Daily Archives: सप्टेंबर 1, 2011

खरा आस्तिक

खरा आस्तिक

नास्तिक असूनी श्रद्धा नव्हती, ईश्वराचे ठायीं

विज्ञानाची कास धरुनी ती, भटकत तो जायी //

चार पुस्तके वाचूनी त्याचे,  तर्कज्ञान वाढले

दृष्य अदृष्य तत्वांमधले , भेद जाणवले //

नसेल त्याचे आस्तित्व कसे , तर्काला सोडूनी

समजूनी ह्याला “अंध विश्वास” , देई फेटाळूनी //

आधुनिक होते विचार त्याचे,  कलाकार तो होता

पृथ्वीवरील घटणाना परि ,  योग म्हणत होता //

काढून टाकल्या तसबिरी आणि मुर्ति,  देखील ती

नाव प्रभुचे त्या वातावरणी,  कुणी न घेती //

प्रेमळ त्याचा स्वभाव असूनी,  चित्त तयाचे स्वछंदी

रहात होता सुंदर बंगलीं,  अतिशय आनंदी //

छंद तयाला फुलझाडांचा,  बाग केली छान

विविधतेची झाडे झुडपे,  दिसे शोभावान //

दिवसभराचे कष्ट करुनी,  फुलवित असे बाग

सुवास सारा दरवळूनी,  डोलती तेथे नाग //

पक्षी आणि प्राणी जमवूनी,  संग्रहालय दिसले

आवाजांचे सूर निघूनी मग,  मधूर ते भासले //

मोर नाचे थुई थुई तेथे, नभी येता ढग

आनंदाला सिमा पडेल,  कशी तेथे मग //

सारे होते नयन मनोहर,  त्या वातावरणीं

संबोधित होता त्या वास्तूला  “निसर्ग ” तो म्हणूनी //

वेड लागुनी तन्मय झाला,  सौंदर्याच्या ठायीं

निसर्गातील रस सदैव,  शोषित तो राही //

नास्तिक तो अन् ईश्रर नसे, ही त्याची धारणा

परि तोच भासला खरा आस्तिक समरस होतांना //

(कविता)

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०