Monthly Archives: सप्टेंबर 2015

गांवमामा

गांवमामा

हा  एक सत्य घटनेवर आधारित प्रसंग

गोविंदमामा हे खऱ्या अर्थाने  गांवमामा   झालेले होते. शिकलेले आणि तडफदार व्यक्तिमत्व. अतिशय प्रेमळ स्वभाव आणि त्यागवृत्ती. कुणीही समोरच्या व्यक्तीबद्दल आदरभाव,  मदत  करण्याची आंतरिक  इच्छा आणि सदैव हासत आनंदी स्वभाव. सर्वच सदगुणांचे  मिश्रण क्वचितच एका व्यक्तीच्या अंगी सापडणे सहसा कठीण. म्हणूनच त्यांना  आपल्या वागनुकीने  सर्व समाज अर्थात  ते रहात असलेले खेडेगांव गोविंदमामा ह्या टोपण नावानी संबोधित असे. स्वतःचे घर व कांही एकर जमीन होती. मुलगा व पत्नी जानकीबाई एवढाच  परिवार. लहान कुटुंब व सुखी कुटुंब ह्या व्याख्येमध्ये सीमित.शेती हा प्रमुख व्यवसाय होता. गांवातील लहान सहान कामे करून पैसे मिळत ते मिळवीत.  मुलगा मोठा झाला. शहारांत जाऊन वेगळा व्यवसाय करू लागला. शेती करण्यात त्याला न रुची ना सवड. लग्न झाल   स्वत: चा वेगळाच संसार  शहरामध्ये थाटला. आधुनिकतेमध्ये  जाण्यात आनंद घेत असे  ज्या गोष्टी  खेड्यात त्याला मिळत नव्हत्या  त्या  सर्व शहरी जीवनात मुबलक मिळू लागल्या.  त्याला दोन मुले झाली.  गोविंद मामा व जानकीबाई  दोघेच खेड्यात रहात होते.  सर्व गावाला भूषण  असलेले व सतत आनंद देणारे गोविंदमामा गांव मंडळीना उत्तम संस्कार  देण्यात यशस्वी झाले. परंतु आपल्या स्वता:च्या मुलाला आपुलकी व सह जीवनाचा पाठ शिकऊ शकले नाही. तो अलिप्त रहाण्यात  समाधान  मानीत  होता.

गोविंद मामांचे अकाली निधन झाले. त्यांच्या पत्नीवर जणू आकाश कोसळले. परंतु काय करणार. मुलाचा आधार  असून तिला मिळाला नाही. अच्यानक एक दिवशी  त्यांना  शासकीय पत्रक  मीळाले.  त्यांच्या खेडे गांवाजवळून  एक पाण्याची  मोठी धरण योजना  शासनाने आखली होती. गोविंद मामाची शेती त्या योजना अंतर्गत शासकीय कार्यसाठी  जमा केली जाणार असल्यची नोटीस होती. जानकीबाई साठी ते संकटच  होते. गोविंदमामानी जे प्रेम गांवात पेरले होते, त्याला चांगलीच फळे येणार होती. सर्व गांवकरी  एकत्र जमा झाले. त्यांना धरण  योजने बद्दल सहानुभूती होती. ती योजना राबवावी परंतु त्याच वेळी जानकीबाईना  त्यांच्या  शेतीची योग्य  व चांगली  किंमत दिली  जावी हा  त्यांचा  प्रयत्न. होता. सर्वजन एक झाले. प्रकरण थेट  मंत्र्यापर्यंत  मंत्रालयात गाजले. प्रचंड धावपळ व प्रयत्न झाले. जानकी बाईंच्या नावे त्या शेतीच्या मोबदल्यात २६ लाख रुपयाचा धनादेश जरी केला गेला. शेती जी कोणतेही उत्पन्न देत नव्हती, केवळ डोंगराळ  भागाजवळ  असल्यामुळे धारण योजनेत गेली. परंतु एक प्रचंड रक्कम जानकी बाईना देवून गेली. गोविंद मामाचे प्रेम आणि  गांवमामा बनण्याचे योग्य इनाम देऊन गेले. त्यांच्या पश्च्यात  जानकीबाई त्या ठेवीच्या  व्याजावर समाधानी जीवन जगत होत्या.

 

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !

माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा !

रविवारचा दिवस, ठरल्या प्रमाणे सर्वत्र पल्स पोलिओ देण्याचा दिवस होता. दारावर शासनाच्या आरोग्य खात्यातील दोन कर्मचारी, पोलिओ लस देण्यासाठी आले होते. त्यांनी घरांत पांच वर्षापर्यंत कुणी बालके आहेत कां ? म्हणून चौकशी केली. मी लगेच पुढे झालो व माझ्या नातीस बोलावले.  तिने नुकतेच चार वर्षे पूर्ण केले होते. तिला त्यांनी पोलिओचा डोस पाजला. त्यांनी  तिचे नांव लिहून घेतले. पुन्हा त्यांनी विचरण केली की ” घरांत आणखी कुणी लहान मुल  आहे कां? “    आम्हाला न सांगताच , मानसी, माझी नात घरात गेली व लगेच परत आली. ती त्यांना विचारू लागली ” काका  माझ्या सोनुलापण पोलिओचा डोस देणार कां? ” थोडेसे कौतुक परंतु संभ्रमित होऊन ते तिच्या प्रश्नाकडे निरखून बघू लागले. आपल्या हातातील बाहुली उंचावून  दाखवीत ती म्हणाली ” ही माझी सोनू “

आणि सर्वजणच हास्याच्या लाटेत वाहून गेलो. कालचक्राचा वेग बघून  खूपच  आश्चर्य  वाटते. लहान मुलांचे बोल ऐकून  त्यांच्यातील वैचारिक समज ही अनेक वेळा चकित करून टाकते. केंव्हा केंव्हा त्यांत विनोद ही निर्माण होतात. दूर दर्शन आणि त्यावरील जाहिराती मुलांना मुखोतगत होऊ लागल्या

आहेत. त्या सुरांत म्हणताना एक आनंद लुटीत असल्याचे अनेकदा दिसते.  नातीने जी विचारणा केली होती, त्यात सत्य होते, चौकस बुद्धी होती, त्यात सहजता होती. विनोदी  बोलण्याची इच्छा नव्हती, परंतु जे तिने विचारले, त्यात विनोद झाला होता.

जेष्ठाच्या  ह्याच चौकशीला मार्मिकता व गम्मत म्हणून  ठरविले   गेले असते.   कसे कां होईना  ऐकनाऱ्याला ते आनंदच देणार नाही कां?

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

सैतनामधील प्रेमओलावा !

सैतनामधील प्रेमओलावा !

रस्त्याच्याकडेला एक फळविक्याची गाडी,  दर दिवशी असायची. मी खिडकीतून बाहेर बघत होतो. एक टाटासुमो गाडी तेथे आली. त्यातून ८/१० जण उतरले. तरुण धिप्पाड थोडेसे रांगडे दिसत होते. हातात काठ्या व सुरेचाकू  दिसले. एक भयावह दृश्य वाटले. त्या परिसरांत कांही   अघटीत होणार ह्याची चाहूल लागली. अनेक जाणारी येणारी माणसे थांबली आणि मार्ग बदलून जाऊ लागली. मी देखील आंत जाऊन खिड्की बन्द करुन काचेतून वातावरनाचे निरिक्षण करु लगलो. उत्सुकता, भिती आणि   स्वसंरक्षण  ह्याची मनात घालमेल सुरु होती.  शिवाय रोजच्या विविध बातम्यानी,  गुण्डगिरिनी, आतंकवादी  वातावरणानी सर्व काही अनिश्चित होते.

” पडते  घे विनाकारण विरोध करु नकोस , सत्याच्या व तत्वाच्या मागे जाण्याचा मोह टाळ. यात कदाचित बळीपण जावे लगेल. “  हा संदेश व्यक्त होत होता. स्वत:चा बचाव हेच त्या अघटीत परिस्थितीला उत्तर होते.

ते सर्व राकट आडदांड त्या फळगाडी भोवती जमले. त्यांचा आरडा ओरडा विक्षिप्त  चाळे, आक्रमक भूमिका, या वागण्याने परिस्थितीचे गांभीर्य त्या फळवीक्रेत्याने देखिल जाणले. तो चटकन बाजूस सरकला.  खाली मान घालून बसला. भीती व जीव वाचवणे, आणि होणाऱ्या नुकसानीबद्दल डोळे भरून आलेले अश्रू लपविणे, हेच तो करु बघत होता. सर्वांनी त्याची गाडी अक्षरश: लुटली. भराभर फळांच्या टोपल्या आपल्या गाडीत टाकल्या आणि सर्वजण गाडीत बसून  होर्न वाजवीत, सुसाट निघून गेले.  सामसूम झाल्याची चाहूल लागताच मी चटकन पश्यात बुद्धीची सहानुभूती व्यक्त  करण्यासाठी  त्या फळवाल्याकडे धावलो.  तो गाडीजवळ मटकन बसला होता. त्याचे लक्ष त्या सुसाट गेलेल्या गाडीकडे होते. डोळातून अश्रू वहात असलेले  दिसत होते. मी सहानुभूती व्यक्त करीत म्हणालो  ” काय ही सैतानी वृतीची माणसे. जंगली व दादागिरी करणारी. गरिबांना लुटणारी. ह्यांना तर गोळ्याच घालून ठार करावयास हवे.”

” थांबा साहेब! प्रसंगावर  चुकीचे बोलू नका ”  तो फळविक्या बोलू लागला.   देव  माणस होती ती. प्रथम दैत्या प्रमाणे वागली खरी. परंतु त्यांच्या वृतीमध्ये देवत्व दिसून आले.”

मला त्या क्षणी विचित्र वाटणाऱ्या त्याचा शब्दाचा बोध झाला नाही. मी चक्राऊन गेलो. त्यांनी इतका धिंगाणा घातला, लुटालूट केली तरी त्याबद्दल सहानुभूती? त्याने कांहीच उत्तर दिले नाही. फक्त जवळच्या टोपलीकडे बोट दाखवू लागला. माझी दृष्टी तिकडे वळली. त्यात शंभर रुपयांच्या नोटांची गड्डी  पडली होती. ” हे सहा हजार रुपये आहेत साहेब. ही  गड्डी माझ्या हाती देत ते वेगाने निघून गेले.

ही माझ्या रोजच्या मालाच्या धंद्याच्या कमाई पेक्षा दुप्पट रक्कम आहे.

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com

नेत्रहीनता !

नेत्रहीनता !

ठाण्याहून नाशिकला महत्वाच्या कामासाठी चाललो होतो. हायवेवर गाड्यांची प्रचंड प्रमाणात जा ये चालू होती. लवकर पोहचणे जरुरी होते. त्यामुळे गाडी वेगातच चालली होती. अचानक माझी नजर दूर अंतरावरील एका गाव फाट्यावर गेली. एक माणूस हलके हलके मुख्य रस्ता ओलाड्ताना दिसला. तो एकटाच असून, बेफिकीर भासत होता. कोणत्या क्षणी एखादे वाहन जवळ येऊन धडकेल ह्याचा भरवसा नव्हता. विशेष म्हणजे कुणीही व्यक्ती हायवे क्रॉसिंग करताना डावीकडे उजवीकडे बघेल,  स्वत:ला विश्वासात घेईल, व मग रस्ता ओलांडेल. परंतु हा कसलीही तमा न बाळगता शांतपणे इकडे तिकडे नजर न टाकता, रस्ता ओलांडत होता. दररोज  पेपरमध्ये अनेक  अपघतांच्या बातम्या वाचण्यात येतात. अशाच बेफिकीर वृतीमुळे व वाहन चालकाच्या  नजर चुकामुळे त्याक्षणाला काहीही होण्याची शक्यता असते. काळजी अर्थात दोघानीही घ्यावयाची असते.  क्षणार्धात अनेक विचारांचे काहूर मनांत येऊन गेले. मला भासणाऱ्या त्या मूर्ख माणसाला चांगलीच  हडसून खडसून समज द्यावी, झापावे, हा विचार आला. एकदम मी ब्रेक दाबून गाडी रस्त्याच्या कडेला थांबवली. अगदी मुठ वळून त्या माणसाच्या पाठीमागे घावलो.  प्रथम त्याला ग्राम्य भाषेत एक शिवी हासडली. ” ये साले तुमको क्या मरना है हायवेपर. शरम नही आती,  इस बेफिकीर ढंगसे रस्ता क्रॉस करते हो.”  मी त्याचा जवळ  धाऊन गेलो. त्याला एक लाफा देण्याच्याच पोज मध्ये होतो. माझा आवाज एकूण ऐकून तो थांबला. त्याने माझ्या आवाजाच्या दिशेने मान वळविली. मला एकदम धक्का बसला. तो माणूस नेत्रहीन होता. क्षणात माझा राग पूर्ण विरघळून गेला. आपल्याच विक्षिप्त विचारांची लाज वाटू लागली.

प्रत्येकाला आपल्या जीवाची काळजी असतेच. नेत्रहीन  असला, द्रीष्टीहीन असला तरी मनाने केव्हांच जगण्याच्या प्रक्रीयेमध्ये बेफिकीर नसतो. आपण डोळस असूनही आपल्या विचारीनी अंध असतो. ही जाणीव झाली. मी चटकन शंभर रुपयाची एक नोट त्याचा हाती ठेवली.

” हे काय आहे?”  हे तो विचारत असतानाच मी त्याचा द्रीष्टीहीनतेचा  फायदा उठवत हळूच माघारी फिरलो.

डॉ. भगवान नागापूरकर

संपर्क – ९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com