Daily Archives: डिसेंबर 5, 2013

राधेचे मुरली प्रेम

राधेचे मुरली प्रेम

मुरलीच्या सुरांत विसरली राधा सर्वाला

कुज  बूज करुनी जन समजती वेडी ते तिजला    ।।धृ।।

त्या सुरात कोणती जादू

ती किमया कशी मी वदू

सप्त सुरांचा निनाद उठुनी

खेचून घेती चित्ताला – – –   ।।१।।

विसरली राधा सर्वाला

धेनु वत्से बावरली

बाल गोपाल आनंदली

रोम रोम ते पुलकित होऊनी

माना डोलती सुरतालाला – – –   ।।२।।

विसरली राधा सर्वाला

प्रभूचा होता ध्यास मनी

ती बघे हरिला रात्रन दिनी

जे शब्द निघाले मुरलीतूनी

हाका मारती  ते तिजला  – – –   ।।३।।

विसरली राधा सर्वाला

हरिच्या ओठ्ची भाषा

सुरात ऐकता येई नशा

तो नाद एकला कानी पडता

भाव समाधी लागली तिजला  – – –   ।।धृ।।

विसरली राधा सर्वाला

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

bknagapurkar@gmail.com