बालकांची दोन पत्रे. २) बालकाचे चुलत भावास पत्र-

बालकांची दोन पत्रे.               २)    बालकाचे चुलत भावास पत्र-

                                       आकाश वय ३ महिने (वास्यव्य अमेरिकेत )

पत्र चुलत भावाला 

प्रति आदित्य वय ७ महिने (वास्तव्य भारतात) 

प्रिय आदित्य

– Hi, कसा आहेस तू?  मी ना? एकदम चांगला आहे. आताशी कुठे, म्हणजे पाच दिवसांनी व्यवस्थीत सेटल होण्याच्या मार्गात आहे आणि माझी आईना, ती मात्र अजूनही निर्माण झालेल्या शारिरीक Disturbances शी झगडा देत आपला मार्ग Normal करण्याच्या प्रयत्न्यांत. तीला पण लवकरच आराम लाभेल ही अपेक्षा.

तुला पत्र लिहीताना, तुला मी काय म्हणून संबोधावे हा प्रश्न माझ्या समोर तीव्रतेने उभा राहिला. तुला ‘आदित्य’ म्हणू का? की आदीत्यदादा. एक तर तू माझा मोठा भाऊ आहेस व परवा काकांच्या E-mail मध्ये तुझा उल्लेख ‘आदित्य दादा’ म्हणून केलेला होता. म्हणून मी संभ्रमात पडलो. मला स्वत:ला तुला फक्त ‘प्रिय आदित्य’ म्हणायला आवडेल. प्रथम जेव्हां तुझे नाव ‘आदित्य दादा’ म्हणून माझ्या समोर आले तेव्हा मी तुझी वेगळीच कल्पना केली. वाटले एक प्याँट शर्ट घातलेला कुणीतरी असेल. कमीत कमी चड्डीतरी असेल. परंतु काय, तू पण लंगोट (तो देखील त्रिकोणी) घालूनच बहुतेक वेळ असतो असे कळले. बहुतेक वेळ ह्यासाठी कि बऱ्याच वेळा तो देखील नसतो. मग तुला दादा कसा म्हणू. दादा उपाधी फक्त मोठा म्हणून लावणे मला पसंत नाही. चार महिन्याने मग मी पण अण्णा होईन व आत्याचे बाळ तुला दादा व मला अण्णा म्हणू लागेल. आपल्या तिघांच्या केवळ एक वर्षातील अस्तित्वात मला मोठेपणाच्या उपाध्यांची अडचण नको आहे. चार महिण्याऐवजी चार वर्षाचे जर अंतर असते तर मात्र मात्र मी आनंदाने तुला ‘दादा’ म्हटले असते. मला केवळ Just a good friend म्हणून Relation हवे. आणि आत्याचे येणारे बाळ तर चार महिन्याने Modern असल्यामुळे ते माझ्या विचारांशी सहमत असेल. जसे बाबा, काका, मामा व तसेच आपले फ्रेन्डशिपचे मुख्य नाते व खरे नाते ब्रॅकेटमध्ये.

परवाची तुला गमंत सांगतो, आजोबा हे बाबांबरोबर चर्चा करीत होते. Mile Stones बघत माहीती सांगत होतो. दाढी मिशा फूटणे हे येक्झ्याट असे Mile Stones नाही. कुणास ते लवकर येतात व कुणास त्यासाठी बराच काळ वाट बघावी लागते. मग समज मलाच तुझ्या आधी दाढी मिशा आल्या तर. नव्हे हेच होण्याची शक्यता जास्त आहे. कारण माझ्या बाबांना भरपूर मिशा आहेत व तोच गुणधर्म माझ्यात लवकर येणार.

२      म्हणजे मीच कसा तुझा दादा वाटणार. त्यापेक्षा हा शब्दच नको आपण दोघे Let us be good friends  नाही का? मला वाटते काकू व काकांना हे पटेल.

अमेरिकन्स वेळेच्या बाबतीत फार निश्चित असतात. चंद्रावर जाणारे यान हजारो मैलाचा प्रवास करुन ठरल्यावेळी म्हणजे दिवस-तास मिनिटे निश्चित साधत चंद्रावर उतरले. आईला अगदी सुरवातीलाच सांगितले गेले की माझे या जगात या दिवशी आगमन होईल आणि अगदी त्याप्रमाणे झाले व माझा जन्म त्याच रोजी झाला. पण माझे आई-बाबा, भारतीय ना, सर्वच गोष्टींची त्यांना घाई व कुंडली बघणे. लग्नाच्याच वाढदिवशी किंवा अमुक दिवशी ह्या वेळी म्हणजे मी यावे आणि मी त्यांच्या मनातील तारखांना साथ द्यावी ही त्यांची तीव्र इच्छा. पण मी मात्र त्यांना  पूरता चुकवला. अरे बाबा आणि आजी दोघे जण पंचाग घेवून भविष्य शास्त्रात आपण पारंगत आहोत या आविर्भावात दिवस बघून, तो चांगला कि वाईट बघून मनसूबे आखू लागलो. बाबा आपली रजा. सुट्ट्या, मिळणारे आर्थिक हिशेब यांचीच चर्चा करु लागले. मी मात्र माझ्याच पद्धतीने आलो. दोनदा धावपळ करुन डॉक्टरांना दाखवण्यासाठी न्यावे लागले. यात शंकाच नाही की मी येताना थोडासा त्रास देतच आलो. वजनाने ७ पौंड १० औंस व लांबी २१ इंच.

तुझी मी खूपच तारीफ ऐकतो. अर्थात तुझी आई टेबल टेनिस चॅम्पियन, तीला बरीच बक्षिसे व प्रमाणपत्रे मिळाली. तू पण तुला चेंडूप्रमाणे एक शॉट बसली की बाहेर सटकलास. चांगली गोष्ट केलीस. अरे माझी आई पण कांही कमी नाही. ती देखील एक चांगली डान्सर आहे. बरीच बक्षीसे तिने दसऱ्याच्या गर्भानृत्याच्या वेळच्या समारंभात मिळवली आहेत. मी पण तीची ही कला रक्तालला गुणधर्म म्हणून साध्य केली व बाहेर येण्याआधी त्याची सतत प्रॅक्टीस करीत होतो. आई म्हणायची बाळ सारखा नाचत असतो. त्याचा पाय लागतो, हात लागतो हीच तिची सतत तक्रार असे. शेवटच्या दिवशी तर मी कहरच केला. त्याच माझ्या तंद्रीमुळे मला येण्यास खूप वेळ लागला. व मी ह्या जगात आलो. अमेरीकन पद्धती काही वेगळ्याच आहेत. म्हणून मला प्रथम दिसले ते डॉक्टर नव्हे तर माझे बाबा. त्यांनीच आपल्या हाताने मला आई पासून शारिरीकदृष्टीने वेगळे केले. म्हणजे मी ज्या ‘नाळेने’ आईबरोबर बांधलो गेलो होतो, ती नाळ डॉक्टरांच्या सल्याने व मार्गदर्शनाने कापून टाकली. शारिरीक बंधनाचा शेवट करुन, प्रेमाच्या बंधनासाठी मला तिच्या कुशीत झोपवले. आता मी जगण्यासाठी आवश्यक असलेले प्रेमभरीत स्तनपान करण्यासाठी मोकळा होतो.

घरी आलो तो कोपऱ्यात एक बॅग भरुन ठेवलेली दिसली. आजीच्या बोलण्यावरुन कळले की बाळाच्या आगमनानंतर लागणाऱ्या सर्व वस्तू त्यांत ठेवलेल्या आहेत व ती बॅग तुझ्या जन्माआधीच आजीने करुन ठेवली आहे. लंगोट्‍स, दुपटी, कानटोपी, झबली, स्वेटर, पायमोजे, हातमोजे….

३         मुलामुलींची नावे असलेले पुस्तक, बाळ-बाळंतीनीसाठी सुरुवातीपासून एक वर्षापर्यंत लागणारी सर्व माहीती असलेले पुस्तक इत्यादी. सर्व महत्त्वाचे वस्तू संग्रह त्यात होते. आजी हिच किट बॅग येथून जाताना आत्याच्या आणि तिच्या बाळासाठी नेणार आहे. आजी आता खऱ्या अर्थाने Home Delivary डॉक्टर झालेली दिसते.

अमेरिकेत ‘Use and Throw’ याला फार महत्त्व आहे. तेव्हा Reuse ला येथे Chance मुळीच नाही. आजीने आणलेली सर्व लंगोट अद्यापी बॅगेतच आहेत. येथे Modern पद्धतीचे डायपर्स असतात. बेंबीपासून मांड्यापर्यंत सर्व एकदम पॅक केल्याप्रमाणे गच्च कव्हर केले जातात. इतकी काळजी ते मोठ्या व्यक्तीसाठी येथे करीत नाहीत. आजोबा म्हणाले की आदित्य दर अर्ध्या तासाला ‘सू’ करीत असे व अडीच  तासाने शी करायचा. माझे मात्र दोन्ही कार्यक्रम एकदमच अडीच तासाने  होत असतात. ‘सू’ व ‘शी’. परंतु तुला गंमत सांगू या डायपरमध्ये पाच वेळा होणाऱ्या ‘सू’ ला शोषून ठेवण्याची क्षमता असते. तेव्हा मी सू किती वेळा केली हे फक्त मलाच कळत असे. विनाकारण त्रास नको म्हणून मी प्रत्येक वेळा कोकलण्याचे टाळत असतो.

मी दोनच दिवस हॉस्पीटलमध्ये होतो परंतु या दोन दिवसांत डझनभर तरी डॉक्टर तज्ञ मंडळी मला तपासून गेली. मला कळले की त्यांना कोणताही कॉल दिलेला नव्हता. परंतु एक पद्धती म्हणून सर्वजण आले. बाळंतपण केलेल्या मोठ्या डॉक्टरानेच मला OK चे सर्टीफिकेट दिले होते. परंतु पुन्हा बालरोगतज्ञ (Pediatrician ) आले, नंतर नवजन्म तज्ञ, ( Neonatologist, डोळे बघणारा ( Ophthalmologist ) , कान नाक घसा ( ENT Surgeon )  बघणारा, सर्वजण तपासून गेले. पुन्हा कानाचे मशीन लाऊन, मला ऐकू येते का ते बघणारा आला. (Thanks God त्यांच्या गलक्यांनी माझे कान किटले नाहीत.)  रक्त, लघवी इत्यादी तपासणारा येऊन गेला. त्यांच्या व्यतिरिक्त नर्सेसची तर संख्या मोजणे कठीणच होते. बाबा ते बसल्या बसल्या मोजत होते. एकजण आला व माझा एक पाय हलवून तपासून गेला. मी वाट बघत होतो की कदाचित दुसऱ्या पायासाठी दुसरा कुणी तज्ञ येईल. मोठ्यांच सगळंच मोठं. जिथे Chance मिळेल तिथे वेगळेपण निर्माण करण्यात येथील लोक फार हुशार असतात. आजोबांनी तेथील डॉक्टरांचे नाव घेवून खूप कौतुक केले. म्हणाले भारतात , येथील डझनभर तज्ञांनी जे केले ते एकट्यानी अतिशय चातुर्याने व व्यवस्थीत तुझ्यासाठी केलं. मला तर अद्याप कल्पना शक्ती नाहीये. परंतु अशा बाबतीत ती नसलेलीच बरी नाही का. जगामधल्या अत्यंत चांगल्या व अद्यावत अशा या हॉस्पीटलमध्ये माझा जन्म व्हावा, हे मी माझे भाग्य समजतो. मला Thanks त्या येथील इन्शूरस कंपनीस ( Health Insurance Company ) द्यावयाचे आहे की ज्याच्यामुळे हे शक्य झाले. जवळ जवळ ३५००० डॉलर्स (म्हणजे १६ लाख ८० हजार रु.) खर्च आला व त्यांनी तो केला. आजोबा म्हणतात की आपली सर्व जमीन व बांधलेले घर दोन्ही विकून सुद्धा पैसे कमी पडेल.

४      डिस्चार्जच्या दिवशी तेथील प्रत्येक नर्स येवून Best Wishes देवून जात. अमेरिकन लोकांमध्ये Formalities व प्रेमळपणा व्यक्त  Express करण्याचे जबरदस्त वेडच असलेले जाणवते. मुखवटे चढवावे तसे ते चटकन तोंडावर घेतात व Express करतात, त्यासाठी Feeling ह्रदयामधून येण्याची मुळीच गरज नाही. नाहीतर आपल्याकडे. ह्रदयातून लहरी उत्पन्न होतात, डोळ्यात चमकतात, चेहऱ्यावर पसरतात व मग Express होतात. बराच वेळ लागतो यासाठी म्हणतात. येथे Hi, हा, हा, Ok, बा, See you, Best Luck असे कंप्यूटरमध्ये Fix करावे असे शब्द त्यांच्या मुखात एकदम फिट झालेले असतात. ते क्लिक होण्यासाठी ओळख, सहवास, प्रेम, भावना यांच्या फापटपसाऱ्याची मुळीच गरज नसते. माणसाच्या चेहऱ्याऐवजी चांगला पूतळा जरी त्यांच्या जवळ नेला तरी ते Hi म्हणून हासून स्वागत करतील. Everything is mechanical.

हां ।  ह्या Mechanical वरुन आठवले. माझ्या जन्माच्या दुसऱ्याच दिवशीच आम्हाला Discharge दिला गेला. आजीने रुम मधील सर्व सामान आवरुन घेतले. आजोबांनी काही बॅग्ज घेतल्यावर बाबांनी Formalities पूर्ण केल्या. मी आईच्या कुशीत शांत बसून टक मक टक मक करुन बघत होतो. आम्ही जाणार इतक्यात Hospital ची Security मधली बाई आली व विचारु लागली   “तुमची कार सीट कुठे आहे? तुम्ही मुलाला असे अंगावर घेवून जावू शकत नाही.”  बाबा गेले, त्यांनी गाडीतून Car seat (अर्थात लहान बालकाला नेण्यासाठीची टोपली) आणली. मला त्यात ठेवले गेले.  बेल्टने बांधले गेले.  दुकानामधून विकत घेतल्या गेलेल्या,  एखाद्या नवीन कंप्यूटरचे Parcel कसे संभाळून नेतात, तसे मला उचलून Hospital च्या बाहेर आणले गेले. त्या (Car Seat ) ला माझ्या सहीत, गाडीत Fix केले. एकदम पक्के. येथील लोकांनी माझ्या आईच्या भावनेचा चेंदामेंदा केलाच पण माझ्या नवजात बालमनाची कदर केली नाही. हेच माझ्या उमलणाऱ्या बालमनातील पहीले अंकूर बीजरोपण. Everything disciplined and mechanical . But  no touch of feelings.

निघताना जेव्हां नर्सेस येवून शेक हँड करावयाच्या किंवा प्रेमाने गळ्यांत पडावयाच्या तेव्हा Response देण्यात बाबा इतकच आजोबापण उत्सुक असल्याचे जाणवले. आजोबा तर म्हणाले कि आदित्याचा पण जन्म येथेच व्हावयास हवा होता. पण त्यांचे हे विचार अगदी शेवटी Discharge च्या वेळीच निघाले हे लक्षात घेण्यासारखे होते.

तुझ्या ‘सू’ ‘सू’ च्या खूपच गमती आजोबा आजीकडून ऐकल्या. त्या कारनाम्यामुळे येथे सर्वांची करमणूक झाली. पण माझी मात्र कुचंबना होण्याची वेळ आली होती. तू तुझ्या ‘सू’ च्या धारेचा सर्वानाच प्रसाद दिलास, सर्वात प्रथम आत्याचे कपडे खराब केलेस. बाबांचा शर्ट, आईची साडी, आजीच्या अंगावर.  इतकेच काय तर एकदा तुझे पाय तुझ्या आईने वर धरले तर ती अशी धार मारलीस की तुझ्याच चेहऱ्यावर नेम धरला गेला.

५    मी तुला पूर्वीच सांगितले ना माझी पंचायत त्या डायपर या तथा कथीत modern लंगोटने केली. अरे एकदम टायीट. त्यामुळे ‘सू’ ला धारेच्या रुपात बाहेर येण्याचा चांन्सच नाही. पण परवा खूप मजा आली. ‘सू’ साठी कळ आली म्हणून किंचाळलो. आजोबा जवळच होते. त्यांनी डायपर काढताच, मी जी धार मारली ती नेम साधून त्यांच्या शर्टाच्या खिशात. सर्वच खदखदून हसले. माझे पण समाधान झाले.  ‘हम भी कुच कम नही’ हे वाटू लागले. आजोबांची काही तर गडबड चालू होती. डायपर ते त्यांच्या शर्टाचा खिसा हे अंतर टेपने मोजीत असल्याचे दिसले. तीन महिन्यांच्या त्यांच्या येथील वास्तव्यांत कदाचित त्यांचा एखादा थीसीस ‘नव बालकांची सू क्षमता’ या विषयावर लीहून जर युनीव्हरसीटीमध्ये सबमिट करण्याची शक्यता आहे. स्टॅयाटीसटीकल बेस्ड लहान लहान विषयावर मोठे प्रबंध लीहून पी.एच.डी. करण्याचे अमेरिकन लोकांना एक वेडच असते. आजोबा कमीत कमी त्यांच्या वेडांत सहभागी होऊ इच्छीतात.

पत्र वाढत चालले आहे. अजून बऱ्याच गमती जमती व रोज काहीतरी नवीन घडते. तू पण तुझे अनूभव साठून ठेव. लवकरच दोघे भेटूत. हे एप्रिल फूल नव्हे बरका. हीच तारीख तिथे येण्याची आज तरी ठरत आहे. लवकरच भेटूत. काका, काकू, आत्या, मामा, नाना, नानी यांना नमस्कार.

सर्वांचाच-  जगातील अनुभवांचा अस्वाद घेणारा.

लंगोटीयार  आकाश

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail-  bknagapurkar@gmail.com

विवीध-अंगी     *** ५बोल सारे अनुभवांचे   त्या बोलीची भाषाच न्यारीसुख दुःखाच्या गुंत्यामधला   अर्थ सांगतो कुणीतरी

 

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s