Daily Archives: जुलै 21, 2011

ज्ञानाग्नि पेटवा

ज्ञानाग्नि पेटवा

 हातातील काडी    घासतां  पेटीवरी

अग्नि त्याच्यातील   ज्वाला त्या धरी

लपलेला अग्नि     घर्षणाने पेटतो

अज्ञान झटकता    ज्ञानी उजाळतो

चितांत असतो     प्रभू सदैव शांत

ओळखण्या त्यासी   लागताती संत

संत हाच गुरु        मार्गदर्शक असे

चित्तातील प्रभूला     जागवित असे

उजळण्या मन   घर्षण लागे संताचे

पेटवा ज्ञानाग्नि     सार्थक होई जीवनाचे

(कविता)