भाकरी
भाकरीच्या पाठीवर ठसे दिसती हातांचे
जाता तव्यावर भाजूनी निशाण राहते कष्टांचे
एका भाकरीच्या पाठी हात कितीक गुंतले
कण कण देती ग्वाही मन भरुनी कसे आले
उन्हा पावसांत फिरे शेतामध्ये शेतकरी
टप् टप् घाम गाळी उभी करीता जवारी
पोती पोती उचलूनी वाहून नेई मजूर
दमछाक होऊनी ही मिळत नाही पोटभर
ओवी म्हणत मुखाने आई थापिते भाकरी
सारय़ांच्या कष्टामध्ये तिच्या मायेची भागीदारी
धरणीच्या पोटातून जीवन रस येई वरी
दुजासाठी जगा तुम्ही बघा सांगते भाकरी
(कविता )
खुपच छान ….