मूर्तिमंत वाटे देवी लक्ष्मी प्रेमळ स्वरूप माझे आई
धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी
धन्य जहलो जन्म मिळूनी उदरामाजी तुझिया ठायी
प्रेमाचा तो सागर देखिला नऊ मास मी उदरी राहुनी
तुझ्या वाचुनी हृदया जवळी शिरलो नाही निकट जाऊनी
दुग्धामृत पाजून मजला वाढवी अंकुर काळजीने
घास भरवण्या काढून ठेवी उपाशी राहून आनंदाने
निद्रा न लागे तुजला तेंव्हा आजारी जेंव्हा मी पडलो
पाणी दिसले तुझ्या नयनी दु:खाने जेंव्हा हळहळलो
अनंत ऋणे करुनी ठेवसी माझ्या शिरावरी आई गे
तेच फेडण्या करिता कित्येक जन्माची सेवा लागे.
मात्रत्वाचे ऋण फेडण्या असे वाटते, माताच व्हावे
पुनर्जन्मी त्नू पुत्र होऊनी सेवा करण्या मजला मिळावे.
( कविता )
पिंगबॅक आईचे ऋण | जीवनाच्या रगाड्यातून