मानसिक तणाव (क्रमशः पुढे ६ वर चालू)

मानसिक तणाव   (क्रमशः पुढे ६ वर चालू)

00                 आपण वैशिष्ट्यपूर्ण आहात. तुलना करुन चिंता नका

आपण आपल्या जीवनाची तुलना दुसऱ्य़ाबरोबर करुन चिंतीत होऊ नका. कारण, या विश्वांत आपण एक वैशिष्ट्यपूर्ण आहात. या जगात आपल्या सारखा अन्य कोणी नाही.

दुर्दैवाने आपण स्वतःला ओळखत नसतो. जगाला मात्र समजण्याचा प्रयत्न करतो. सतत तुलनात्मक विचार चालले असतात. त्याचमुळे निराशेच्या वातावरणांत राहतो. इतरांच्या तुलनेमुळे स्वतःमधले वेगळेपण विसरतो.

नुकतीच क्रिकेटची वल्डकपची मँच बघितली. एक शॉटमध्ये सचिन तेंडूलकर व शाहरुख खान यांची थोडीशी चर्चा दाखवली गेली. सचिन म्हणतो की आपण एक चांगले अभिनेते असावयास हवे होते. तर शाहरुख खान याने आपण यशस्वी क्रिकेटीयर झालो असतो तर आनंद झाला असता ही इच्छा व्यक्त केलेली दिसली. हे सहज म्हटले असेल तर गम्मत म्हणून घेता येईल. परंतु अशी जर त्यांची सुप्त इच्छा असेल, तर ते मानसिक तणावाचे बळी ठरतील.

एक लक्षात ठेवा की प्रत्येकजण हा सर्वगुण संपन्न असू शकत नाही. जे मिळाले, जे तुम्ही कमावले त्यांत समाधानी रहा. चांगल व वेगळ मिळवण्या प्रयत्न असू द्या. परंतु  ठेवीले अनंते तैसेची रहावे, चित्ती असू द्यावे समाधान. ही वृत्तीच तुमचे मानसिक तणावापासून मुक्त ठेवेल.

000                               निंदकाचे घर असावे शेजारी.

संत शिरोमनी श्री. तुकाराम महाराजानी म्हटले आहे. निंदकाचे घर असावे शेजारी. एक महान तत्वज्ञान त्यानी सांगितले आहे. तुम्हाला घडवण्यात, तुमची मानसिक जडन घडन  चांगली करण्यात,  ह्या तत्वाचा मोलाचा वाटा असतो. प्रत्येकजण चांगले वा वाईट गुणधर्म बाळगुण असतो. तुमचे मित्रमंडळ, नातेसंबंधी तुमच्या चांगल्या गुणांची नेहमी स्तुती करतात. हे चांगले आहे. परंतु तुमच्यामधील जे कांही दुर्गुण असतील, वागणूकीमधील अहंकारी, हट्टी स्वभाव  ते फक्त तुमचे निंदकच चव्हाट्यावर आणतात. त्या निंदकाना आपलस करा, वा प्रेम करा हा संतथोर संदेश मी देवू इच्छीत नाही. परंतु निंदकाच्या सहवासापासून तुम्हास मिळणार, तुमच्या स्वभावातील दुर्गुणांची जाणीव करुन देणारा संदेश. त्यावर चिंतन करा. मनन करा. मात्र मुळीच कुणाबरोबर चर्चा करु नका. कोण सांगतो ह्यापेक्षा काय सांगतो, ह्यावर तुमचा वैचारीक भर असावा. चांगल्या मनाची ठेवण, चांगले चिंतन करु शकते. चांगला स्वभावच तुमचा मानसिक तणाव कमी करु शकतो.

नेहमी लक्षात असू द्या की तुमची निंदा करणारा तुमचा खरा मित्र आहे. जो तुम्हाला विनामुल्य एका मनोचिकित्सकाप्रमाणे तुमच्या ढोबळ चुका व कमतरतांकडे तुमचे लक्ष वेधू इच्छितो.

क्रमशः पुढे ७ वर चालू

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

e-mail   bknagapurkar@gmail.com

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s