* बागेतल्या तारका
बागेमधला निसर्ग सारा टिपत होतो मी
रात्र पडुनी चंद्र आकाशी बाग झाली रिकामी १
बाकावरती बसून एकटा मोजत होतो तारे
लुकलुकणारा प्रकाश तो अंक चुकवी सारे २
अगणित बघुनी संख्यावारती प्रसन्न झाले मन
किती वेळ तो निघुनी गेला राहिले नाही भान ३
शितलेतेच्या वातावरणी शांत झोप लागली
नयन उघडता बघितले मी पहाट ती झाली ४
गेल्या निघून सर्व तारका आकाशाला सोडूनी
शोधू लागले नयन माझे त्यांना सर्व दिशांनी ५
चकित झालो फुले बघुनि मी सुंदर फुललेली
सुचवित होती मिश्कील्तेने का तारकांच खाली ? ६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०