शोधूं कुठे त्यास ?
शोधत होतो रुप प्रभूचें, एक चित्त लावूनी
अवंती भवंती नजर फिरवी, श्वास रोखूनी १
शांत झाले चंचल चित्र, शांत झाला श्वास
ह्रदयनाडी मंद होऊनी, चाले सावकाश २
पचन शक्ति ती हलकी झाली, जठराग्नीची
शिथील झाली गात्रे सारी, देह चैतन्यांची ३
देहक्रियांतील प्राणबिंदू तो, असे ईश्वर
समरस होतां त्याच शक्तिशीं, होई ते स्थिर ४
शोधामध्ये चिंतन करतां, ध्यान परी लागते
समाधी स्थितीत येंता प्राण, अनंतात मिसळते ५
नाही दिसले रुप ईश्वरीं, आगळे एकटे
विश्वमंडळ ते तोच असता, सोधू तयास कोठे ? ६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०