Tag Archives: जीननाच्या रगाड्यातून

ह्रदयातील ईश्वर

जीवनाच्या रगाड्यातून-

ह्रदयातील ईश्वर

महाभारतामधला एक प्रसंग आठवला. छोटासा परंतु जीवनातील अध्यात्म्याच्या प्रांतामधले एक महान तत्वज्ञान उलगडून सांगणारा वाटला.

द्रौपदी वस्त्रहरणाचा भयानक व तिरस्कारणीय प्रसंग. शकुनीमामा व कौरव हे वृत्तीने दुष्ट कपटी चालबाज होते. पांडव तितकेच भोळे होते. कौरवानी त्याचा पूर्ण फायदा घेतला. युद्धिष्टिर पांडवातील ज्येष्ठ बंधू. त्याला दुर्दैवाने द्युत ( सारीकापाट) खेळण्याचा नाद होता. कौरवानी त्याना कचाट्यात पकडले. शकुनी लबाडीने खेळला. पांडव  खेळांत सर्व गमावून बसले. इतके की भावनीक बेभान होऊन त्यानी जींकण्याच्या अपेक्षेने पत्नी द्रौपदी हीलाही पणाला लावले. कौरवानी द्रौपदीची विटंबना सुरु केली. हारलेले पांडव मुकपणे सारा भयावह प्रकार बघत  बसले.

द्रौपदी असाहय्य झालेली होती. तीला कुणीही मदत करण्यास सरसावत नव्हते. शेवटी तीने मानलेला भाऊ श्रीकृष्णाचा धावा केला. तो धाऊन आला. त्याने तीला त्या वस्रहरण प्रसंगातून सोडवले. सारे वातावरण शांत होऊ लागले होते.

द्रौपदी मात्र मानसिक निराशेने ग्रस्त झाली होती. ती कृष्णावर देखील रागावली. तीला एक आधीकार व प्रेम प्राप्त झाले होते.

”  कृष्णा हे सारे विक्षीप्त घडत असताना, मी तुझा धावा केला. तू आलास, परंतु तू येण्यास उशीर कां केलास ?  ”  प्रेमाने परंतु निराशेच्या स्वरांत द्रौपदीने कृष्णाजवळ तक्रार करीत विचारणा केली.       श्री कृष्णानी हासून उत्तर दिले.

” तू माझा धावा केलास. मदतीची अपेक्षा केली. ”

तू त्या क्षणी काय म्हणालीस ते आठव. तू म्हणाली होतीस  ” हे द्वारकेच्या कृष्णा मी संकटात आहे. तू त्वरीत येऊन माझी सोडवणूक कर. ”

तू जेव्हां मला हांक दिली की ” हे द्वारकेच्या कृष्णा, तेंव्हा त्याक्षणी मी तर तुझ्याच ह्रदयांत बसलो होतो. ”

जर तू मला  ” माझ्या ह्रदयातील कृष्णा संबोधून हाक दिली असतीस, तर मी तुझ्याजवळच होतो. त्याचक्षणी मला येता आल असत. परंतु तु मला द्वारकेच्या कृष्णा संबोधल्यामुळे मला प्रथम द्वारकेस जावे लागले व तेथून तुजसाठी आलो. त्यामुळे वेळ लागला. ”

आपण देखील जीवनांत ह्याच रीतीने आपली वाटचाल करतो. अशी समज आहे की तो ईश्वर हा तुमच्या आमच्यामध्येच असतो.  अहं ब्रह्मास्मि अर्थात  मीच ब्रह्म वा परमेश्वर आहे म्हणतात. मात्र आपण त्याला जाणत नसतो. समजत नसतो. “मी ”  ला ओळखत नसतो. त्याला आम्ही बाह्य जगांत शोधण्याचा सतत प्रयत्न करतो.   देवस्थळे, मंदिरे, चर्च, गुरुद्वारे, मशिदी, इत्यादी मध्ये त्याच्या अस्तित्वाचा शोध बोध घेण्याचा प्रयत्न करतो. संपूर्ण आयुष्य खर्च करतो. आम्ही ईश्वराला आमच्यातच म्हणजे “मी ” चा शोध घेण्यात कमी पडतो. त्यात वेळ खर्ची होते. ह्रदयातील त्या ईश्वराला श्री कृष्णाला जर द्वारकेत न्याल तर आयुष्याची  वेळ वाया जाईल.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

 

०० दिवाळीचा फराळ फटाके आणि दिवे.

०० दिवाळीचा फराळ फटाके आणि दिवे.

” जीवनाच्या रगाड्यातून ”   आणि ” बागेतील तारका ”  ह्या दोन मराठी ब्लॉग तर्फे

 सर्ववाचकलेखकआणिसंबंधिताना  

हीदिवाळीआगामीवर्षआनंदसुखसमाधानात 

 जावोहीनम्रप्रार्थना.   माझा ब्लॉग     ” जीवनाच्या रगाड्यातून” सुरु करून थोडेच दिवस झाले. दैनंदिन जीवनातील टिपलेले साधे परंतु मार्मिक प्रसंग आणि कविता ह्यांचा आधार घेत माझे लिखाण असते. आजपावतो जवळ जवळ २९,९१८ वाचकांनी त्याचा  आनंद घेतल्याचे दिसते. वाचक वर्ग हीच लेखकाची खरी शक्ती असते. सर्वाना त्याबद्दल धन्यवाद देतो. वाचकांची     काव्यातील रुची आणि मजकडे असलेला माझ्याच कवितांचा संग्रह ह्याला अनुसरुन फक्त कवितेसाठी ” बागेतील तारका ”   हा ब्लॉग नुकताच सादर केला आहे.   आधुनिक संगणक तंत्रज्ञानाने  ब्लॉग   हे दालन उघडले. जो जे लिहू इच्छितो विचार व्यक्त करू इच्छितो त्यांच्यासाठी हे एक व्यासपीठ मिळालेले आहे. व्यासपीठ ही कलाकाराची, लेखकाची प्राथमिक  गरज असते. पूर्वी प्रमाणे निर्माता संपादक प्रकाशक इत्यादींच्या छाननी मधून त्याला बाहेर पडण्याची आता गरज नाही. सर्व  स्वत:च्या   जबाबदारी     वरच   करा.  ब्लॉग ह्या माध्यमाने वेगळीच क्रांती केलेली आहे. लेखक आणि वाचक ह्यांचा त्वरित आणि प्रत्यक्ष संबंध होऊ शकतो. तुमचे विचार, लेखन वाचक स्वीकारतात  किंव्हा  अव्हेरतात हे तुम्हाला लगेच कळून येते. येथे ना मध्यस्थी, ना प्रकाशक, ना संपादक, ना काह्नी आर्थिक बोजा. येथे हवे असते तुमचे” बागेतील तारका ”   विचार, आवड, श्रम, आणि लेखन.  ह्यात वेळेचा सदउपयोग केल्याचे तुम्हास  मिळेल  समाधान.  गाणाऱ्या कलाकाराला  जसे  दूरदर्शनवर   सा रे ग म प द . .  अथवा Indion Idiol मूळे व्यासपीठ मिळाले तसेच Blog  हे लेखकासाठी आहे. जीवन ही एक निसर्गाच देण आहे. ते चक्रमय असते.प्रत्येक क्षण  वा दिवस  हा वेगळच  प्रसंग घेऊन येत असतो. घटनेचा गुंता करणे आणि त्याची  कल्पनात्मक  उकालन  करणे, निसर्ग करीत असतो. बस हेच प्रसंग,  ह्याच कथा असतात. तुम्ही सतर्क  असाल  तर  बरेच विषय तुम्हास लेखनासाठी मिळू शकतात.  मग ते ललित लेखन असो वा कविता.

बोल सारे अनुभवाचे         त्या बोलीची भाषाच न्यारी i

सुख दुःखाच्या गुंत्यामधला       अर्थ सांगतो कुणी तरी  II

अथवा

अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे        निसर्ग शिकवी क्षणोक्षणी  I

सतर्कतेने वेचून घ्यावे          दैनंदिनीच्या घटनामधुनी  II

 ” जीवनाच्या रगाड्यातून  आणि ” बागेतील तारका ”

ह्या दोन मराठी ब्लॉगमार्फत तुम्हास दिवाळीची भेट देऊ इच्छितो

** सतर्कतेने जीवनातील मार्मिक प्रसंग टीपणी आणि कविता तुमच्यासाठी असेल हा फराळ.

** वाचताना होणारा आवडल्यास आनंद, अथवा न आवडल्यास संताप, हेच असतील फटाके.

** लेखनावरील सुद्ज्ञ वाचकांच्या प्रतिक्रीया, सल्ले,व मार्गदर्शन असेल दिव्याचा प्रकाश 

धन्यवाद.पुन्हा दिवाळीच्या शुभेच्छा   

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com