Daily Archives: फेब्रुवारी 25, 2013

‘Percussion ‘ एक वैद्यकीय तपासनी पद्धत

जीवनाच्या रगाड्यातून-

Percussion      एक वैद्यकीय तपासनी पद्धत

विचार करणे हे मेंदूचे अत्यंत महत्वाचे कार्य.  त्यातही कांही व्यक्ती सतत नाविन्याचा विचार करीत असतात. निसर्ग कोणतीही गोष्ट तुमच्या समोर सोडून देतो. फक्त विचारवंतच त्याच प्रथःकरण करुन ती कोणती गोष्ट आहे, कां आहे, व त्याचा सर्वसामान्यासाठी कांही उपयोग होऊ शकेल कां ह्याचा विचार करतात. त्यानाच आपण महान, तत्वज्ञानी वा शास्त्रज्ञ म्हणतो. तुमच्या आमच्या सारखीच ती साधी माणसे. कांही वेगळी नसतात. परंतु सदैव सतर्कता व चौकसपणा बाळगुण असतात.

झाडाखाली विश्रांति घेत असलेला न्युटन. त्याला झाडावरुन पडणारे फळ दिसले. गुरत्वाकर्षनाची माहिती जगाला कळली.  किंवा आर्किमेडीज स्नानासाठी पाण्याने भरलेल्या टबात उतरला. सारलेल्या पाण्याचे आणि घनरुपाचे अनेक जगप्रसिद्ध सिद्धांत मांडले. अशीच अनेक उदाहरणे असतात. क्षुल्लक वाटणाऱ्या गोष्टीमधून महान वैज्ञानिक तत्वज्ञान बाहेर येते.

डेन्मार्कचा एक वैद्यकीय विचारवंत जिब्सन. तशी त्याला दारु पिण्याची सवय. तो दारु विकत घेण्यासाठी एक दुकानांत गेला. त्या काळी दारु टिनच्या डब्यांत भरुन ठेवीत. व ग्लासाने ती गिऱ्याईकाला दिली जायी. दुकानदाराने बोटाच्या टिचक्या सर्व डब्यावर मारुन आवाज केला. रिकाम्या डब्यावर मारलेल्या टिचकीने वेगळा आवाज येई व दारु भरलेल्या डब्यावर मारताच त्याचा वेगळा आवाज येई. केवळ लहान (बारीक ) वा मोठ्या (भदा) आवाजाच्या ( पीच ) प्रतिध्वनीवरुन तो ओळखे, की कोणता डब्बा रिकामा आहे, वा भरलेला. डॉक्टर जिब्सनने त्या दुकानदाराच्या हलचाली सुक्ष्मपणे बघितल्या.

आणि वैद्यकीय तपासणीमध्ये एका छोट्याश्या पद्धतीचा जन्म झाला. ज्याला त्यानी नांव दिले गेले  “PERCUSSION” . डॉक्टर लोक एक हात छाती, पोट, वा पाठ इत्यादीवर ठेऊन, दुसऱ्या हाताच्या बोटानी त्यावर टिचकी मारतात. सुक्ष्मपणे निरीक्षीण केले तर त्या ठोक्यामधून निरनीराळे ध्वनी लहरी निघून विवीध Pitch मध्ये आवाज ऐकू येतात. शरीरामध्ये जर कोणती अनपेक्षीत वाढ होत असेल, तर त्या मधून परावर्तीत होणारा ध्वनी सुचवितो की तेथे कांही घन रुपाची वा द्रवरुपाची वा वायुरुपाची वाढ होऊ लागली आहे. हे सारे अत्यंत प्राथमिक असते. परंतु रोग निदनाच्या प्रक्रियेमध्ये विचाराना चालना देणारे निश्चित असते. It is helpful in the diagnostic procedure of a disease.

शेकडो वर्षापुर्वीची ही त्या वैद्यकाची कल्पना, आजतागायत अनेक अद्यावत यांत्रकी तपासणीमध्येही टिकून राहीलेली दिसते.

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     *** ७

शरीरातील ३६ तत्वे-

( पंच महाभूते )   १- पृथ्वी  २- आप  ३- तेज  ४- वायु  ५- आकाश

६- अहंकार  ७- बुद्धी  ८- अव्यक्त

( ज्ञानेद्रिये )  ९- कान  १०- नाक  ११-डोळे  १२- त्वचा  १३- जिव्हा

(कर्मेंद्रिये)  १४- हात  १५- पाय  १६- वाणी  १७- उपस्थ  १८- गुद   १९- मन

( ज्ञानेद्रियांचे पांच विषय)   २०- शब्द  २१- स्पर्श  २२- रुप  २३- रस  २४- गंध

(कर्मेंद्रियाचे पांच विषय) २५-चालणे २६- बोलणे २७- घेणे २८- देणे २९-मळमुत्राचा त्याग

३०- इच्छा  ३१- द्वेश  ३२- सुख  ३३- दुःख  ३४- चेतना  ३५- धृति  ३६- संघात