Daily Archives: डिसेंबर 9, 2012

चांदण्यातील आठवणी

चांदण्यातील आठवणी

हवाच मजला तोच चंद्रमा

तेच नभी चांदणें

गतकाळाच्या आठवणी शिकवती आनंदातील जगणें   ।।धृ।।

आजीसंगे गच्चीवरती

फुलराण्यांच्या कथा ऐकती

बसुनी सारे एक वर्तुळी, टाळ्या पिटूनी गाती गाणें    ।।१।।

गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें

फुलले होते यौवन सारे

अंगी झोंबे शितल वारे

पुनव चांदणे धुंदी आणी, बघूनी तारांगणे   ।।२।।

गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें

सगे सोयरे मित्रमंडळी

परसदारी तुळशीजवळी

गप्पा टप्पा विनोंद बौधिके, रात्र घालवी करुनी भजने   ।।३।।

गतकाळाच्या आठवणी शिकवती, आनंदातील जगणें

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail –  bknagapurkar@gmail.com