४४ वर्षे एकत्र नांद्लो
आयुष्यातील मार्गप्रवाही
कसा काळ निघूनी गेला
केव्हांच समजले नाही १
काळ विसरलो परी वेळ न विसरे
क्षणा क्षणाच्या प्रसंगांची
सुख दु:खानी भरलेल्या
अनेक अशा घटनांची २
सैल झाला जीवन गुंता
कधी तो गेला आवळूनी
उकलणार नाही कधीच तो
जाणीव आली मनी ३
हेच असेल विधी लिखित
जिंकणे वा हारणे
आयुषाचा मार्ग खडतर
समजुनी त्याला घेणे ४
सुख अथवा दु:खमय लहरी
विचारांच्या चेतना
मीच करतो मीच अनुभवतो
हीच दैवि योजना ५
तुटू न देता आयुष्य दोर
जगणे व्हावे वर्षे शंभर
असेच जगू एकत्र मिळूनी
काळ चालतो भराभर ६
( कविता )