होर्डींग आणि शुभेच्छा

होर्डींग आणि शुभेच्छा

संध्याकाळची वेळ. रस्त्याच्या चौकोनातील एका बाकावर बसून वर्दळ व सभोवताल बघत होतो. समोर एका स्थानिक व्यक्तीचे प्रचंड मोठे होर्डींग ( Hording- Cut out) लावलेले होते. वाढदिवस आणि जनतेकडून शुभेच्छा मिळाव्यात ही अपेक्षा होती. शेजारीच कांही सामाजिक, राजकीय व्यक्तींची पण चित्रे काढलेली होती. जाणारा शेजार बाकड्यावर येऊन बसायचा, थोडी विश्रांति घेऊन निघून जायचा. मी प्रत्येकाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. तसे मला त्या होर्डीगवरल्या व्यक्तीशी कांही घेणे देणे नव्हते. त्याना मी बघीतले देखील नव्हते. फक्त एका त्रयस्थाच्या भूमिकेत. प्रत्येक येणाऱ्या व्यक्तीला त्या होर्डींग विषयी विचारले. मी जवळ जवळ १०० पेक्षा जास्त व्यक्तींशी संपर्क साधला. सर्वांची मते जी व्यक्त झाली ती अशी.-
काय प्रचंड होर्डींग आहे, काय गरज होती, कशाला रस्ते खराब करतात, कशाला स्वतःचा उदो उदो करतात, हरामी ही माणसे, जनतेला लुटणारी, पैसा लुबाडणारी, सामाजिक कार्य करतात सांगुन पैसे उकळणारी, गुंड प्रवृतीची, अहंकारी, जातपात याची पेरणी करणारी, समाजातील घाण, लुटमार करणारी टोळी, — इत्यदी अनेक दुषणे ऐकली.
मी चक्राऊन गेलो. मला एकही व्यक्ती भेटला नाही, ज्याने त्या तथाकथीत होर्डींगवरल्या व्यक्तीचे अभिनंदन केले. वा शुभेच्छा दिल्या. सर्वानी त्या होर्डींग बद्दल राग, तिरस्कार, घृणा, द्वेश व्यक्त केला. मी बेचैन झालो. लोकांच्या ह्या विचार भावने मुळे नव्हे. तर त्या होर्डींगवरल्या व्यक्तीने आपली छबी पोस्टरवर लाऊन शुभेच्छेची अपेक्षा केली होती. त्याच्या आत्मिक स्थरावर शापांचा, दुर्विचारांचा, तळतळाटाचा प्रचंड आघात होत असलेला जाणवला. आणि ती व्यक्ती मात्र ह्या अघाताविषयी अंधारात होती. अज्ञानात होती. त्याचे लक्ष फक्त वर वर व समोर व्यक्त होणाऱ्या त्याच्या स्तुतीपर शब्दावरच गुंतले होते. सारे खोटे मुखवटे होते. अघात मात्र तळतळाटाचा, व दैविक निर्णयाचा होता. कालानुसार हा भोगावाच लागेल नव्हे कां ?
अध्यात्म्याचे तत्वज्ञान माणसाला आनंद समाधान व शांतता देवू करण्यास प्रयत्नशील असतात. विचार व भावना ह्या मानवाच्या मन बुद्धीचा प्रमुख स्रोत असतो. त्या सतत उत्पन्न होतात. त्यांत असते देहातील आत्म्यामधून उत्पन्न झालेली उर्जा शक्ती. ती सकारात्मक वा नकारात्मक पद्धतीप्रमाणे वाहू लागते. परिणाम चांगला वा वाईट होऊ शकतो. ह्या विचार भावनिक स्रोत लहरी, Waves, रुपाने झेपावतात. चिंतन केलेल्या लक्ष्यावर आदळतात. आघात करतात. जेंव्हा यांचे सांघिक एकत्रीत परिणाम होतात,
ती याच समीकरणामधून. येथे लक्ष्य, वेध, अघात, परिणाम, भोग इत्यादी अव्यक्त, अद्रष्य स्वरुप रचनेंत असतात. ह्यातून विचार प्रवाह उत्पन्न होतात. आपले कार्य, कर्म, धडपड, सभोवताल, उत्कर्श, व्ययक्तीक सामाजिक स्थान समाजा समोर व्यक्तीरुपाने प्रदर्शित करुन अनेक जण जन समुदायाकडून शुभेच्छा, आशिर्वाद, सहकार्य, अपेक्षीत असतात. कदाचित् जे Materialistic (पदार्थमय) असेल ते त्याना मिळतही असेल. परंतु जे दैविक, अध्यात्मिक, लहरी रुपाने त्यांना लक्ष्य केले जात असेल, त्याचा देखील परिणाम होणारच. ते अव्यक्त, अद्दष्य, असल्यामुळे मनाच्या शांतता वा अशांतता ह्यावर प्रभावित होणारच.

डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s