Daily Archives: एप्रिल 25, 2013

महाराजानी मिळवले देवत्व

 जीवनाच्या रगाड्यातून-

महाराजानी मिळवले देवत्व

 

एकनाथ माझा मित्र. त्याच्या घरी एकदा कोणत्या तरी पुजाविधीसाठी प्रसादाला गेलो होतो. घरातील देवघरात कोणत्यातरी महाराजाची मोठी तसवीर लावलेली होती. हार, फुले, उदबत्ती, निरंजनचा दिवा तेवत ठेवलेला होता. त्या महाराजाविषयी चौकशी करता ते शेजारच्याच गावचे एक ग्रहस्थ असल्याचे कळले. सामान्य जनाप्रमाणे त्यांचे व्यवहार चालू असतात. एका बँकेमध्ये नोकरी करुन उदार्निवाह चालवितात हे कळले. परंतु अध्यात्मिक प्रांतात, ईश्वरी ज्ञानाबद्दल जाणकार होते. वाचन, अभ्यास, व अनुभव ह्यातून त्यानी ज्ञानसंपदा केलेली होती. ईश्वरी श्रद्धा, संकल्पना, ज्ञान आणि वाणी कौश्यल्य ह्याचा  अप्रतीम संगम प्राप्त ती व्यक्ती होती. निसर्गतः ह्या व्यक्तीचा समोरच्या ऐकणाऱ्या श्रोत्यांवर एकदम परिणाम होणारच. व्यक्तीचे ज्ञानच फक्त प्रभावित करणारे असते. त्या ज्ञानी व्यक्ती बद्दल आदर वाटू लागतो. त्याचे प्रत्येक शब्द आपणास पटू लागतात. प्रत्येकजण अशा व्यक्तीचे मोजमाप आपल्या स्वतःच्या ज्ञान साधनेतून करतो. त्याला संपर्कात ठेवतो. आदर्श मानतो. मोजमापाचे कोणतेही परिमाण नसते. फक्त वाटले, पटले, भावले, ह्या शब्दानी त्यावर मुलायमा लावला जातो. त्याचे तुम्ही वर्णन करु बघता. त्याला चांगल्या, उत्कृष्ट स्थानी मानता. देवत्वाची कल्पना ही अशाच चक्रातून सुरु होते. दुसरा ऐकून तोही प्रभावित होतो. सर्वांत महत्वाचे म्हणजे त्या तथाकथीत थोर व्यक्तीला कृपावंत, दयावंत, सुखदाता, दुःख हर्ता इत्यादी विषेशने लाऊन, त्याच्या बद्दल वाटणारे प्रेम आदर्श व्यक्त करताना आपलाही अहं जागृत केला जातो. मला कोणीतरी देवतुल्य व्यक्ती सापडला, हा भाव निर्माण केला जातो. तसे जीवन हे सुख दुःख यांच्या परिणामांचेच चक्र असते. मात्र व्यक्ती नेमके सुखदायी घटना टिपून त्या देवत्व दिलेल्या व्यक्तीवर लादतात. त्यांच्यामुळे हे सारे मिळाले, प्राप्त होऊ शकले ही अशांची समज. बस ह्याच आहिक मिळकतीची यादी सतत सर्वासमोर ठेऊन, वाचून त्या व्यक्तीला दिले गेलेले देवत्व द्दढ करण्याचा प्रयत्न होतो. एकापासून दुसरा, नंतर तिसरा, मग चौथा —  सर्व त्या मार्गानी धावण्याचा प्रयत्न करतात. येथे प्रमुख ध्येय बनते ते सुख मिळवणे वा दुःख कमी करणे. आदर भावना, प्रेम, हे तर देवत्वासाठीचे रंग आहेत. सारा व्यवहार हा फक्त अशाच मुखवट्याने झाकलेला असतो.

प्रत्येक सजीवाला भावना दिलेल्या आहेत. हा एक सिद्धांत आहे. तो त्याचा जीवन जगण्याचा व आशेचा एक मार्ग असतो. भावनाप्रधानता हा नैसर्गिक गुणधर्म असतो. मानवाला मात्र ‘विचार- विवेक ‘ ह्या संकल्पनेचे विशेष वरदान मिळाले आहे. त्याच्याच जोरावर जीवनांत तो प्रगती करतो, जीवनाच्या गरजांचा मागोवा घेत ते सुसाह्य करतो. मात्र अनेक प्रसंगी भावना ह्या विचारावर मात करतात. त्या प्रमाणे तो वागण्याची दिशा अखतो. विचारच सांगतात की परिस्थिती काय आहे. वातावरण कोणते आहे. जगण्याचे सारासार मार्ग कोणते. पायंडा कोणता. इत्यादी. खरे जगणे व सुसाह्य जगणे, सत्याचा  मागोवा तर्क बुद्धीने घेणे, याचे मार्ग दर्शन फक्त सुविचारच करु शकतात. व्यक्तीचे मुळ गुणधर्म असतात स्वार्थ, अहंकार, वर्चस्व, राग, लोभ, मोह. आणि ह्याच्या गुंत्यातच राहण्यांत ती समाधान मानते.

निसर्ग महान असतो. जीवनासाठी उर्जा देणारा असतो. गरजांची पूर्तता करणारा असतो. खरे म्हणजे त्यालाच देवत्व ही संकल्पना लादलेली असते. प्रकाश, अग्नी, हवा, पाणी, प्रथ्वी इत्यादी मध्येच ईश्वराच स्वरुप असते. प्रथमदर्शनी अभ्यासकांनी,

२        विद्वानानी, ऋषी मुनीनी हे मान्य केले. निर्गुण निराकार सर्व व्यापी अणूरेणूस्थित इत्यादी. माणूस एक बुद्धीवान प्राणी. त्याच्या भावना उसळू लागल्या. मन सैरावैरा धाऊ लागले. ईश्वराला जाणण्यात भावनानी अनेक अडचणी निर्माण करण्यास सुरवात केली. ईश्वराच्या संकल्पनेला सगुण रुप दिले गेले. ‘विविधता ‘ हा मानवी स्वभाव गुणधर्म आहे. तो वरदान तसाच शाप देखील ठरत आहे. एकसंघपणा, एकवाच्यता ह्यामुळे संपूर्ण नष्ट झाली. ज्याला जसा विचार सुचला, जशी भावना आली, त्याप्रमाणे तो त्याने व्यक्त केला. इथेच न थांबता, आपलेच विचार कसे योग्य व परिणामकारक आहेत, ह्यावर भाष्य सुरु झाले. जो जेवढा प्रभावी, पटवून देणारा  , अभ्यासक, वाक् चतूर होता, इतरांच्या गळी उतरविण्यास सक्षम ठरला. झाले निरनीराळे संघ, समाज, कुटूंबे त्याच्या विचारावर मोहून गेली. अनेक मार्ग, विचारसरणी, प्रथा, बनू लागल्या. प्रमुख विचार धारा एकच होती. मात्र वेगवेगळ्या दिशा, मार्ग विचारसरणी ह्यानी अनेक तुकडे तुकडे बनत गेले. फारच थोड्याना हे कळले. परंतु अनेकजण फक्त नक्कल करण्यांत समाधानी होऊ लागले. एक इसापनिती मधली गोष्ट आठवली. झाडाचे पान पडले. ससा भितराच तो. घाबरला. त्याला वाटले आकाश कोसळत आहे. तो धावत सुटला. ओरडत सुटला— ”पळा पळा आकाश कोसळत आहे.”—-   त्याचे ओरडत धावणे बघून, रस्त्यामधील भेटणारे इतर प्राणी ही त्याच्या बरोबर धूम ठोकून पळू लागले.—- कसलीही खातरजमा न करता.  फक्त जे दिसते ते सत्य समजून.

मानवी जीवनातही असेच चित्र दिसून येते. बुद्धीमत्तेचे वरदान असून देखील. कुणीही सारासार विचार, विवेकाला चालना देताना दिसत नाही. फक्त जे दिसते, एकू येते, कुणीतरी सांगते, कांही तरी वाचले जाते, बस माणसे ह्यातच वाहुन जातात. जीवन प्रवाहांत प्रवाह नेईल तस वाहून जायच नसत. पोहून मार्ग आक्रमण करावयाचा असतो. इतरांचे अनुभव मार्ग दर्शनासाठी ठीक. परंतु त्यातील सत्यता व तारतम्य ह्यावर चिंतन असावे. स्व अनुभव व सदसदविवेबुद्धी ह्यावर जीवन प्रवाह करायचा असतो. आज काल कोणत्याही संकल्पनेचे त्वरीत व अनेक शिष्यगण तयार होतात. कुणीही सखोल अभ्यास, ज्ञान, माहीती याचा विचार करीत नसतो. फक्त तो करतो. मला पटले. आम्ही असे वर्षानुवर्षे करीत आलो आहे. पुर्वजानी केले. आता मी करीत आहे. कुणीही रचमात्मक अभ्यास करीत नाही. त्याला आवाहन देऊन त्याची सत्यता पडताळून बघत नाही. मागुन आले. पुढे चालू. शेवटी शेवटी तर संपूर्ण सत्य, तत्वज्ञान, बदलून जाते. व राहतात त्या रुढी, फक्त गैरसमज, अज्ञानाच्या भिंतीच्या चौकटीमध्ये बंदीस्त. मुळ गाभ्याकडे कुणीच लक्ष देत नाही.

भावना आली, पटले, व अनुकरण केले. एकनाथरावानी ज्या व्यक्तीचा फोटो  घरांत लाऊन त्याला सर्व भावनिक देवत्वाचे गुणधर्म अर्पण केले. देव संकल्पनेपेक्षाही जास्त प्राधान्य दिले तो अशातलाच भानिक श्रद्धेचा प्रकार झाला होता. ती व्यक्ती कदाचित् थोर असेलही. त्याला विरोध नाही. मात्र एकनाथरावांच्या वैचारीक ठेवणाची खंत वाटते. आगदी सहजपणे त्यानी त्यांचे पारंपारीक व घराण्याचे रुढी संस्कारीत देव संकल्पना मोडीत काढल्या. आपल्या उत्पन्न झालेल्या भावनाना प्राधान्य देत एक वेगळेच ईश्वरत्व निर्माण केले. अर्थात मान्य आहे तत्वज्ञान  “जसा भाव तेथे व तसा देव” परंतु असे प्रकार फक्त भावना व ईश्वर भक्ती ह्याच्यातच रहात नाही. तर त्याला व्यवहारीक, मानसिक रंग चढतो. त्याना काय भावते,  आवडते, हे मानवी विचार तुमच्या ईश्वरी भावने भोवती चक्रा मारु लागतात. व आपण त्याने प्रभावित होतो. व तसाच मार्ग निवडतो. व आपले स्वताःचे अध्यात्म निर्माण ३        करतो. ह्यात फक्त उद्देश, ध्येय नसते. असतो, मला, माझा, माझ्यासाठी,अर्थात अहंला शांत करणे. खऱ्या देवत्वाच्या कल्पनेपासून खूप दूर.  मानवी अहंकारी स्वार्थी जगांत.

एकनाथरावांच्या कल्पना रम्यतेत होता,  फक्त जीवन व्यवहार. जीवनाच्या सुख दुखाःचे धागे, झगडा, यश अपयशाच आलेख. आणि हे सारे घडत असते कुणाच्या तरी इच्छेनुसार, शक्तीनुसार, योजने नुसार. त्यांच्या लेखी मानवी प्रयत्नाना खुपच कमी मर्यादा असतात. सारे होत असते ते फक्त ईश्वरी  इच्छेनुसार. त्यांचे ते आदरणीय महाराज हेच ईश्वराचे प्रतिक आहेत. त्यांच्याच दयेवर सारे व्यवहार, दैनंदीनी चाततात. महाराजाना समर्पण भाव, व प्रेम, सतत वाहणे, व्यक्त करणे हेच ते आपल्या जीवनाचे ध्येय समजतात. एकनाथराव आपल्या वैचारीक व भावनिक गुंत्यात सतत राहू इच्छीत होते. हीच त्यांची श्रद्धा व ते द्रष्य स्वरुपांत देऊ करण्याचे आश्वासन देणारे त्यांचे देव अर्थात महाराज.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-   bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     ***२०नुकत्याच जन्मलेल्या कृष्णाला देवकीने नंदाघरी पाठविलं

ईश्वरी अवताराची चाहूल लागूनही मातृ ह्रदय हळहळलं