समाधान
दाही दिशांनी फिरत होतो
मनी बाळगुनी तळमळ ती
कसे मिळेल समाधान ते
विवंचना ही एकच होती
धन दौलत ही हातीं असतां
धुंडाळल्या त्या बाजार पेठा
न मिळे समाधीन कोठें
थकली पाऊले चालून वाटा
देखिले निसर्गरम्य शिखरे
आणिक कांहीं प्रार्थना स्थळे
शिलकीमध्यें दिसे निराशा
कारण त्याचे कांहीं न कळे
भावनेमधली विविध अंगे
येऊं लागली मनीं दाटूनी
उसंत मिळता थोडी तेव्हां
उतरत होती काव्य रुपानी
धुंदीमध्यें सदैव राहूनी
लिहीत गेलो सुचले जे जे
कसा काळ तो जावूं लागला
कोडे ह्याचे कधीं न उमजे
शोध आजवरी घेत होतो
सांपडले परि तेच समाधान
उत्स्फूर्तपणे जे करीत आलो
त्यातच दिसली बीजे महान
कविता
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
समाधानी राहणं, याची प्रत्येकाची परिभाषा वेग वेगळी असते, पण असते मात्र जरूर. आपणच त्याचा शोध घेऊन समाधानी व्हायला हवं… सुरेख कविता.
प्रिय मयुर
कविता सुरेख वाटली. समाधान वाटले
डॉ. भगवान नागापूरकर
जीवनाचे सार सापडले ह्या कवितेतून
जबरदस्त
प्रिय निनाद
समाधान कविता आवडली वाचून समाधान वाटले.
धव्यवाद
डॉ. भगवान नागापूरकर