बहिरा ऐके कीर्तन

 गम्मत वाटली प्रथम मजला       बहिरा ऐके कीर्तन
अश्रू वाहू लागले माझे नयनी      भाव त्याचे जाणून
नियमित येई प्रभूचे मंदिरी         श्रवण करी कीर्तन
केवळ बघुनि वातावरण ते          तल्लीनच होई मन
सतत टिपत होते मन त्याचे        इतर मनांचे भाव
केवळ जाणण्या भगवंताला           डोळे आतुर सदैव  
रोम रोमातून शिरत होत्या           प्रभू निनाद लहरी
संदेश प्रभूचा पोह्चूनी                  आत्म्यास जागृत करी
होऊन गेला प्रभूमय बहिरा            धुंद त्या वातावरणी 
ऐकत होता तो शब्द प्रभूचे           श्रवण दोष असुनी
 
(कविता)
 
 
 
 

3 responses to “बहिरा ऐके कीर्तन

 1. वा, फार सुंदर कल्पना आहे.
  मी सहसा कविता वाचत नाही, पण ह्या कवितेचा विचार इतका सुंदर आहे की मी खुपदा ही कविता वाचली.
  शक्य असल्यास फेररचना करून ओळी अजून नादमय करता येतील का ते पहावे. Keep polishing this poem, it’s a GEM.

  • नमस्कार प्रणव
   तुमची माझ्या ” बहिरा ऐके कीर्तन ” ह्या कवितेवर केलेली टिपणी मनाला खूप आनंद देणारी ठरली. तुमच्या सल्ल्याची मी कदर करतो.आशय आणि भाषा दोन्हीही महत्वाचे. त्यावर चिंतन होईल. दुरुस्ती केल्या जातील. असाच स्नेह आणि संपर्क असू द्या
   धन्यवाद
   Dr. Bhagwan Nagapurkar

 2. पिंगबॅक * बहिरा ऐके कीर्तन | जीवनाच्या रगाड्यातून

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s