चिंतन !
ज्याचे आम्ही चिंतन करतो
तोच ” शिव ” चिंतन करतो
स्वानुभवे चिंतन करुनी
चिंतन शक्ति दाखवितो ।१।
जीवनाचे सारे सार्थक
लपले असते चिंतनांत
चिंतन करुनी ईश्वराचे
त्याच्यांत एकरुप होण्यांत ।२।
सारे ब्रह्मांड तोच असूनी
अंश रुपाने आम्ही असतो
जेव्हां विसरे बाह्य जगाला
तेव्हांच तयांत समावतो ।३।
चिंतन असे निश्चीत मार्ग
प्रभूजवळ तो जाण्याचा
लय लागुनी ध्यान लागतां
ईश्वरमय होण्याचा ।४।
(कविता)
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०