वेळ- ( TIME )

वेळ- ( TIME )

वेळेच्या चक्राचा विचार करता कळते, की वेळ ही तीन भागांत वाटली गेली आहे. भविष्य भूत आणि वर्तमान ह्या संकल्पनात. भविष्य हा येणारा काळ. तो अनिश्चीत असतो. म्हणून असत्यात जमा होतो. भूतकाळ हा गेलेला, आता हाती न लागणारा. म्हणून अनिश्चीत होय. त्यालाही असत्य समजले गेले. वर्तमान काळ फक्त निश्चीत, अस्तित्वाची जाणीव देणारा, म्हणून सत्य समजला जातो.
वर्तमान काळाला वेळेत मोजता येते कां? वर्ष, महीना, आठवडा, दिवस, तास, मिनीटे, सेकंद, वा सुक्ष्म असे मायक्रो सेकंद यांत. नाही. कोणत्याही वेळेच्या परिमाणांत नाही. भविष्य येतो, वर्तमानाच्या सीमारेषा छलांग मारीत भूत काळांत जातो. फक्त वर्तमान काळाला सत्य समजले, परंतु त्याला वेळ नसते. त्य़ाचे म्हणजे वर्तमानाचे अस्तित्व असते. परंतु वेळेच्या बंधनात नाही. ज्याला म्हणतात एक सत्य- वेळ रहीत अस्तित्व. It is called Satya ( सत्य ) , The Timeless Reality. दुसऱ्या शब्दांत That Presence is Satya ( सत्य ) – Darshana ( दर्शन ). वेळेच्या बंधनात नसलेल्या काळाचे अस्तित्व.
जर वर्तमान काळ सत्य असून देखील वेळ रहीत होतो, तर त्याच तत्वाने भविष्य काळ, भूतकाळ आणि वर्तमान काळाचे अस्तित्व वेळेच्या बंधनात रहात नसते. दुसऱ्या शब्दांत अस्तित्वाला वेळेच्या मर्यादा नसतात. अस्तित्व हे वेळ रहीत असते. सदैव असते. काल होते, आज आहे, आणि उद्याही असेल. सदा सर्व वेळी, वेळ बंधन रहीत. वर्तमान म्हणजे अस्तित्वाच्या बाबतीत वेळेची संकल्पना फोल ठरते. काल (Past) आज (Present) आणि उद्या ( Future ) ह्या आस्तित्वाच्या कल्पनेनुसार वेळ ही विचारसरणी चुक ठरते. म्हणजे अस्तित्वाच्या विश्लेषणामध्ये वेळ नसते. There is no such thing as time म्हटले आहे.
परंतु वेळेची संकल्पना देह मनाचा विचार करता असते. कारण भूत, भविष्य, आणि वर्तमान काळ देहमनासाठी असतो. म्हणजे त्याना वेळेचे बंधन असते. आम्ही जर असूत तरच वेळेचा (Time) आणि जागेचा (Space )प्रश्न असतो. परंतु त्या अस्तित्वाला काळाचे, वेळेचे वा जागेचे बंधन नसते. जेव्हां मीची ओळख देह मन बुद्धी अहंकार इत्यादीनी केली जाते, तेव्हां माझे वेळ (Time ), जागा (Space)मध्ये अस्तित्व असते. परंतु जेव्हां जीवाला Reality consciousness सत्य जाणीव म्हणून बोलले जाते. तेव्हां ते वेळ (Time) व जागा (Space) ह्याच्या मर्यादेबाहेर जाते. ते Timeless and Space less असते. अर्थात नेहमी व सर्वत्र असते.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s