Daily Archives: डिसेंबर 5, 2010

सहस्र वाचकांना अभिवादन

 
 सहस्र वाचक संख्या लाभली, अल्पशा  काळांत
समाधान ते दिसून आले, केल्या प्रयत्नात  
 
शासंक होते मन, जेंव्हा लिहू लागलो कांही 
प्रवाही विचार उत्पन्न होऊनी, देत यशाची ग्वाही  
 
उत्स्फूर्त येईल तुझ्या मनी, तीच असे प्रेरणा 
इतरांना ही आवडावी, हीच निसर्ग योजना 
 
मार्फत कुणाच्या तूच लिहितो, जीवन रगाड्यातूनी  
योग्य श्रमांना  उभारी मिळेल, वाचक वर्गाकडूनी   
 
( कविता )