पतंग
एक पतंग वरी चालला, डोलत आकाशी
भाळी त्याच्या यश कोरले, झेप घेई ती कशी //
भरारी घेई पतंग, ज्याला आधार दोरीचा
जाणीव होई येता प्रसंग, त्याला कटण्याचा //
धरतीवरी कोसळत असतां, दृष्टी टाकी आकाशी
इतर पतंग बघून बोलला, तोच स्वतःशी //
नभांग मोठे दाही दिशा, संचारा स्वैरपणे
आठवण ठेवा त्या शक्तीची, ज्याच्यामुळे जगणे //
(कविता)