रविवारचा दिवस, ठरल्या प्रमाणे सर्वत्र पल्स पोलिओ देण्याचा दिवस होता. दारावर शासनाच्या आरोग्य खात्यातील दोन कर्मचारी, पोलिओ लस देण्यासाठी आले होते. त्यांनी घरांत पांच वर्षापर्यंत कुणी बालके आहेत कां ? म्हणून चौकशी केली. मी लगेच पुढे झालो व माझ्या नातीस बोलावले. तिने नुकतेच चार वर्षे पूर्ण केले होते. तिला त्यांनी पोलिओचा डोस पाजला. त्यांनी तिचे नांव लिहून घेतले. पुन्हा त्यांनी विचरण केली की ” घरांत आणखी कुणी लहान मुल आहे कां? ” आम्हाला न सांगताच , मानसी, माझी नात घरात गेली व लगेच परत आली. ती त्यांना विचारू लागली ” काका माझ्या सोनुलापण पोलिओचा डोस देणार कां? ” थोडेसे कौतुक परंतु संभ्रमित होऊन ते तिच्या प्रश्नाकडे निरखून बघू लागले. आपल्या हातातील बाहुली उंचावून दाखवीत ती म्हणाली ” ही माझी सोनू ”
आणि सर्वजणच हास्याच्या लाटेत वाहून गेलो. कालचक्राचा वेग बघून खूपच आश्चर्य वाटते. लहान मुलांचे बोल ऐकून त्यांच्यातील वैचारिक समज ही अनेक वेळा चकित करून टाकते. केंव्हा केंव्हा त्यांत विनोद ही निर्माण होतात. दूर दर्शन आणि त्यावरील जाहिराती मुलांना मुखोतगत होऊ लागल्या
आहेत. त्या सुरांत म्हणताना एक आनंद लुटीत असल्याचे अनेकदा दिसते. नातीने जी विचारणा केली होती, त्यात सत्य होते, चौकस बुद्धी होती, त्यात सहजता होती. विनोदी बोलण्याची इच्छा नव्हती, परंतु जे तिने विचारले, त्यात विनोद झाला होता.
जेष्ठाच्या ह्याच चौकशीला मार्मिकता व गम्मत म्हणून ठरविले गेले असते. कसे कां होईना ऐकनाऱ्याला ते आनंदच देणार नाही कां?
The smallest thing is noticed ,which never listen by parents..
I means children used to say many sentences like mentioned in above blog, but we lough and left… you publish it and respond to there act.
पिंगबॅक माझ्या सोनूला पोलिओ डोस पाजा ! | जीवनाच्या रगाड्यातून