उंच चढूनी हिमालयी, झेंडा तो रोविला
गीरीराजाचे शिरावरी, विजय संपादिला
उंचाऊनी बघे मानव, अथांग जगताला
विज्ञानाच्या जोरावरती, अंतराळात गेला
युगा युगाचा चंद्रमा, केला अंकित त्याने
त्याच्या देही ठेवी पाऊल, मोठ्या अभिमानाने
अगणित दिसती गृहगोल, त्याचा दृष्टीला
सीमा न उरली आता मग, चौकस बुद्धीला
चकित होतो प्रथम दर्शनी, विज्ञाना बघता
दिसून येती अनेक गुढे, एक एक उकलता
किती घेशी झेप मानवा, उंच उंच गगनी
वाढत जातील क्षितिजे, तितक्याच पटींनी
( कविता )