आनंदात गाऊं

आनंदात गाऊं

प्रेमिकांचे गीत गाऊं

आनंदात न्हाऊ //धृ//

बागेमधल्या फुलानीं

सुगंध आणिला वनीं

फुलपाखरासमान  गंधशोषित जाऊ //१//

प्रेमिकांचे गीत गाऊं     आनंदात न्हाऊ

कोकिळ गाते आम्रवनीं

कुहू ss  कुहू ss स्वर काढूनी

नक्कल करण्या तिची  उंच लकेरी घेऊं //२//

प्रेमिकांचे गीत गाऊं   आनंदात न्हाऊ

श्रावणाच्या पडती सरी

अंग भिजते थोडे परि

सप्तरंगाचे इंद्रधनुष्य  आकाशांत पाहूं //३//

प्रेमिकांचे गीत गाऊं   आनंदात न्हाऊ

निरभ्र आहे आकाश

पौर्णिमेचा पडे प्रकाश

एक दिलानें एक मनानें   नाचत ताल धरूं //४//

प्रेमिकांचे गीत गाऊं    आनंदात न्हाऊ

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s