घास घास घेणे

जीवनाच्या रगाड्यातून

घास घास घेणे

लहान मुलांच्या जेवणाच्या संवयींविषयी वाचत होतो. लहान मुले जेवताना खूप  त्रास देतात. हट्टीपणा करतात. त्यांच्या जेवणाच्या लहरीपणामुळे तास दोन तास देखील, ती खाण्यामध्यें रेंगाळतात. लहान बालकांना जेवण भरविणे ही अत्यंत आवघड कला असते. सहनशिलता फक्त आईला समजलेली दिसते. मुल उपाशी राहू नये म्हणून ती सतत त्याच्या पाठीमागे राहून ते भरविते. आईच्या मुलाना जेवण खावू घालण्याच्या अनेक युक्त्या असतात. येनकेन प्रकारे घास भरवणे व त्याच्या पोटांत तो जाईल याचा तीचा प्रयत्न असतो.

               जेऊ घालताना गोष्टी सांगणे, कड्यावर घेवून घरभर, गच्चीवर वा अंगणात फिरत त्याला भरविणे, तुला जेवणानंतर चॉकलेट वा बिस्कीट देईन ही लालूच लावणे, खेळणी देणे, किंवा  घाक दाखविणे, रागावणे, अशा अनेक प्रकारे निरनिराळ्या युक्या ती आयोजीत असते. मला येक युक्ती खुपच आवडली. आई मुलाला खिडकीबाहेर चिमणी, कावळा वा पक्षी दाखविते. ‘ तो बघ कावळा. किती उंच गेला. त्या झाडावर तो बसला ‘  मुल उत्सुकतेने व बारकाईने त्याचे निरीक्ष करते. मुलाचे लक्ष त्या पक्षाकडे लागते. हीच वेळ म्हणजे आपला मुलाचा लक्षवेध आई नेमका टीपते. ती तो क्षण साधत मुलाला घास भरवते. मुल देखील आपला हट्ट, लहरीपणा, रेंगाळू वृत्ती बाजूला ठेऊन, तोंडाचा आ करीत तोंड ऊघडते. घास भरविला जाऊन तो खाल्ला वा गिळला जातो. अर्थात ही क्रिया एक प्रकारे आपोआप होवून जाते. हालाच पुस्तकांत Distraction of Mind, method of feeding  अर्थात लक्ष विचलीत करुन घास भरवीणे म्हणतात. येथे मात्र लक्ष्य विचलीत करण्यासाठी निरनिराळे पक्षी, प्राणी, वा पदार्थ ह्यांचा कल्पकतेने उपयोग करावा लागतो.

               आजकालचे वैद्यकिय  बालविकास शास्त्र अशा पद्धतीना अयोग्य समजतात. परंतु ह्या गोष्टी कालांतरापासून चालत आलेल्या आहेत. घास भरविण्याच्या पद्धतीलाच विरोध केला गेला आहे. जेवणाचे ताट मुलाच्या समोर ठेवा. ते मुल आपल्या हाताने व मनानेच खाईल. ठराविक वेळ त्याच्या जेवण्यास द्या. मुलगा खेळतो, रेंगाळतो, जेवत नाही. खाणयाच्या पदार्थांची सांडलोंड करतो. तुम्ही तुमचे  मन घट्ट करा. व ठरविलेली वेळ होताच त्याचे ताट उचलून ठेवा. लगेच त्यास देऊ नका. कोणतेही भाष्य करु नका. ठरलेल्या वेळीच पुन्हा त्याला जेवनाचे ताट द्या. कोणतेही मुल उपाशी रहात नसते. तुमच्या अशाच वागणूकीने त्याला जेवणाची जाणीव होईल. आणि मुल सहजतेने जेवण घेईल. जेवणाला एक नैसर्गिक प्रक्रिया समजा. तुम्ही त्याला जेवढे खाऊ घालण्याचे प्रयत्न कराल, आग्रही बनाल, मुल तेवढेच रेंगाळते. हट्टीपणा करते. ह्यालाच  Attention Seeking Device म्हणतात. आपल्याकडे ह्यात मुले जींकतात व पालक हारतात.

                 मला अचानक माझ्या बालपणीची गोष्ट आठवली. एकत्र कुटूंब पद्धत होती. काका मामा यांची सर्व मुले एकत्र जेवण्यासाठी बसत होतो.  जेवताना एक खेळ खेळत असू. प्रत्येकाने आपल्या ताटांत एका बाजूला एक घास काढून ठेवायचा. जेवण करता करता इतरांकडे लक्ष ठेवायचे. कुणाचे लक्ष नाही हे बघून तो बाजूस ठेवलेला घास चटकन खाऊन टाकायचा. इतरांचे लक्ष चुकवून आपला बाजूस ठेवलेला घास खाण्यात जो सफल होईल तो जींकला. ह्यात तुम्ही जिंकण्याच्या प्रयत्यांत तुमचे जेवण चालू ठेवता. कारण तुम्ही सरळ

जेवत आहांत हे इतराना भासविणे, त्याना फसवणे, व आपला घास त्याच जेवणांच्या प्रक्रियेत खावून टाकणे ही कला ठरते. खेळ छोटासा, परंतु मनाला एक वेगळीच दिशा देत जेवण पू्र्ण केले जायचे. हा खेळ म्हणजे जेवण्यामधील Distraction Method  च नव्हे कां ?  आम्ही त्याला ‘ घास घास घेणे ‘   म्हणत असू. 

डॉ. भगवान नागापूरकर

 ९००४०७९८५०

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s