क्लिनिकल कॉन्फरन्स

क्लिनिकल कॉन्फरन्स
Clinical Conference ही संकल्पना मेडीकल कॉलेज परिसरांत विद्यार्थ्याची सर्वांत आवडती आणि आनंद देणारी. मेडीकल कॉलेजचे स्वतःचे एक हॉस्पिटल असते. अद्यावत, भव्य आणि रोग्यांच्या सर्व सोईनी परिपूर्ण. अनेक वैद्यकीय विषयातील तज्ञ डॉक्टर मंडळी हे प्रमुख आकर्शन असते. ह्या लोकांचा सतत जगातील इतर आरोग्य समस्यांच्या सोडवणूकीतील अभ्यासक्रमाचा संपर्क असतो. ही मंडळी Updated latest medical knowledge बाळगून असतात. रुग्णालयाच्या अनेक वॉर्डामध्ये विवीध प्रकारचे रुग्ण उपचार घेत असतात. रुग्ण, त्यांच्या तपासण्या, वैद्यकीय रिपोर्टस, आणि सविस्तर उपचार हे तेथील वैद्यकीय विद्यार्थ्यासाठी शिकण्यासाठी महत्वाचे अंग असते. सर्व लक्ष देऊन बघणे, ऐकणे व शिकणे ह्यातूनच ते भावी चांगले डॉक्टर बनत असतात. प्राध्यापकांचे मार्गदर्शन, वाचनालयातील विद्वान लेखकांची पुस्तके त्या त्या विषयाचे ज्ञान मिळवून देतात. अनेक प्रकारचे रोग, विशीष्ट रोग्यामधली समस्या, रोग निदान करण्यांत येणारी समस्या, त्यावरील विवीध तज्ञांची भिन्न मते. हे सारे ऐकताना,समजुन घेताना, ज्ञानाबरोबर बरीच करमणूक होते. अशा निवडक केसेस ह्या क्लिनिकल कॉन्फरन्स मध्ये सादर केत्या जातात. विवीध केसेस वेगवेगळे वैद्यकीय तज्ञ हाताळतात.
आमच्या मेडीकल कॉलेजच्या वेळी देखील अशीच क्लिनिकल कॉन्फरन्स आठवड्यातून एकदा घेतली जायी. निवडक केसेस कांही तज्ञ सादर करीत असत. त्या केसेस विषयीचा संपूर्ण अहवाल, तपासणी रिपोर्ट, झालेले निदान, हे सर्व एकत्रीत एकाद्या जेष्ठ डॉक्टरलाच माहीत असे. ती केस, त्याचा नंबर, नांव, वार्ड, येवढेच चार दिवस आधी सर्वांना सांगितले जायी. बोर्डावर नोटीस लागे. सर्व तज्ञाना एक प्रकारे आवाहन केले जात असे. ज्याला जसे जमेल तसे प्रत्येकजण त्या रोग्याला तपासून अभ्यासपूर्ण तयारी करीत असे. ठरलेल्या दिवशी Clinical Conference हॉलमध्ये पेशंटला आणले जाई. सर्वजण चर्चा करुन आपापल्या टिपण्या सादर करीत. तेथे प्राध्यापक वर्ग, विद्यार्थी प्रचंड संखेने असत. त्यांची चर्चा विद्यार्थ्यासाठी एक परवणीच असायची. अशी संधी ते केंव्हाही गमवत नसत. अनेक वेळा हास्य विनोद होऊन सभागृहांत आनंदी वातावरण निर्माण होत असे.
एकदा एक मजेदार केस ठेवण्यात आली होती. एका व्यक्तीच्या पोटात एक गोळा निर्माण झालेला होता. Abdomen is a magic box असतो असे म्हणतात. पोटात काय व कसे उत्पन्न होईल हे कोणीही सांगू शकणार नाही. अनेकजण तर्क करतात. अनुभव, वातावरण, आणि लक्षणे ह्यांच्यावरुन बरेचजण अनुमान काढतात. अशा केसेस मध्ये सोनोग्राफी, बायाप्सी, Laprotomy म्हणजे चक्क पोट फाडून तपासणे ह्या क्रिया करुन शेवटचे निदान ठरते.
त्या पेशंटच्या पोटात गोळा होता, परंतु तो कसला असावा, ह्यावरच चर्चा झाली. वेगवेगळे विचार सांगितले गेले. दोन वैचारिक तट पडल्याचे जाणवले. डॉ.मारवा म्हणत हा साधा ( Benaign ) गोळा आहे तर डॉ.सैनानी यांच्यामते तो कॅन्सरयुक्त ( Malignant ) असावा.
सर्वांच्या नोंदी संपल्यानंतर त्या केसचे इन् चार्ज शेवटचा अहवाल वाचण्यासाठी पूढे आले. त्याच क्षणी डॉ. सैनानी एकदम पुढे आले व म्हणाले. ” One last point, not so important, but my observation. When I palpated the tumor, the patient felt pain. Tenderness is in favor of malignancy.” लगेच डॉ. मारवा उठले व म्हणाले. ” Including yourself about 200 doctors palpated his abdomen. Without there being a tumor, he will feel tenderness. ” हास्याची एकदम लाट उमटली.

डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s