अजाणतेतील अपमान
स्फूर्ति येऊन कविता केली आनंद झाला मनीं
चटकन कागदावरी लिहीली शब्द येता ध्यानी //१//
कवितेतील शब्दरचना झाली बहरदार
कौतूकाची येई भावना बघुन शब्द भांडार //२//
पूर्ण करुनी कविता टिपून घेतवे वहीत
काव्यरचना वाचतां हरकुन गेलो आनंदात //३//
दिला कागद फेकून ज्यावर रचली कविता
विचारांत होतो मग्न कृत्य केले अजाणता //४//
अघटीत घटना झाली काव्यस्फूर्ति गेली निघूनी
नंतर मजला काव्य सुचेना बेचैन झालो मनी //५//
चुक मना उमगली अपमान केला अजाणता
शारदा कागदावरी उतरली बनोनी एक कविता //६//
खिन्नता वाटली मनासी कागद घेतले उचलून
निर्माल्य समजोनी त्यासी गंगाजळी केले अर्पण //७//
पुनरपि सुचले काव्य लिहू लागलो कविता
शब्द रचना भव्य लेखणीतून उतरता //८//
उद्देश नसून झाला मजकडून अपमान
प्रायश्चित घेतां गेला शारदेचा राग निघून //९//
(कविता)