व्यसनासक्ति विषयी !
दारु, बिडी-सिगार, अफू, गांजा, त्यांचा राजा गर्द !
लत लागतां, कित्येक संसार, त्याने केले सारे बरबाद
अजगराच्या विळख्याहूनी, महाभयंकर सत्य
एक नव्हे, अनेक सारे, नष्ट होतील त्यांत
होत आहे उध्वस्त आमची, तरुण ही मंडळी
नशेच्या ह्या चक्रामध्ये, गुंतली जी सगळी
जाणूनी घ्या त्या शत्रुला, छुपा रुस्तूम तो
प्रवेश एकदा शरिरीं मिळतां, कायमचा तो राहतो
सहज काढून टाकीन त्याला, नका करुं वल्गना
घेऊन जाईल प्राण तुमचे, हीच त्याची गर्जना
कविता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
तरुणाई ने बोध घ्यावा अशी कविता आहे.
प्रिय निनाद
तरुणानीच नव्हे तर सर्वानी जे दुर्दैवाने व्यसनांत अडकले त्यानी बोध घ्यावा ही सुइच्छा.
तुमच्या आवडीबद्दल धन्यवाद