३४० चिमण्यांची भाषा.
चिव् चिव् करित बोलतां तुम्ही सारी भाषा
दोन स्वरातून विचारांना देत असता दिशा
शब्द आमचे सप्तसुरांतून येती बाहेरी
व्यक्त करिती भाव सारे असती जे अंतरी
दोन अक्षरी किमया सारी तुमच्या भाषेची
त्याच चिव चिवे समजुन घेता धडधड ह्रद्धयाची
भाव मनीचे टिपून घेण्या शब्द लागती थोडे
चेहऱ्यावरल्या हलचालीनी प्रश्न उकलूनी पडे.
समज तुमची आपसांतली कौतूक करणारी
शब्द मोजके असून देखील भाव दाखविणारी
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com