ्यासकांनी,

२        विद्वानानी, ऋषी मुनीनी हे मान्य केले. निर्गुण निराकार सर्व व्यापी अणूरेणूस्थित इत्यादी. माणूस एक बुद्धीवान प्राणी. त्याच्या भावना उसळू लागल्या. मन सैरावैरा धाऊ लागले. ईश्वराला जाणण्यात भावनानी अनेक अडचणी निर्माण करण्यास सुरवात केली. ईश्वराच्या संकल्पनेला सगुण रुप दिले गेले. ‘विविधता ‘ हा मानवी स्वभाव गुणधर्म आहे. तो वरदान तसाच शाप देखील ठरत आहे. एकसंघपणा, एकवाच्यता ह्यामुळे संपूर्ण नष्ट झाली. ज्याला जसा विचार सुचला, जशी भावना आली, त्याप्रमाणे तो त्याने व्यक्त केला. इथेच न थांबता, आपलेच विचार कसे योग्य व परिणामकारक आहेत, ह्यावर भाष्य सुरु झाले. जो जेवढा प्रभावी, पटवून देणारा  , अभ्यासक, वाक् चतूर होता, इतरांच्या गळी उतरविण्यास सक्षम ठरला. झाले निरनीराळे संघ, समाज, कुटूंबे त्याच्या विचारावर मोहून गेली. अनेक मार्ग, विचारसरणी, प्रथा, बनू लागल्या. प्रमुख विचार धारा एकच होती. मात्र वेगवेगळ्या दिशा, मार्ग विचारसरणी ह्यानी अनेक तुकडे तुकडे बनत गेले. फारच थोड्याना हे कळले. परंतु अनेकजण फक्त नक्कल करण्यांत समाधानी होऊ लागले. एक इसापनिती मधली गोष्ट आठवली. झाडाचे पान पडले. ससा भितराच तो. घाबरला. त्याला वाटले आकाश कोसळत आहे. तो धावत सुटला. ओरडत सुटला— ”पळा पळा आकाश कोसळत आहे.”—-   त्याचे ओरडत धावणे बघून, रस्त्यामधील भेटणारे इतर प्राणी ही त्याच्या बरोबर धूम ठोकून पळू लागले.—- कसलीही खातरजमा न करता.  फक्त जे दिसते ते सत्य समजून.

मानवी जीवनातही असेच चित्र दिसून येते. बुद्धीमत्तेचे वरदान असून देखील. कुणीही सारासार विचार, विवेकाला चालना देताना दिसत नाही. फक्त जे दिसते, एकू येते, कुणीतरी सांगते, कांही तरी वाचले जाते, बस माणसे ह्यातच वाहुन जातात. जीवन प्रवाहांत प्रवाह नेईल तस वाहून जायच नसत. पोहून मार्ग आक्रमण करावयाचा असतो. इतरांचे अनुभव मार्ग दर्शनासाठी ठीक. परंतु त्यातील सत्यता व तारतम्य ह्यावर चिंतन असावे. स्व अनुभव व सदसदविवेबुद्धी ह्यावर जीवन प्रवाह करायचा असतो. आज काल कोणत्याही संकल्पनेचे त्वरीत व अनेक शिष्यगण तयार होतात. कुणीही सखोल अभ्यास, ज्ञान, माहीती याचा विचार करीत नसतो. फक्त तो करतो. मला पटले. आम्ही असे वर्षानुवर्षे करीत आलो आहे. पुर्वजानी केले. आता मी करीत आहे. कुणीही रचमात्मक अभ्यास करीत नाही. त्याला आवाहन देऊन त्याची सत्यता पडताळून बघत नाही. मागुन आले. पुढे चालू. शेवटी शेवटी तर संपूर्ण सत्य, तत्वज्ञान, बदलून जाते. व राहतात त्या रुढी, फक्त गैरसमज, अज्ञानाच्या भिंतीच्या चौकटीमध्ये बंदीस्त. मुळ गाभ्याकडे कुणीच लक्ष देत नाही.

भावना आली, पटले, व अनुकरण केले. एकनाथरावानी ज्या व्यक्तीचा फोटो  घरांत लाऊन त्याला सर्व भावनिक देवत्वाचे गुणधर्म अर्पण केले. देव संकल्पनेपेक्षाही जास्त प्राधान्य दिले तो अशातलाच भानिक श्रद्धेचा प्रकार झाला होता. ती व्यक्ती कदाचित् थोर असेलही. त्याला विरोध नाही. मात्र एकनाथरावांच्या वैचारीक ठेवणाची खंत वाटते. आगदी सहजपणे त्यानी त्यांचे पारंपारीक व घराण्याचे रुढी संस्कारीत देव संकल्पना मोडीत काढल्या. आपल्या उत्पन्न झालेल्या भावनाना प्राधान्य देत एक वेगळेच ईश्वरत्व निर्माण केले. अर्थात मान्य आहे तत्वज्ञान  “जसा भाव तेथे व तसा देव” परंतु असे प्रकार फक्त भावना व ईश्वर भक्ती ह्याच्यातच रहात नाही. तर त्याला व्यवहारीक, मानसिक रंग चढतो. त्याना काय भावते,  आवडते, हे मानवी विचार तुमच्या ईश्वरी भावने भोवती चक्रा मारु लागतात. व आपण त्याने प्रभावित होतो. व तसाच मार्ग निवडतो. व आपले स्वताःचे अध्यात्म निर्माण ३        करतो. ह्यात फक्त उद्देश, ध्येय नसते. असतो, मला, माझा, माझ्यासाठी,अर्थात अहंला शांत करणे. खऱ्या देवत्वाच्या कल्पनेपासून खूप दूर.  मानवी अहंकारी स्वार्थी जगांत.

एकनाथरावांच्या कल्पना रम्यतेत होता,  फक्त जीवन व्यवहार. जीवनाच्या सुख दुखाःचे धागे, झगडा, यश अपयशाच आलेख. आणि हे सारे घडत असते कुणाच्या तरी इच्छेनुसार, शक्तीनुसार, योजने नुसार. त्यांच्या लेखी मानवी प्रयत्नाना खुपच कमी मर्यादा असतात. सारे होत असते ते फक्त ईश्वरी  इच्छेनुसार. त्यांचे ते आदरणीय महाराज हेच ईश्वराचे प्रतिक आहेत. त्यांच्याच दयेवर सारे व्यवहार, दैनंदीनी चाततात. महाराजाना समर्पण भाव, व प्रेम, सतत वाहणे, व्यक्त करणे हेच ते आपल्या जीवनाचे ध्येय समजतात. एकनाथराव आपल्या वैचारीक व भावनिक गुंत्यात सतत राहू इच्छीत होते. हीच त्यांची श्रद्धा व ते द्रष्य स्वरुपांत देऊ करण्याचे आश्वासन देणारे त्यांचे देव अर्थात महाराज.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२०नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाला देवकीने नंदाघरी पाठविलं

ईश्वरी अवताराची चाहूल लागूनही मातृ ह्रदय हळहळलं

समज

जीवनाच्या रगाड्यातून-

समज

आमच्या शेजारीचे दोन तरुण मित्र, भास्कर व अविनाष एका खोलीत रहात होते. सारखी विचारसरणी व स्वभाव. धर्मा बद्दल प्रचंड जागरुकता बाळगत होते. आपलाच धर्म महान व श्रेष्ठ ही संकल्पना मनांत द्रढ झालेली जाणवत होती. तसा त्यांचा मित्र परिवार मोठा असल्याचे दिसून येत होते. कोणीही धर्माबद्दल वेडा वाकडा शब्द उच्चारला तर ते मिळून त्याच्यावर हल्ला करीत. धर्म रक्षण व देवाची सेवा हे जणू त्यांचे ब्रिद होते. सारे ज्ञान फक्त कुणाकडून ऐकलेले, वा साधारण पुस्तके वाचलेले. अनुभव संपन्नता त्यांत मुळीच नव्हती. कोणतेही धर्माचे ग्रंथ वा अध्यात्म  यांचा अभ्यास नव्हता.

एकदा कुणीतरी चित्रकाराने  देवीचे चित्र रंगवले. त्यांत त्याने देवीला माकडाच्या पाठीवर बसून जात असल्याचे दर्शविले. अर्थांत हे अत्यंत अयोग्य व विक्षीप्त होते. झाले ते चित्र बघतांच या दोन्ही मित्रांचे टाळके फिरले. त्यानी मित्रांचे टोळके जमवून ते भितीचित्र काढून फाडून टाकले. शिवाय त्या चित्रकाराचा मागवा घेत त्याची पिटायी पण केली. पोलिसांना त्यात लक्ष घालावे लागले.

आम्ही सोसायटीची मंडळी एकत्र जमून जवळच असलेल्या एक तिर्थक्षेत्री सहलीला गेलो होतो. आमच्या सोबत भास्कर व अविनाष दोघेही होते. सहल छान झाली. एक गोष्ट मात्र खूपच खटकली. तिर्थक्षेत्राजवळ एक मोठे कुंड होते. जे पाण्याने भरलेले होते. परंतु अनेक वर्षे त्या पाण्याला उपसाच नसल्यामुळे पाणि स्थिर झालेले होते. परिणामी अत्यंत दुर्गंदीयुक्त वाईट स्थितीत होते. सर्वानी फक्त ते पायावर घेतले. दोन थेंबे डोक्यावर शिंपडले. मात्र कुणीही ते तिर्थ म्हणून समजून प्राशन केल नाही. भास्कर व अविनाष यानी तर तिथे कुंडाच्या पाण्याला स्पर्श देखील केला नाही.

कोणत्या धार्मिक भानाना ते प्रभावित करु बघत होते. कोणत्या धार्मिक तत्वाना ते साथ देत होते. धार्मिक संकल्पने मधील कोणत्या अनिष्ठ गोष्टीवर आपली उर्जाशक्ती वापरुन त्यांत सुधारणा करुं इच्छीत होते. सत्य आणि मनातील विचार यांची सांगड कोणती, ह्याचा गंभीरपणे विचीरच केलेला जाणवत नाही. फक्त मलाच वाटते ते सत्य असावे. ह्या वैचारीक व भावनेंत गुंतलेली ही मंडळी. आणि अशीच विचारसरणी बाळगणारी व्यक्ती फक्त भावनिक लाटेत वाहात जातात.

वाईट व विक्षीप्त चित्रकला ही केंव्हाही निषीद्ध. ह्यास सर्वांचीच सहमती असेल. त्याला समजदारीने, विचारानीच विरोध केला पाहीजे. त्याच प्रमाणे जर ते तिर्थकुंड समजले गेले असेल तर त्याची स्वच्छता, उपसा, सभोवताल, ह्यावर खुप विचार व्हावा. कांही माणसे कुणीतरी धर्माची, देवाची थट्टा केली हा समज करुन घेऊन आग्रेसर होतात. तोडमोड करुन सामाजीक स्वास्थ बिघडवतात. जसे आमच्यातले भास्कर वा अविनाश. अशा ठिकाणी अशानी उर्जा खर्च करण्याची खरी गरज वाटते. कोणतेही धर्म स्थळ असो तेथे स्वच्छता, टापटीपपणा नैसर्गिक आकर्शकता, प्रसन्न वातावरण याचा खूप अभाव जाणवतो. अत्यंत दुर्भाग्य व निराशजनक बाब म्हणजे त्यांच्या व्यवस्थापनेकडे लक्ष्य देण्यास कुणासच फुरसत नसते. ह्याचे कारण देवत्वाविषयी गैरसमज व अज्ञान.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@mail.com

विवीध-अंगी     ***१९परक्यासमोर येताना निटनेटकेपणाची जाण तीव्रतेने असते

मनाचाही निर्मळपणा जर जपला तर ती आत्मोन्नती ठरते

 

* पूर्णेच्या परिसरांत !

जीवनाच्या रगाड्यातून-

*   पूर्णेच्या परिसरांत !

जेंव्हा ठरले गावी जाणे       हूर हूर होती  मनी

बराच काळ गेला होता      आयुष्यातील निघुनी

काय तेथे असेल आता          सारे गेले बदलूनी

काळाच्या प्रवाहामध्ये        राहिलं कसे टिकूनी

चकित झालो बघुनी         सारे जेथल्या तेथे

उणीवता न जाणली      क्षणभर देखील मानते

बालपणातील सवंगडी     जमली अवती भवती

गतकाळातील आनंदी क्षण    पुनरपि उजळती

आंबे चिंचा पाडीत होतो        झाडावरती चढुनी

आज मिळाला तोच आनंद    झाडा खालती बसूनी

मळ्यामधली मजा लुटली      नाचूनी गाऊनी

विहिरीमधल्या पाण्यात      मनसोक्त ते डुबूनी

ऐकल्या होत्या कथा परींच्या     तन्मयतेने बसूनी

आज सांगे त्याच कथा मी     काका मुलांचे बनुनी

वाडा सांगे इतिहास सारा    पूर्वज जगले कसे

भव्य खिंडारी उमटले होते    कर्तृत्वाचे ठसे

बापू, आबा, मामा, काका,     मामी वाहिनी जमती

कमी न पडली तसूभरही       प्रेमामधली नाती

मीही बदललो, गांवहीं बदलले     काळाच्या ओघांत

आनंद मात्र तो तसाच होता     पूर्णेच्या परिसरांत

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-    bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***१८

रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते श्रेष्ठ असू शकते

मुलीच्या आग्रही वागण्याने व सुनेच्या मृदु सिवभावाने ह्याची जाण येते

 

पक्षाना मेजवानी

जीवनाच्या रगाड्यातून-

पक्षाना मेजवानी

मला एक भावनिक वैचारीक सवय होती. रोज सकाळी अंगणांत वाटीभर धान्य प्लास्टीकच्या    चटईवर टाकींत असे. जमा होणाऱ्या पक्षांची ते टीपताना गम्मत बघणे व आनंद घेणे हा हेतू. कबुतर, चिमण्या तेथे नियमीत येत असत. धान्य त्या चटईवर पडतांच, क्षणाचा विलंब न करता ते येत असे. मात्र त्यांच्या येण्याचा व दाणे टीपण्याच्या सवईमध्ये एक नैसर्गिक पद्धत निश्चीतपणे दिसून येई. पक्षी प्रथम झाडावर, पत्र्यावर, खांबावर, दोरीवर इत्यादी ठिकाणी बसत. सर्व दिशेने चौफेर द्रष्टीने बघत. सभोवतालच्या परिस्थीतीचा मागोवा घेत असत. कोठे आपला शत्रु अर्थात, मांजर, कुत्रा वा कुणा नाहीत ना ? याची चाहूल घेत असत. संपुर्ण खात्री वाटल्यावरच चटईवर येऊन सतर्कतेचे भान ठेवीत दाने टिपीत. जगण्यातील पावलोपवलीचे धोके जाणत कसे सतर्कतेने जगावे हा नैसर्गिक संदेश ते देत होते. शिवाय एक दोन दाणे टिपले की परत सुरक्षीत जागी जाऊन बसणे, पुन्हा अवलोकन करणे, व परत दाणे टिपण्यासाठीच प्रयत्न. हे चक्र असे. त्यांच्या हलचाली  खुप शिस्तभद्ध व मनाला मोहून टाकणाऱ्या वाटे. भूतदयेचा ओलावा त्यांत समाधान देई.

मी एका मोठ्या पत्र्याच्या डब्यांत पक्षासाठीचे धान्य जमा ठेवित असे. व दररोज एक वाटीभरुन टाकी. कांही कारणास्तव मी दोन आठवडे बाहेर गांवी गेलो होतो. पक्षांना धान्य टाकणे ह्यांत खंड पडला. गावाहून आलो. सकाळी डब्बा उघडला तर दिसले की त्यांत खूप किडे, आळ्या, जळमटे झालेली आहेत. मी बेचैन झालो. लगेच सुप आणले व अंगणातच बसुन सर्व धान्य साफ केले. सर्व किडे आळ्या झटकून कचरा कोपऱ्यांत फेकून दिला. धान्य स्वच्छ केले. व नेहमी प्रमाणे एक वाटी भरुन ते चटईवर पसरुन टाकले. खुर्चीवर बसुन पक्षांची वाट बघत बसलो. थोड्याच वेळांत कांही चिमण्या तेथे आल्या. मात्र मला एकदम आश्चर्य वाटले. त्या चिमण्या तेथील धान्य टिपण्यापूर्वी, मी शेजीरीच फेकून दिलेल्या कचऱ्याकडे झेपावल्या. त्यातील किडे आळ्या याना  वेचित त्याना खाण्याचा अस्वाद घेऊ लागल्या. मी त्या द्रष्यानी खुप प्रभावित झालो. त्या रोजच्या सवईप्रमाणेच खाण्याचा अर्थात टिपण्याचा आनंद घेत होत्या. मात्र ज्या प्रमाणे आपणास जेवणांत एखादा आवडीचा पदार्थ मिळाला तर त्यावर कसे तुटून पडतो, त्याप्रमाणे त्यानाही त्यांच्या आवडीनुसार व प्रकृती, निसर्गानुसार आवडते खाद्य प्राप्त झाले होते. निसर्गाची किमया आणि माझा दैनंदीन हिशोब ह्यातील तफावत माझ्या लक्षांत आली. अर्थात जे मला सहज व शक्य असेल तेच मी पक्षांना देणार. इतर त्यांच्या अवडीचे खाद्य, “वेगळा आहार एक ट्रीट” त्यानाच शोधू देत. हा देखील एक निसर्ग म्हणून मी त्याच्याकडे बघीतले.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-    bknagapurkar@gmail.com 

 

विवीध-अंगी     ***१७मला माझ्या विक्षिप्त वागण्याची क्षमा कर

तुम्ही पायी चालत असाल,  मी मात्र तुमच्या खांद्यावर

 

होर्डींग आणि शुभेच्छा

जीवनाच्या रगाड्यातून-

होर्डींग आणि शुभेच्छा

संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या चौकोनातील एका बाकावर बसून वर्दळ  व सभोवताल बघत होतो. समोर एका स्थानिक व्यक्तीचे प्रचंड मोठे होर्डींग ( Hording- Cut out) लावलेले होते. वाढदिवस आणि जनतेकडून शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा होती. शेजारीच कांही सामाजिक, राजकीय व्यक्तींची पण चित्रे काढलेली होती. जाणारा शेजार बाकड्यावर येऊन बसायचा, थोडी विश्रांति घेऊन निघून जायचा. मी प्रत्येकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसे मला त्या होर्डीगवरल्या व्यक्तीशी कांही घेणे देणे नव्हते. त्याना मी बघीतले देखील नव्हते. फक्त एका त्रयस्थाच्या भूमिकेत. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला त्या होर्डींग विषयी विचारले. मी जवळ जवळ १०० पेक्षा जास्त व्यक्तींशी संपर्क साधला. सर्वांची मते जी व्यक्त झाली ती अशी.-

काय प्रचंड होर्डींग आहे, काय गरज होती, कशाला रस्ते खराब करतात, कशाला स्वतःचा उदो उदो करतात, हरामी ही माणसे, जनतेला लुटणारी, पैसा लुबाडणारी, सामाजिक कार्य करतात सांगुन पैसे उकळणारी, गुंड प्रवृतीची, अहंकारी, जातपात याची पेरणी करणारी, समाजातील घाण, लुटमार करणारी टोळी, — इत्यदी अनेक दुषणे ऐकली.

मी चक्राऊन गेलो. मला एकही व्यक्ती भेटला नाही, ज्याने त्या तथाकथीत होर्डींगवरल्या व्यक्तीचे अभिनंदन केले. वा शुभेच्छा दिल्या. सर्वानी त्या होर्डींग बद्दल राग, तिरस्कार, घृणा, द्वेश व्यक्त केला. मी बेचैन झालो. लोकांच्या ह्या विचार भावने मुळे नव्हे. तर त्या होर्डींगवरल्या व्यक्तीने आपली छबी पोस्टरवर लाऊन शुभेच्छेची अपेक्षा केली होती. त्याच्या आत्मिक स्थरावर शापांचा, दुर्विचारांचा, तळतळाटाचा प्रचंड आघात होत असलेला जाणवला. आणि ती व्यक्ती मात्र ह्या अघाताविषयी अंधारात होती. अज्ञानात होती. त्याचे लक्ष फक्त वर वर व समोर व्यक्त होणाऱ्या त्याच्या स्तुतीपर शब्दावरच गुंतले होते. सारे खोटे मुखवटे होते. अघात मात्र तळतळाटाचा, व दैविक निर्णयाचा होता. कालानुसार हा भोगावाच लागेल नव्हे कां ?

अध्यात्म्याचे तत्वज्ञान माणसाला आनंद समाधान व शांतता देवू करण्यास प्रयत्नशील असतात. विचार व भावना ह्या मानवाच्या मन बुद्धीचा प्रमुख स्रोत असतो. त्या सतत उत्पन्न होतात. त्यांत असते देहातील आत्म्यामधून उत्पन्न झालेली उर्जा शक्ती. ती सकारात्मक वा नकारात्मक पद्धतीप्रमाणे वाहू लागते. परिणाम चांगला वा वाईट होऊ शकतो. ह्या विचार भावनिक स्रोत लहरी, Waves,  रुपाने झेपावतात. चिंतन केलेल्या लक्ष्यावर आदळतात. आघात करतात. जेंव्हा यांचे सांघिक एकत्रीत परिणाम होतात,

ती याच समीकरणामधून. येथे लक्ष्य, वेध, अघात, परिणाम, भोग इत्यादी अव्यक्त, अद्रष्य स्वरुप रचनेंत असतात. ह्यातून विचार प्रवाह उत्पन्न होतात. आपले कार्य, कर्म, धडपड, सभोवताल, उत्कर्श, व्ययक्तीक सामाजिक स्थान समाजा समोर व्यक्तीरुपाने प्रदर्शित करुन अनेक जण जन समुदायाकडून शुभेच्छा, आशिर्वाद, सहकार्य, अपेक्षीत असतात. कदाचित् जे  Materialistic (पदार्थमय) असेल ते त्याना मिळतही असेल. परंतु जे दैविक, अध्यात्मिक, लहरी रुपाने त्यांना लक्ष्य केले जात असेल, त्याचा देखील परिणाम होणारच. ते अव्यक्त, अद्दष्य, असल्यामुळे मनाच्या शांतता वा अशांतता ह्यावर प्रभावित होणारच.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     *** १६त्याच्या स्वभावांत मी खुप बदल आणले.

माझंच वागणं बदलून मी हे साध्य केले

 

“ध्वनी ” एक ईश्वरी उर्जा

जीवनाच्या रगाड्यातून-

ध्वनी   एक ईश्वरी उर्जा

सुर्यास्ताची वेळ होती. समोरचे नैसर्गिक द्दष्य टिपत बाकावर नामस्मरण घेत बसलो होतो. हाती मन्यांची माळा होती. सैरावैरा धावणारे मन केंव्हा सुर्यास्ताकडे, वा माळेकडे वा सभोवतालच्या परिसराकडे जात होते. थोड्याश्या अंतरावर एक तरुण हाती गितार घेऊन एका जुण्या गाण्याची धुंद वाजवीत होता. आम्ही दोघे समान परीस्थितीचे सहप्रवासी होतो. माझे नामस्मरण व ईश्वरी आराधनेत लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न. त्याचा सुरतालांत गाणे बद्ध करण्याचा, संगीताच्या आनंदात रममान होण्याचा प्रयत्न. माझा प्रयत्न जाणिवेतून  होता. त्याचा कदाचित् अजाणतेने. मार्ग मात्र जात होते ते त्या अनंतातील कोणत्यातरी दालनांत.

ध्वनी   एक ईश्वरी उर्जा  ह्यामध्ये.

नामस्मरणाची प्रक्रीय व उद्देश कोणता. परमेश्वर संकल्पनेशी एक रुप होणे. शब्दांत दडला आहे स्वरुप आणि ध्वनी. स्वरुप असेल विचारांचे – कल्पनांचे आकार. जे खोटा आभास निर्माण करतील. उलट ध्वनीत एकरुप होण्याचा अनुभव आनंद व ईश्वरी असेल.

नामस्मरणाच महत्व चांगलच लक्षांत आले होते. प्रथम त्या परमेश्वरला जाणणे, त्याच्यामध्ये एकरुप होण्याचा प्रयत्न हेच जीवनाचे अंतीम ध्येय असावे हे समजलो. कारण तसे आपण सर्व  शुन्यातून आलो व शून्यातच एकाग्र होणार.  संसार, ग्रहस्थाश्रम इत्यादी सारे मार्ग फक्त देहाच्या वाढीसाठी व अंतीम ध्येयाकडे नेण्याकरीता.

नामस्मरण कुणाचे. तो परमेश्वर तर सर्व व्यापी, सर्व श्रेष्ठ, निर्गुण निराकार. हे जगाने मान्य केले. त्याचे नामकरण हे केवळ मन केंद्रीत करण्यासाठी. मात्र तो एक मार्ग समजुन. ध्येय व साधना यांची स्पष्ट जाणीव सतत असावी. नसता साधनेलाच ध्येयाचे रुप समजून अनेक फक्त मार्गातच रेंगाळतात. इष्ठ देवतेचे नाम व तेही लयबद्धते मध्ये शांत मनाने घेत त्या परमेश्वराची आराधना समाधान देते. तरी खरी शांतता अद्यापी बरीच दूर राहते.

कुठे व कसा आहे तो परमेश्वर. सत् चित् व आनंद  किंवा सत्यम् शिवम् सुंदरम्  ह्यातच त्या परमेश्वराचे योग्य व निश्चीत असे वर्णन ऋषीमुनीनी केलेले आहे. फक्त  ” आनंद    हाच ईश्वर असतो. मात्र त्यामध्ये विचार वा भावना ह्यांचा किंचीतसा देखील स्पर्ष नसावा. केवळ आनंद आनंद आणि आनंद.  आनंद व्यक्त होत नसतो. व्यक्त आनंद खरा आनंद रहात नाही. समाधान व्यक्त होते. शांतताही व्यक्त वा शरीर मनावर प्रकट होते. जे जे व्यक्त केले जाते, कुठेतरी कृत्रिमता त्यावर अच्छादलेली असते. फक्त आनंद ह्रदयामधून शरीरभर पसरुन जातो. विचार शुन्य, भावना शुन्य तरीही एका वेगळ्याच अनुभवाची प्रचीती. क्षणिक तरीही अनंत काळ व्यतीत झाल्याप्रमाणे.

मानव हा निसर्गातील एक घटक. मात्र त्यानेच स्वतः आपण सर्व श्रेष्ठ नैसर्गिक कलाकृती असल्याचे चित्र जगासमोर रंगविलेले आहे. त्याला प्राप्त बुद्धीच्या देणगीच्या जोरावर तो हे सारे रंगवितो. ईश्वराने त्याच्या अगणित साधन सामुग्रीमधून फक्त पांचच तत्वांची जाण त्याला दिलेली आहे. आणि ती तत्वे जाणण्यासाठी, समजण्यासाठी पांचेंद्रिये देऊ केली आहेत. फक्त पांच इंद्रीयांच्या साधनांचा हा खेळ. त्याचा आधार घेत मानव प्रगतीच्या अर्थात उत्कर्शाच्या वाटा शोधीत चालला आहे.

२       एक समज मानवाला आलेली आहे. आणि ती म्हणजे ही जी पांच तत्वे त्याला प्राप्त झाली आहेत. त्याच्याच आधाराने त्याला हा निसर्ग वा ईश्वर याला जाणावयाचे आहे. साधन limited परंतु साध्य मात्र अनंत. म्हणूनच मानव सत्यापेक्षा कल्पना जगतात जास्त भराऱ्या घेतो. विशेषकरुन त्याच्या परमेश्वराबद्दलचे विचार.

ध्वनी ही एक ईश्वर निर्मीत उर्जा –शक्तीचे रुप.  ध्वनी हे ईश्वरी अस्तित्वाचे रुप. अक्षर, शब्द, ओम् कार ( ॐ ), लय, लहरी, नाद, इत्यादी, वर्णनामधून व्यक्त होतो, तो ध्वनी. ह्या ध्वनीला सर्व अंगानी जाणणे हेच त्या परमेश्वराला जाणण्याचे एक साधन.  ध्वनीला  निरनीराळ्या रुपांत प्रकट करण्याचा मानवाने प्रयत्न केला. ध्वनीशी एकरुप होत, आनंदात विलीन होणे, हेच तर ईश्वर सान्निध्य होय.

नामस्मरण हा एक प्रकार. नामस्मरणांत आम्ही कोणत्यातरी दिव्य शक्तीची आठवण काढीत, त्याच चक्रांत फिरत राहतो. मुळ हेतू विसरतो. तो असतो त्या ध्वनीचा शोध. नामस्मरण करताना शुद्ध हरपली पाहीजे, स्वतःला विसरले पाहीजे. नामस्मरण गळून पडले पाहीजे. कोणत्यातरी अज्ञात तंद्रीत गेले पाहीजे. भान हरपले पाहीजे. ती स्थिती क्षणीकच असेल. परंतु त्या हरपलेल्या भानाचे वेळेत मोजमाप होऊ शकणार नाही. नामस्मरणाचा तो अत्युच्च क्षण असेल.  ” आनंद ”   ज्याच्या अवती भवती असेल शांतता.

त्याच प्रमाणे ध्वनी लहरी, धुंदी आणणाऱ्या सभोवताल-जगाला विसरावयास लावणाऱ्या- दोघांचा अर्थ एकच नव्हे काय ? अस्तित्व विसरुन एकरुप होण्याचे साध्य.

डॉ.भगवान नागापूरकर                                                                                                                                                          ९००४०७९८५०                                                                                                                                                e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     *** १५लग्नकार्यांत देण्या घेण्यावरुन रागवायच नसतं

शारिरीक, मानसिक, आर्थिक तणावाखाली

दुसरा किती दबलेला आहे ते समजायचं असत