जीवनाच्या रगाड्यातून-
वेडा अहंकार !
एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला
शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला
जुनी वास्तू, पडझड दिसली अवती भवती
झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती
किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे
रान फुले ती उग्र वास तो दरवळीत होते.
विषण्य झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर
राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर
पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे
पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते
संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी
परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी
घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर
आखू लागलो मनी योजना शांत करुनी विचार
सांज असुनी संधी प्रकश तो पडला चोहीकडे
कोकिळेचा मधुर आवाज तो कानी माझ्या पडे
फुलपाखरे गंध शोषित फुलावरी नाचती
मध्येच जाऊन शिवलिंगावरी मध शिंपडती
चिमणी आली नाचत तेथे चोंचीत घेउनी दाना
शिवापुढे तो टाकला तिने उंचाउनी मना
गुंजन करीत मकरंद आला लिंगाभवती फिरे
आरती कुणाची गात होता उमज ना येई बरे
वाऱ्याची ती झुळक येउनी फुले तयाने उधळली
अलगद येउनी मंदिरी शिवावरती पडली
चढाओढ ती दिसली मजला प्रभूच्या सेवेची
लाज वाटली मनास माझ्या वेड्या अहंकाराची
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी *** ८ |
दैवी संपत्तीचे २६ गुणरुप-
१-अभय २-सत्वशुद्धी ३-ज्ञानयोग व्यवस्थिती ४-दान ५-दम ६-यज्ञ ७-स्वाध्याय
८- तप ९-आर्जव १०-अहिसा ११-सत्य १२-अक्रोध १३-त्याग १४-शांती १५-अपैशून्य
१६-दया १७-अलौलुप्य १८-मार्दव १९-लाज २०-अचापल्य २१तेज २२-क्षमा
२३-धर्य २४-शौच्य २५-अद्रोहत्व २६-अमानित्व
विरुद्ध-आसुरी संपत्ती-
१- दंभ २-दर्प ३-अभिमान ४-क्रोध ५-पारुष्य ६-अज्ञान