* अनुभव
सुख दुःखाच्या लाटेमध्ये,
तरणे वा बुडणे
जगेल तो त्या क्षणी,
ज्याला माहित पोहणे
पोहणे जगणे कला असुनी,
अनुभव हा शिकवूनी जातो
जागरुकतेने कसे जगता,
यशही त्याला तसेच देतो
जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या,
कष्ट लागती महान
परि केवळ एक अनुभवी प्रसंग,
सारे देतो मिळवून
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे,
निसर्ग शिकवी क्षणोक्षणी
सतर्कतेने वेचून घ्यावे,
दैनंदिनीच्या घटनामधूनी
बोल सारे अनुभवाचे,
त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दुःखाच्या गुंत्यामधला,
अर्थ सांगतो कुणीतरी.
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com