कांपू नकोस धरणीमाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते //दृ //
जागो जागी अत्याचार
सर्वत्र दिसे भ्रष्टाचार
वाढले भयंकर अनाचार
गरीब जनता त्रस्त होऊनी जाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते //१//
रक्षण नाही स्त्रियांचे
प्रमाण वाढले बलात्काराचे
प्रकार घडती विनयभंगाचे
हतबल होऊनी स्त्री अश्रू ढाळते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते //२//
लुट लुट संपत्तीची
जाळपोळ घरदारांची
खून पाडती जीवांची
प्रेमभावना उरली नसे ह्या जगाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते //३//
गीतेमध्ये दिले वचन
अर्जुनासी प्रभूचे तोंडून
प्रभूचे होईल पुनरागमन
अत्याचार वाढता जगाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते //४//
शब्द आपला पाळूनी
येईल तो अवतार घेउनी
सुखी करील दु:ख नाशूनी
विश्वास ठेवा गीतेतील शब्दाते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते //५//
ठेवा निर्मळ देह आणि मन
पवित्रतेचे करा वातावरण
टाळू नका ह्या स्वागत संधीते
ही नांदी प्रभूच्या आगमनाची वाटते //६//
(कविता)