सुख दु:खाच्या लाटेमध्ये, तरणे वा बुडणे
जगेल तो त्या क्षणी, ज्याला माहित पोहणे
पोहणे-जगणे कला असुनी, प्रयत्न अनुभव शिकउनी जाते
सतर्कतेने कसे जगता, यशही त्याला तसेच मिळते
जीवनाविषयी ज्ञान मिळवण्या, कष्ट लागती महान
परी केवळ एक अनुभवी प्रसंग, सहजतेने जातो शिकउन
अनुभवाचे ज्ञान श्रेष्ठ हे, निसर्ग शिकवी क्षणो क्षणी
सतर्कतेने वेचून घ्यावे, दैनंदिनीच्या घटनां मधूनी
बोल सारे अनुभवांचे, त्या बोलीची भाषाच न्यारी
सुख दु:खाच्या गुंत्यामधला, अर्थ सांगतो कुणी तरी
(कविता)