दोघे मिळून आलां हातात घेऊन हात
हाताळूनी परिस्थितीला करण्या त्यावर मात
दोघांची मिळूनी शक्ति दुप्पट होत असे
सहभागी होतां,युक्ति यशाची खात्री दिसे
एकाच तेजाची तुम्ही बाळे बरोबरीने आलां जगती
रवि-किरण होऊन जुळे प्रकाशमान बनती
ओळखुनी जीवन धोके यशाच्या मार्गांत
गाडीची बनूनी चाके सतत रहा वेगांत
एकाचे पाठी जाता दुसरा यश अल्पची मिळे
एकत्र मिळूनी काम करा तुम्ही आहांत जुळे
(कविता)